सर्वाधिक परकी गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारात मार्च महिन्यात सर्वाधिक परकी गुंतवणूक झाली आहे. मागील सात वर्षातील ही सर्वात मोठी परकी गुंतवणूक आहे. परकी गुंतवणूकदारांकडून आशियाई शेअर बाजारात करण्यात आलेल्या गुंतवणूकीतील सर्वात मोठा हिस्सा भारतीय शेअर बाजाराकडे आकर्षित झाला आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांचा कल भारतीय शेअर बाजाराकडे आहे. त्यातच जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावल्या परिणामही इतर आशियाई बाजारांवर झाला आहे, त्याचाही फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला आहे. मार्च महिन्यात आशियातील दक्षिण कोरिया, तैवान, भारत, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांच्या एकत्रित शेअर बाजारात 4.96 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक झाली आहे. तर एकट्या भारतीय शेअर बाजारात मार्च महिन्यात…

सेबीकडून म्युच्युअल फंडांसाठीच्या स्वतंत्र नियामक संस्थेचा प्रस्ताव

सिक्युरिटिज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) म्युच्युअल फंड योजनांसाठी स्वतंत्र नियामक संस्थेचा प्रस्ताव दिला आहे. म्युच्युअल फंड योजनांच्या वितरणावर आणि सल्लागारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक संस्थाच असावी असा सेबीचा प्रस्ताव आहे. सध्या म्युच्युअल फंड योजना सेबीच्या नियंत्रण कक्षेत येतात. म्युच्युअल फंड योजना आणि सल्लागार यांचे बाजारातील महत्त्व आणि संख्या वाढत चालली आहे. 28 फेब्रुवारी 2019 पर्यत म्युच्युअल फंड योजनांचे 1.24 लाख वितरक नोंदवले गेले आहेत. तर 19 मार्च 2019 पर्यत 1,136 गुंतवणूक सल्लागारांची सेबीकडे नोंदणी झाली आहे. 'त्यामुळेच सेबीला म्युच्युअल फंड योजनांवर प्रत्यक्ष देखरेख करणे आव्हानात्मक होत जाणार आहे. त्यामुळेच यासाठी स्वतंत्र नियामक संस्थेची आवश्यकता आहे', असे मत सेबीने…

म्युच्युअल फंड घेताय ?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक  करताना कोणत्या गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. सुरुवातीची प्रक्रिया इच्छुक गुंतवणूकदाराला केवायसीचा अर्ज भरून देणे आवश्यक असते. या अर्जासोबत एक छायाचित्र, पॅन कार्डची प्रत, निवासाचा व नागरिकत्वाच्या दाखल्याचा पुरावा, बँक खात्याच्या नोंदी द्याव्या लागतात. याशिवाय गुंतवणुकीसंबंधी अर्जही (फर्स्ट इन्व्हेस्टमेंट फॉर्म) निबंधक अथवा फंड हाऊसकडे जमा करणे अनिवार्य असते. काही फंड हाऊस ई सेवाही स्वीकारतात. या माध्यमातूम तुम्ही झटपट गुंतवणूक करू शकता.  योजनेची निवड म्युच्युअल फंडात प्रथमच गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने आपले वय, उद्दिष्ट, जोखीम पत्करणाची क्षमता, किती काळासाठी गुंतवणूक करायची आहे या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी किती गुंतवणूक करावी…

करदात्यांनो, हे करा—

गुंतवणुका पूर्ण करा  सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, विमा हप्ते, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस), मुदत ठेव, गृह कर्जाचा हप्ता वगैरेंमधील गुंतवणूक ३१ मार्चपूर्वी केल्यासच ती आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ग्राह्य़ धरली जाते. शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका. सुट्टीचा दिवस, चेक वटण्यास लागणारा विलंब वगैरे कारणांमुळे गुंतवणुकीची तारीख १ एप्रिल किंवा त्यानंतर पडल्यास वजावट या वर्षी मिळणार नाही. ही वजावट पुढील वर्षी घ्यावी लागेल. उदा. जीवन विमा हप्ता मार्च २०१९ मध्ये देय असेल आणि विमा हप्ता एप्रिल २०१९ मध्ये भरला असेल तर त्याची वजावट आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये घेता येणार नाही. शिवाय विलंब शुल्क भरल्यास त्याची वजावट मिळत नाही. गुंतवणूक वेळेत न…

tax planning

आर्थिक वर्षातील शेवटचा महिना म्हणजे 'मार्च महिना' होय. करदात्याला १ एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत झालेल्या व्यवहारानुसार उत्पन्न, खर्च, गुंतवणूक यांची गणना करून आपल्या करपात्र उत्पन्नावर 'टॅक्स' भरावा लागतो. मार्च महिना अखेर कर बचत व्हावी यामुळे बरेच लोक गुंतवणुकीचे विविध मार्ग निवडतात. मात्र कर वाचवण्याच्या नादात ते बऱ्याचदा चुकीची गुंतवणूक करून बसतात. यामुळे मात्र आपला पैसा अडकून राहतो. त्यामुळे अजूनही वर्ष संपण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी शिल्लक आहेत.  ELSS-  १० ते १३ % परतावा , तीनच वर्षे lock इन अधिक माहितीसाठी शेअरखान सावंतवाडी येथे संपर्क साधा !!

आरोग्य विमा — का हवा ?? वाचा

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे आणि लवकरच म्हणजे २०३० पर्यंत ती १० ट्रिलियन डॉलर्स जीडीपीसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनणार आहे. हे महत्त्वाकांक्षी आर्थिक उद्दिष्ट साकारण्यासाठी देशातील आरोग्य सेवा वित्तपुरवठा आणि वितरण यंत्रणेला महत्त्वाची भूमिका निभवावी लागणार आहे. देशाची आर्थिक कामगिरी आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध असल्याचे केव्हाच सिद्ध झाले आहे. आर्थिक पुरावे असे सांगतात, की जन्मवेळेस बाळ जगण्याची शक्यता दहा टक्क्यांनी वाढल्यास त्यामुळे आर्थिक विकास वार्षिक पातळीवर ०.३- ०.४ पॉइंट्सनी वाढतो. श्रीमंत देशातील लोकसंख्या अधिक निरोगी असते आणि मूलभूत आरोग्य निकषांशी तुलना केल्यास जगातील विकसित देशांची आरोग्यसेवा तरतूद व त्याच्या वापराशी संबंधित कामगिरी ही विकसनशील…

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी

जे पगारदार आहेत अशा करदात्यांचा संपूर्ण उत्पन्नावर भरावा लागणारा कर, उद्गम कर (टीडीएस) म्हणून कापण्याची जबाबदारी, ही मालकाची असते. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मालकाला करदात्याच्या उत्पन्नावर अचूक कर (टीडीएस) कापावा लागतो. यासाठी करदात्याने केलेली प्रत्यक्ष गुंतवणूक आणि खर्च विचारात घ्यावा लागतो. देय कराची गणना वेळेत होण्यासाठी, गुंतवणुकीचे पुरावे सादर करण्याची मुदत बऱ्याचदा जानेवारी किंवा फेब्रुवारीमधील एखादी तारीख असते, जेणेकरून ३१ मार्चपूर्वी अचूक कर कापता येईल. काही महत्त्वाच्या वजावटीसाठी सादर करावे लागणारे पुरावे खालीलप्रमाणे : घरभाडे भत्ता -कलम १० (१३ अ) : करदात्याला पगारातून घरभाडे भत्ता मिळत असेल आणि तो भाडय़ाच्या घरात राहात असेल तर या कलमाद्वारे घरभाडे भत्त्याची (इतर अटींची पूर्तता…

पहिले घर घेताय ???

आपले पहिले घर घेण्यासाठी लक्षपूर्ण नियोजन करण्याची आवश्यकता असते, कारण हा कदाचित कोणासाठीही सर्वात मोठा निर्णय असतो. वयवर्ष २५ पासून आपण ३५ वर्षांचे होईपर्यंत घर खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. आपण वेतन म्हणून २८,००० ते ३०,००० रुपये दरमहा कमवत आहेत; तर down payment साठी आपण दरमहा ८,००० रुपये वाचवायला हवे. प्रत्येक वर्षी आपली बचत मूलभूत रक्कम १०% ने वाढवावी. अशा प्रकारे बचत केल्याने आपण १० वर्षांच्या कालावधीत १५ लाख रुपयांची निधी जमवू शकता, जे सुमारे ७५ लाख रुपयांचे घर विकत घेण्यासाठी डाउन पेमेंट करण्यास पुरेसे ठरेल. मात्र बचत योजनांचा निधी जमवण्यासाठी वापर करू नये, कारण ७५ लाख रुपयांपर्यंतचे उपलब्ध असलेले…

संधी गमावू नये…

एप्रिल 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली होती, पण "निफ्टी'ची हालचाल सप्टेंबर 2013 मध्येच सुरू झाली होती. 5200 अंशांच्या पातळीवरून नोव्हेंबरपर्यंत तो 6300 अंशांच्या पातळीपर्यंत वधारला होता. नोव्हेंबर 2013 पासून फेब्रुवारी 2014 पर्यंत "निफ्टी' 6000 ते 6300 या पातळीमध्येच खेळत राहिला. याचा अर्थ असा, की निवडणुकीच्या निकालांचा अंदाज बाजार घेत होता. मग मार्च महिन्यापासून त्याला दिशा मिळाली आणि "निफ्टी' 6300 च्या पुढे वाटचाल करू लागला. या वेळीसुद्धा ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2018 मध्ये "निफ्टी' 10,000 अंशांच्या पातळीवरून 11,000 अंशांच्या पातळीपर्यंत वाढला आहे. त्यानंतरचा पुढील तीन-चार महिन्यांचा कालावधी पाहिला, तर तुमच्या लक्षात येईल, की त्यामध्ये पण साम्य आहे. नोव्हेंबर 2018 पासून आतापर्यंत 10,500…

What are some of the mistakes of Indians that are destroying their financial lives?

What are some of the mistakes of Indians that are destroying their financial lives? 1. Buying insurance policies for investment purpose : Have you invested your money in insurance plan to get a return in future? Big mistake! Out of 100 people I have spoken, 95 have made this mistake.. Very few people understand the difference between term plan, endowment plan, etc. 2. Not able to crack the credit card mystery: : Are you paying the minimum amout due on your credit card payment? If yes, you are trapped in credit card mystery. On the other side, very few people…

End of content

No more pages to load