निवृत्ती नियोजन !!

At our prime, we plan for all kinds of financial goals – children's education, a home, vacations – but retirement is often the last thing on our mind. However, looking at few hard facts you will realise that retirement planning is not optional anymore. It is a must do, and the sooner the better. In the old days, the average individual spent about 20-25 years in the retirement phase. This is changing with the millennial that aspires to retire before 50. Combine this with increasing life expectancy, and you have an average retirement phase of 35 to 40 years. Combine…

आर्थिक सल्लागार निवडताना —

आर्थिक उत्पादनांचे वितरक आणि आर्थिक सल्लागार म्हणजे एकच असे वरवर वाटले तरी दोघांच्या कामाच्या स्वरूपात खूप फरक आहे. दोघांमध्ये फरक काय? आर्थिक उत्पादनांचे वितरक हे गुंतवणुकीबाबत सल्ला देत नाहीत, तर ते केवळ तुमच्यासमोर विविध आर्थिक उत्पादने ठेवतात. तुम्हालाच तुमची गरज ओळखून त्यानुसार निवड करावी लागते. त्याबदल्यात त्यांना संबंधित कंपन्यांकडून कमिशन मिळते. यामुळे बहुतांश वेळा त्यांच्याकडून ग्राहकाची खरी गरज काय आहे, हे पाहण्यापेक्षा आपल्याजवळ असलेल्या आर्थिक उत्पादनांची विक्री करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जाते. दुसरीकडे आर्थिक सल्लागार मात्र ग्राहकाची नेमकी गरज काय आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आपल्या ग्राहकाची आयुष्यातील उद्दिष्टे काय आहेत, हे जाणून घेऊन, त्याच्या गरजांचा सखोल अभ्यास आणि…

म्युच्युअल फंड —- पुन्हा गुंतवणूक बहर

केंद्रात पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी सशक्त संख्याबळासह आल्याने बळावलेल्या बाजार भावना म्युच्युअल फंड उद्योगाच्या पथ्यावर पडल्या आहेत. या उद्योगाची एकूण गंगाजळी ही सरलेल्या मे महिनाअखेर काहीशी वाढून २५.४३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. विशेषत: अधिक जोखीम असलेल्या समभागसंलग्न (इक्विटी) फंडांमधील वाढलेले योगदान याला कारणीभूत ठरले आहे. म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’कडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार, एप्रिल २०१९ अखेर देशातील सर्व म्युच्युअल फंडांकडील गुंतवणूकयोग्य गंगाजळी (एयूएम) २५.२७ लाख कोटी रुपये होती, ती मे महिनाअखेर २५.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. समभागसंलग्न योजनांमधील या महिन्यांतील नक्त गुंतवणूक ओघ हा ५,४१० कोटी रुपयांचा राहिला. उल्लेखनीय म्हणजे यातील जवळपास निम्मा वाटा म्हणजे २,७०० कोटी रुपयांचा…

गुंतवणुकीची माहिती एॅपवर

गुंतवणुकीची माहिती सुरक्षित राहावी, तसेच गुंतवणूकदाराच्या कुटुंबीयांना त्याबाबत माहिती मिळावी म्हणून इन्व्हेस्टमेंट सेफगार्ड नावाचे ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. व्हर्च्युअल तिजोरीवर आधारित असलेले अशाप्रकारचे देशातील हे पहिलेच अॅप आहे.   भारतात सुमारे ६४ बँकांमध्ये ११ हजार ४०० कोटी रुपये दाव्यांशिवाय पडून आहे. बऱ्याचदा कुटुंबीयांना घरातील कर्त्या व्यक्तींने कुठे गुंतवणूक केली आहे याची माहिती नसते. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत माहिती सुरक्षित ठेवली जाईल शिवाय गरजेच्यावेळी गुंतवणुकीचा तपशील कुटुंबीयांना उपलब्ध करून दिला जाईल, अशा संकल्पनेतून अॅपची  निर्मिती केल्याचे संदीप सानप यांनी सांगितले.    ऍपमध्ये प्रोफाइल तयार केल्यानंतर त्यात वित्तीय तपशील सेव्ह करता येतो. गुंतवणुकीचा तपशील एन्क्रिप्ट केल्यानंतर सर्व्हरवरवर पाठविला जातो. त्यामुळे…

सावधान !! फसवणूक होत आहे… !

अलीकडच्या काळात आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत चाललेल्या दिसत आहेत. रोजच्या वृत्तपत्रात अशा बातम्या वाचनात येत आहेत. पुन्हा-पुन्हा लोक फसत आहेत. खूप जास्त व्याज मिळते म्हणून पैसे गुंतवणे किंवा व्याजाने देणे, शेअर्स किंवा तत्सम गुंतवणूकपर्यायात अवाजवी परताव्याचे आमिष दाखवून भुलवणे यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत. सोने स्वस्तात देतो, दागिन्यांना पॉलिश करून देतो, खजिना सापडला आहे तो तुम्हाला देतो, खूप व्याज देतो, तुमच्या जुन्या विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, इन्कम टॅक्‍स रिफंड मिळवून देतो, तुम्ही लकी ठरले आहात, मोठे गिफ्ट मिळणार आहे, स्वस्तात डॉलर देतो, असे अनेक फसवणुकींचे प्रकार पाहायला मिळत आहेत. पण अशा ठिकाणी दिलेले पैसे परत मिळतील काय,…

डीवीडन्ड म्हणजे काय ?

शेअरवरील लाभांश हा शेअरच्या दर्शनी मूल्यावर (फेस व्हॅल्यू) दिला जातो. उदाहरणार्थ, एका नामांकित कंपनीच्या शेअरचा सध्याचा बाजारभाव 200 रुपये आहे (ज्याचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे), असे समजूया. अशा कंपनीने 30 टक्के लाभांश जाहीर केला तर मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम 3 रुपये असेल. कारण शेअरचा बाजारभाव 200 रुपये असला तरी मिळणारा लाभांश हा त्या बाजारभावाच्या 30 टक्के नसून, दर्शनी मूल्याच्या (म्हणजेच 10 रुपयांच्या) 30 टक्के आहे, हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवले पाहिजे. गुंतवणूकदाराने तो शेअर 200 रुपयांना खरेदी केला तर मिळणारा 3 रुपये लाभांश हा त्याच्या गुंतवणुकीच्या फक्त दीड टक्का आहे. शेअर बाजाराच्या तांत्रिक भाषेत सांगायचे झाले तर या शेअरचा "डिव्हिडंड यिल्ड'…

मोदी सरकारचा 2019-20 साठीचा अर्थसंकल्प 5 जुलैला…

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला सादर होणार आहे. नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 5 जुलैला लोकसभेमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार या अर्थसंकल्पात आपल्या पोतडीतून काय काढते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

आपल्या आवडीसाठी —-

आपल्या आवडी शिस्तीने जोपासायच्या आणि त्याचबरोबर पुढचाही विचार करायचा. यासाठी आर्थिक नियोजन फायद्याचं ठरतं. म्हणून खालच्या टिप्स. प्रत्येक व्यक्तीने स्वत:मध्ये पहिली गुंतवणूक केली पाहिजे. तेव्हा मला काय आवडतं याचं उत्तर शोधा आणि त्यासाठी काय खर्च होतो हे माहीत करा. उदाहरण घ्यायचं तर एखादं वाद्य शिकायची इच्छा असेल तर त्या वाद्याची किंमत, शिकायचा खर्च आणि त्याच्याशी निगडित प्रवास व इतर खर्च या सर्वाचा विचार झाला पाहिजे. कुठला खर्च टप्प्याटप्प्याने करता येतो आणि कुठला एकहाती करावा लागतो याची शहानिशा करा. त्यानुसार आपण खर्चाच्या वेळेचे नियोजन करू शकतो. फिरण्याच्या बाबतीत म्हणायचं तर हात आखडता ठेवून फिरण्यात मजा नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे.…

साइड पॉकेटिंग म्हणजे काय?

डेट फंड योजनांच्या परताव्यातील जोखमीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सेबीने 'साइड पॉकेटिंग'च्या पर्यायास मान्यता दिली आहे. काही फंड हाऊसनी आपल्या योजनांमध्येच या वैशिष्ट्याचा समावेश केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या वित्तीय संस्थांमध्ये फंड कंपन्यांनी गुंतवणूक केली असल्याने रोख्यांच्या परताव्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. अशावेळी फंड कंपन्यांपुढे साइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय उपलब्ध असतो... .. साइड पॉकेटिंग म्हणजे काय? डेट पोर्टफोलिओमधील एखादा गुंतवणूक घटक धोकादायक किंवा खराब स्थितीत पोहोचल्यास ती गुंतवणूक अन्य लिक्विड गुंतवणुकीपासून वेगळी करण्याचा मार्ग म्हणजे साइड पॉकेटिंग. या धोकादायक गुंतवणूक घटकामुळे पूर्ण पोर्टपोलिओच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्यास साइड पॉकेटचा पर्याय वापरला जातो. बाजारातील चढउतारांमुळे एखाद्या फंडात मोठा हिस्सा बाळगणारे…

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा ‘एमएनसी फंड’

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवा 'एमएनसी फंड' बाजारात आणला आहे. ही एक ओपन एंडेड योजना असून या फंडाद्वारे मुख्यत्वे: एमएनसी कंपन्यांच्या शेअरमध्ये केली जाणार आहे. नव्या फंडाची ऑफर (एनएफओ) 28 मे ला गुंतवणूकीसाठी खुली झाली आहे. एनएफओची अंतिम मुदत 11 जून आहे. 'एमएनसी कंपन्या चांगले व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय ब्रॅंड, भक्कम बॅलन्स शीट यासारख्या वैशिष्ट्यांनी युक्त असतात. याआधीच्या अनुभवानुसारही एमएनसी कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे', असे मत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा यांनी व्यक्त केले आहे. आयसीआयसीआय एमएनसी फंडाद्वारे भारतीय मल्टी नॅशनल कंपन्या, भारतात नोंदणी झालेल्या मल्टी नॅशनल कंपन्या त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मल्टी नॅशनल…

End of content

No more pages to load