बोनस शेअर
विप्रोने 1:3 या प्रमाणात बोनस शेअर जाहीर केल्यामुळे ज्या शेअरधारकांकडे "विप्रो'चे तीन शेअर आहेत, त्यांना या कंपनीचा एक शेअर "फ्री' म्हणजेच मोफत मिळणार आहे. कंपनीने 7 मार्च रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात 7 मार्च रोजी विप्रोचे शेअर असतील, असे गुंतवणूकदार विप्रोचा बोनस शेअर मिळण्यास पात्र ठरतील. बोनस शेअर ही कंपनीने त्यांच्या शेअरधारकांना दिलेली विनामूल्य भेट असते. बोनस शेअरच्या "रेकॉर्ड डेट'च्या दिवशी डिमॅट खात्यात शेअर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला असा बोनस शेअर मिळतो आणि यासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही. कंपनीकडे साठलेल्या संचित नफ्यातून (रिझर्व्ह्ज) असे बोनस शेअर दिले जातात. "सेबी'च्या नियमांचे पालन करून कंपनीच्या…