टर्म इन्श्युरन्स घेताना—–
नावाप्रमाणेच टर्म इन्श्युरन्समध्ये फक्त इन्श्युरन्स / संरक्षण येते. म्हणजेच युलिप किंवा एंडोमेंट प्रमाणे इन्श्युरन्स आणि गुंतवणूक असा प्रकार यात नसतो. त्यामुळे कमीत कमी प्रीमियममध्ये चांगला लाभ / कव्हर मिळणे शक्य होते. असे असले तरी, टर्म इन्श्युरन्स बद्दल अनेक समज -गैरसमज आहेत त्याचबरोबर इन्श्युरन्स घेताना अनेक चुका होतात. त्या टाळण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करूया. प्रीमियम आणि मृत्यूनंतरचा फायदा अगोदरच्या तुलनेत आता भारतात टर्म इन्श्युरन्सचे महत्व लक्षात येत आहे. मात्र आजही अनेकजण टर्म इन्श्युरन्सच्या फायद्याविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसते. टर्म प्लॅनमध्ये, पॉलिसी चालू असताना जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांना विम्याचे पैसे मिळतात मात्र पॉलिसीची मुदत संपूनही जर विमाधारक जिवंत असेल तर…