करचोरी रोखण्यासाठी नियम

करपात्र उत्पन्न नसल्याचे सांगत विवरणपत्र न भरणाऱ्या मात्र भरमसाट खर्च करणाऱ्या नागरिकांना चालू वर्षापासून विवरणपत्र भरावे लागणार आहे. विदेशातील पर्यटनावर दोन लाख रुपये खर्च करणारे, बँक खात्यात वर्षभरात एक कोटी रुपयांची रक्कम जमा करणारे व ज्यांच्या वार्षिक वीजदेयकाचा एकूण खर्च एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना प्राप्तिकर विवरणपत्र सादर करणे अनिवार्य ठरणार आहे. या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न करकक्षेत मोडत नसले तरीही त्यांना विवरणपत्र भरावे लागेल, असे अर्थसंकल्पासंबंधी कागदपत्रांत स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९मध्ये बदल करण्यात येणार आहे.

मुलांसाठी गुंतवणूक

मुलांच्या भवितव्यासाठी बाजारात अनेक योजना असल्याने  निवडीचा गोंधळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर काही खात्रीशीर चांगल्या योजनांचा घेतलेलाआढावा... सुरक्षितता, चांगला परतावा आणि रोकड सुलभता असणारी तसेच जोडीला करसवलतही देणारी योजना म्हणजे चांगली योजना असे समजले जाते. अनेक प्रकारच्या योजना सरकार, बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, म्युच्युअल फंडाच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या यांनी बाजारात आणल्या आहेत. दुर्दैवाने वरील सर्व अपेक्षा पूर्ण केल्या जातील अशी एकही योजना नाही. छोटे विभक्त कुटुंब, वाढती महागाई आणि शिक्षणावरील खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ यांमुळे अनेकांना मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काहीतरी भरीव तरतूद आधीपासूनच करावी, असे कायम वाटते. लोकांच्या या मानसिकतेचा विमा कंपन्या पुरेपूर फायदा घेत असून, मुलांच्या कल्याणासाठी म्हणून…

Clarity on stamp duty tax in mutual fund on July 5

Post the Union Budget 2019 scheduled on July 5, investment in direct stocks, mutual funds, ULIPs and NPS would become a bit more expensive for investors. The new finance minister Nirmala Sitharaman is likely to bring clarity on the stamp duty tax on financial securities transactions, which was re-introduced in the interim budget 2019, said three MF CEOs. The CEO of a top fund house requesting anonymity said that earlier AMFI had also sought clarification on who will bear the stamp duty tax on such transactions. Currently, TER does not include stamp duty tax. Hence, clarity on changes to TER…

टाटा मोटर्सची पहिली इलेक्ट्रिक कार बघितली का?

टाटा मोटर्सने नुकतीच पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. टाटाने टिगोर या गाडीचे Tigor EV नावाने आता इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले आहे.  एकदा गाडी पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ती 142 कि.मी. अंतर धावणार आहे. शिवाय कंपनीकडून तीन वर्षाची आणि 1 लाख 25 हजार किमीची वॉरंटी देण्यात आली आहे. टाटाने टिगोर EV ची 9.99 लाख रुपये एक्स शोरुम किंमत निश्चित केली आहे. यामध्ये सबसिडीचा देखील समावेश करण्यात आला आहे. टाटा टिगोर EV व्हर्जन: टाटा टिगोर EV XM आणि : टाटा टिगोर EV XT व्हर्जन असे दोन व्हर्जन सादर करण्यात आले आहे. टाटा टिगोर EV XM : 9.99 लाख रुपये टाटा टिगोर EV…

फंड आणि रोख्यांमधील गुंतवणुकीबाबत सेबीची कठोर पाऊले

म्युच्युअल फंड क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी सेबीने आता पाऊले उचलली आहेत. आर्थिक क्षेत्रातील आयएल अँड एफएस, एस्सेल, डीएचएफएलसारख्या  प्रकरणांमुळे म्युच्युअल फंड क्षेत्रात अस्वस्थतता पसरली आहे. यामुळेच म्युच्युअल फंड, रोख्यांमधील गुंतवणुकीबाबत भांडवली बाजार नियामक सेबीने  कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.   सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सेबीने कठोर पावले असून मोठ्या कंपन्यांचे मोठे गुंतवणूकदार तसेच प्रवर्तक यांना वेळोवेळी माहिती जाहीर करण्यास बंधनकारक केले आहे. पतमानांकन संस्था, प्रवर्तकांचे समभाग, लिक्विड फंड आणि स्वामित्त्व मूल्य याबाबतच्या सुधारणांचे संकेतही देण्यात आले आहे. शिवाय शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांचे शेअर तारण ठेवून कर्ज उचलण्याबाबत कंपन्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. कारण एस्सेल…

आता E-KYC सावंतवाडी शक्य —

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी KYC असणे अनिवार्य आहे !! कोणत्याही एका AMC कडे आपली KYC असली तरी आपण इतर कोणत्याही AMC कडे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो !! पण प्रथमच नव्याने गुंतवणूक करण्यासाठी KYC संबंधीचे कागद  प्रत्यक्ष post करणे आवश्यक असते !! पण या नव्या तंत्रज्ञान युगात हिअडचण सुद्धा CAMS ने दूर केली असून सिंधूदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे E-KYC सुविधा शेअरखान सावंतवाडी या कार्यालयात नव्याने कार्यान्वित झाली आहे !तरी गुंतवणुकदारानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदीप जोशी यांनी केलेआहे.

‘कोटक फोकस्ड इक्विटी फंड’ बाजारात…

कोटक अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने (एएमसी) आपला नवा फंड, कोटक फोकस्ड इक्विटी फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड आहे. या फंडाद्वारे लार्ज-कॅप, स्मॉल-कॅप, मिड-कॅप श्रेणीतील एकत्रितरित्या 30 शेअरमध्ये (कमाल) गुंतवणूक करण्यात येणार आहे. नव्या फंडाची ऑफर (एनएफओ) 25 जूनला गुंतवणूकीसाठी खुली होत असून 9 जुलै ही त्याची अंतिम तारीख आहे. या फंडाचा बेंचमार्क निफ्टी 200 टीआरआय असणार आहे. नव्या 'कोटक फोकस्ड इक्विटी फंड'चे व्यवस्थापन शिबानी कुरियन आणि हरीश कृष्णन करणार आहेत. 'कोटक फोकस्ड इक्विटी फंडद्वारे जोखीम आणि परतावा तत्वावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. या फंडासाठी शेअर निवडताना बॉटम अप पद्धती अवलंबण्यात येणार आहे. कंपनीचा व्यवसाय, व्यवस्थापन…

क्रेडिट कार्डांबद्दल—-

क्रेडिट कार्डाचे फायदे अनेक आहेत. क्रेडिट कार्डे पेमेंटच्या बाबतीत लवचिक असल्याने कार्डधारकाला आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे करता येते. कार्डधारकाला मोठ्या रकमांची खरेदी किंवा क्रेडिट कार्डाचे थकलेले संपूर्ण बिल सोयीस्कर ईएमआयमध्ये रूपांतरित करता येऊ शकते व विशिष्ट कालावधीमध्ये त्याची फेड करता येऊ शकते. त्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. तसेच, कार्डधारकांना डेबिट कार्डांच्या तुलनेत क्रेडिट कार्ड वापरून अधिक रिवॉर्ड पॉइंट मिळवता येऊ शकतात. हे रिवॉर्ड पॉइंट कॅटलॉग, व्हाउचर, विमानाची तिकिटे, मूव्ही ऑफर यासाठी वापरता येऊ शकतात.    उत्तम क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरते. त्यामुळे, क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरली तर चांगला क्रेडिट तयार करण्यासाठी मदत होते व त्यामुळे कर्ज…

मुलाचे अनोखे ‘बंधन’ SWP द्वारे

भारतात सध्या असे अनेक पालक आहेत की ज्यांची मुले ही शहरांमध्ये राहतात आणि वडील गावी निवृत्ती जीवनाचा आनंद घेत आहेत. मात्र अशा पालकांना जर ठराविक रक्कम नियमितपणे मिळावी असं त्यांच्या मुलांना वाटत असेल तर त्याची सोय एसबीआय म्युच्युअल फंडाने ‘एसडब्ल्यूपी-बंधन’द्वारे केली आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या 'बंधन' या नावातून आपल्याला अंदाज येतो की आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. ज्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं. लहानपणीचे सर्व हट्ट पूर्ण केले. आता त्या प्रेमाची परतफेड नाही मात्र स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर ‘एसडब्ल्यूपी-बंधन’च्या माध्यमातून जबाबदारी पार पाडता येईल. मुलगा-मुलगी आपल्या आई-वडिलांपासून कितीही दूर असला तरी त्यांना नियमित पैसे मिळवून देण्याची सोया यातून करू शकतो. ‘एसडब्ल्यूपी-बंधन’…

End of content

No more pages to load