प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंड—हे वाचाच

प्रिन्सिपल म्युच्युअल फंडाने आज प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडसाठी त्यांच्या न्यू फंड ऑफर (एनएफओ) सादर करत असल्याची घोषणा केली. ही ओपन एंडेड (खुली योजना) इक्विटी स्कीम मुख्यत्वे स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणार आहे. या योजनेद्वारे दीर्घकाळात अधिक परतावा देऊ शकण्याची क्षमता असणाऱ्या छोट्या कंपन्यांना शोधून त्यात गुंतवणूक केली जाणार आहे. हा एनएफओ  २२ एप्रिल रोजी खुला झाला असून ६ मे २०१९ पर्यंत खुला राहणार आहे.   प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात स्मार्ट ट्रिगर एनेबल्ड प्लॅन (एसटीईपी-स्टेप) आणि ऑटो ट्रिगर अशा सुविधा आहेत. बाजारपेठेत काळानुसार येणारे धोके कमी करण्यासाठी बहुविध प्रकारे गुंतवणूक करून बाजारपेठेत प्रचंड पडल्यास गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याचा उद्देश स्टेपमध्ये ठेवण्यात आला…

टीसीएस आणि इंडिया पोस्ट एकत्र

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) भारतीय पोस्ट ऑफिसबरोबर अत्याधुनिकीकरणासंदर्भातील करार केला आहे. या कराराद्वारे टीसीएस अनेक पातळीवरील अत्याधुनिक सुविधा पोस्ट खात्याला उपलब्ध करून देत आहे. पुढील काही वर्षांसाठीचा हा करार आहे.    याद्वारे अत्याधुनिक डिजिटल हब, मेल आणि पॅकेजेसची डिलिव्हरी टीसीएस पोस्ट ऑफिसला उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांनासुद्धा अत्याधुनिक सेवा पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय महसूलाचे नवे मार्ग शोधण्यासाठी काही नाविन्यपूर्ण सेवांचीही पोस्ट ऑफिसमध्ये सुरूवात करून दिली जाणार आहे.    टीसीएस पोस्टामध्ये कोअर सिस्टम इंटेग्रेशनची अंमलबजावणी करणार आहे. ही एक एंटरप्राईझेस रिसोसर्स प्लॅनिंग (ईआरपी) यंत्रणा असून त्याद्वारे मेल, फायनान्स आणि अकाऊंटिंग, एचआरचे कामकाज यासारख्या विभागांचे कामकाज हाताळले जाणार आहे.    टीसीएसच्या…

टीडीएसच्या दाखल्यात बदल

form 16 या नावाने प्रचलित असणाऱ्या अर्जाच्या स्वरूपात प्राप्तिकर खात्याने काही बदल केले आहेत. हा अर्ज अधिक सर्वसमावेशक व तपशीलवार करून करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. नवीन बदल कोणते? नवीन अर्जात कर्मचाऱ्यांना अधिक तपशीलवार माहिती द्यावी लागणार आहे. गृहमालमत्तेपासूनचे उत्पन्न, अन्य आस्थापनांकडून मिळणारे उत्पन्न, विविध करबचत योजनांमधील गुंतवणुकीची तपशीलवार माहिती, प्राप्त झालेले विविध भत्ते तसेच अन्य स्रोतांतून झालेले उत्पन्न याची माहिती या अर्जात द्यावी लागेल. बचतीच्या योजनांमधील व्याजापोटी मिळणारी करवजावट, सवलत आणि अधिभार या माहितीसाठीही नव्या अर्जांत रकाने आहेत. नोकरदार व्यक्ती व ज्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची गरज नाही अशा व्यक्तींच्या करविवरणाच्या अर्जाची अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आहे. या…

शेअर्स-म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि कर

शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून प्रामुख्याने दोन प्रकारचे उत्पन्न मिळते : १. लाभांश २. विक्रीतून किंवा हस्तांतरणातून मिळणारा भांडवली नफा या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नाची कर आकारणी गुंतवणुकीच्या प्रकारावर अवलंबून असते. लाभांश उत्पन्न : शेअर्सवरील लाभांश : कंपन्यांच्या शेअर्सवर एका आर्थिक वर्षांत मिळणारा लाभांश १० लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे. या रकमेपेक्षा जास्त मिळणाऱ्या लाभांशावर १० टक्के इतक्या दराने कर भरावा लागतो, करदात्याच्या कराचा स्लॅब कोणताही असला तरी. शिवाय या रकमेतून कोणतीही वजावट मिळत नाही. १० लाख रुपयांपर्यंतचा लाभांश करमुक्त असला तरी तो विवरणपत्रात ‘करमुक्त उत्पन्न’ या सदरात दाखवावा लागतो. म्युच्युअल फंडावरील लाभांश : म्युच्युअल फंडावरील लाभांश हा करदात्यांसाठी करमुक्त आहे. मागील…

अर्थसंस्कार म्हणजे नक्की काय?

अर्थसंस्कार म्हणजे नक्की काय? माझ्यासाठी या अवजड शब्दांचा अर्थ हा असा – आयुष्य जगण्यासाठी नीतिमत्तेला अनुसरून, स्वतचं कौशल्य वापरून पैसे कमावणं व त्याचा गरजेनुसार वापर करणं, वेळोवेळी इतर गरजूंना मदत करणं आणि मग पुढच्या पिढीसाठी ठेवणं. अशा प्रकारे मिळालेली संपत्ती ही पुरून उरते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाधान देते.  ‘मला माझ्या लहानपणी जे मिळालं नाही ते मी माझ्या पाल्याला देणार!’ ही मानसिकता जवळ जवळ सगळ्याच पालकांची असते. पण मुलांची खरी गरज आणि स्वतची ऐपत हे कुणी तपासतंय का? आणि जिथे पालकांना आर्थिक शिस्त नसेल तर मग मुलांना कोणते धडे मिळणार? खालील मुद्दे तपासून आपल्यावर व आपल्या पाल्यावर आपण अर्थासंस्कर करू…

गृहकर्ज घेताय?

गृहकर्ज घेणे हा कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठा महत्त्वाचा आर्थिक निर्णय असतो. त्यामुळे कर्जदाराला पात्रता, कर्ज घेण्यापुर्वी करावा लागणारा खर्च यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींची संपूर्ण माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे. ह्या ठिकाणी अशा काही मूलभूत गोष्टींची माहिती देण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकाला अनवधानाने दुर्लक्ष होणे टाळण्यास मदत होईल. गृहकर्जासाठी पात्रता निकष अर्जदाराने गृहकर्ज घेण्यासाठी त्याच्या/तिच्या पात्रतेचा अंदाज घेणे ही पहिली महत्त्वाची बाब आहे. पात्रतेसाठी आवश्यक दोन सर्वाधिक महत्त्वाचे निकष म्हणजे स्थिर मिळकत आणि उत्तम क्रेडिट रेटिंग. मागील क्रेडिट पेमेन्टसच्या बाबतीत अर्जदाराने हलगर्जीपणा केलेला (डिफॉल्टर) असता कामा नये. अर्जदारापाशी सर्व आवश्यक आणि पडताळणी केलेले आर्थिक दस्तऐवज उपलब्ध असले पाहिजेत. गृहकर्जाचा खर्च गृहकर्जावर वेगवेगळ्या…

(2019) ‘एसआयपी’साठी उत्तम”-एस नरेन

भारतीय शेअर बाजार हा सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. परकी संस्थात्मक गुंतवणूकदार हे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारातील कंपन्यांसाठी चालू वर्ष फायदेकारक राहील. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात अस्थिरता दिसू शकते. त्यामुळे संधीचा फायदा घेऊन अस्थिरता टाळण्यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपीचा मार्ग उत्तम राहील असा विश्वास आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाचे मुख्य आर्थिक सल्लागार एस नरेन यांनी इंग्रजी वृत्तसंस्था 'इकॉनॉमिक टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यामध्ये इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंडात जोरदार कमबॅक केले आहे. विद्यमान सरकारच पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता अनेक सर्वेमधून समोर आल्याने इक्विटीमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. मार्च…

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ

छोट्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ सुरूच ठेवला आहे. मार्च महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात 8,055.35 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मागील वर्षी याच कालखंडाशी तुलना करता त्यात 13 टक्क्यांची वाढ झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यात एसआयपीद्वारे 8,094 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.    'एसआयपीमध्ये आम्हाला सातत्याने वाढ होतानाच दिसते आहे. काही महिन्यांमध्ये जरी त्यात घट झालेली दिसली तरी ती नगण्यच आहे. नवीन एसआयपी खाती सुरू होण्यात मात्र खंड पडलेला नाही. मार्च महिन्यात तीन लाख नवीन एसआयपी खाती उघडण्यात आली आहेत', असे मत अॅम्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस व्यंकटेश यांनी व्यक्त केले आहे.    मार्चअखेर म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 23.80 लाख…

जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदी डेव्हिड मालपास

जागतिक बॅंकेच्या 13 व्या अध्यक्षपदावर डेव्हिड मालपास यांची निवड झाली आहे. जागतिक बॅंकेकडून कार्यकारी मंडळाकडून 63 वर्षीय मालपास यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. डेव्हिड मालपास सध्या ट्रेझरी फॉर इंटरनॅशनल अफेअर्सच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मालपास 9 एप्रिलपासून सांभाळणार आहेत. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. जागतिक बॅंकेचे आतापर्यतचे सर्व तेरा अध्यक्ष हे अमेरिकीचे आहेत. जागतिक बॅंकेचा अध्यक्षपदी असणारी व्यक्ती इंटरनॅशनल बॅंक फॉर रिकन्स्ट्रक्शन अॅंड डेव्हलपमेंट (आयबीआरडी) आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन (आयडीए) यांच्या संचालक मंडळाच्याही प्रमुखपदी असते.

अर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान

अर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान आहे ते पुरेसा निवृत्ती निर्वाहनिधी असणं. आपण साठीत रिटायर होतो तेव्हा पुढे साधारणपणे २०-२५ वर्षांच्या काळासाठी सोय करतो. परंतु जर रिटायरमेंट पन्नाशीत घ्यायची असेल, तर पुढे ३०-३५ वर्षांचा मोठा काळ लक्षात घ्यायला हवा. साधारणपणे साठीपर्यंत कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात, त्यामुळे नंतर आरोग्याव्यतिरिक्त कुठलेही मोठे खर्च नसतात. पण आजकाल लग्न आणि मुलं दोन्ही उशिरा झाल्याने तसंही हे समीकरण बदलत चाललंय. त्यात जर मुलांचं शिक्षण, त्यांची लग्नं, स्वतचं घर असे सगळे खर्च रिटायरमेंटनंतर भागवावे लागले तर तारेवरची कसरत. जर व्यवस्थित आर्थिक नियोजन केलेलं नसेल तर पसे कमी पडण्याची शक्यता जास्त असते. आर्थिक नियोजन करताना आपण काही अंदाज…

End of content

No more pages to load