कर भरण्याविषयी —-

कर भरण्याविषयी खाली पाच गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे:   १. फॉर्म-१६, फॉर्म-१६ए आणि फॉर्म-२६एएस दरम्यान रिकंसिलिएशन होणे   फॉर्म-१६ व फॉर्म-१६ए हे टीडीएस प्रमाणपत्र आहेत जे डिडक्टीला प्रदान केले जातात. नियोक्त्याद्वारे कर्मचाऱ्याला वार्षिक स्वरूपात फॉर्म-१६ प्रदान केले जाते आणि फॉर्म-१६ए डिडक्टरद्वारे (जसे की बँका) डिडक्टीला तिमाही स्वरूपात प्रदान केले जातात. फॉर्म-१६ए वेतनाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या टीडीएससाठी आहे.    अलीकडेच, फॉर्म-१६ भाग-बी च्या स्वरूपात प्रमुख बदल घडून आलेले आहेत. नवीन स्वरूपात एचआरए, एलटीए, ग्रॅच्युइटी इत्यादी सवलतीच्या भत्त्यांविषयी अधिक तपशील द्यावा लागतो आणि कलम ८० कपातीचे तपशील वेगळे नमूद करावे लागतात. तसेच, नियोक्त्यांना आता ट्रेसेस पोर्टलवरून संपूर्ण…

आरटीजीएसबद्दल मोठा निर्णय

रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देत रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएसच्या वेळेत वाढ केली आहे. आता आरटीजीएसच्या माध्यमातून संध्याकाळी उशिरापर्यंत पैसे पाठविता येणार आहे. आरटीजीएसच्या वेळेत दिड तासांची वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 जूनपासून वेळ वाढविण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.   सध्या आरटीजीएसमार्फत दुपारी साडेचारपर्यंत पैसे पाठविता येतात.  ‘आरटीजीएस’ या प्रणालीच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतर करता येते. आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) पद्धत सर्वसाधारणपणे देशातील केंद्रीय बँकांकडून वापरली जाते. मोठे व्यवहार आरटीजीएसमार्फत सुरक्षितरीत्या केले जातात. आरटीजीएस ही एक आर्थिक व्यवहाराची अशी पद्धत आहे की त्यात एका बँकेतून दुसर्‍या बँकेत आर्थिक हस्तांतरण होता वास्तविक वेळेत…

‘एनएफओ’ची लोकप्रियता वाढीस

शेअर बाजारात इक्विटी / कॅपिटल मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ज्याप्रमाणे 'आयपीओ'ला मागणी असते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत 'एनएफओ'ची (न्यू फंड ऑफर) मागणी वाढत आहे. म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या अँफीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये  झालेल्या एकूण गुंतवणुकीत एनएफओ मार्फत झालेल्या गुंतवणुकीचा वाटा तब्बल 20 टक्के इतका राहिला आहे. मागील वर्षी इक्विटी म्युच्युअल फंडात एकूण  1.18 लाख कोटींची गुंतवणूक झाली. यापैकी इक्विटी योजनेच्या प्रारंभी म्हणजे 'एनएफओ' द्वारे तब्बल 25 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.   मागील वर्षी एकूण 77 इक्विटी प्रकारातील योजना म्युच्युअल फंड कंपन्यांकडून सादर केल्या गेल्या आहेत. यामध्ये 70 पूर्णपणे इक्विटी, 3…

मुलांना द्या आर्थिक धडे!

तुमच्या मुलाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्याचे अनेक मार्ग आहेत. यातील काही गोष्टींसह तुम्ही सुरुवात करू शकता: ●        बचतीचे महत्त्व: मुलांना त्यांच्या पॉकेटमनीतून बचत करण्यास प्रोत्साहन द्या. गरज आणि इच्छा यातील फरक त्यांना स्पष्ट करून सांगा. उदाहरणार्थ, आईला वाढदिवसानिमित्त घेण्याची भेटवस्तू किंवा डिसनीलॅण्डमधील खरेदी यातील फरक सांगा. यामुळे दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य होतील. दिलेल्या कालावधीत विशिष्ट रकमेची बचत केल्याबद्दल तुम्ही तुमच्या मुलाला बक्षीस देऊ शकता. असे उद्दिष्ट निश्चित करून दिल्यामुळे मुले सर्व प्रकारच्या पैशाकडे समान आदराने बघतील. मुलांच्या सर्व खर्चाची नोंद ठेवणारे रंगीत शीट, लहान मुलांसाठी पासबुक या काही मार्गांनी तुम्ही त्यांना केलेल्या खर्चाची नोंद ठेवण्याची सवय लावू शकता. ● …

इक्रा ऑनलाईनचा नवा क्लाऊड बेस्ड ‘म्युच्युअल फंड ट्रॅकर’

इक्रा (आयसीआरए) ऑनलाईनने नवा क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित पोर्टफोलिओ ट्रॅकिंग आणि रिपोर्टिंग करणारा म्युच्युअल फंड ट्रॅकर बाजारात आणला आहे. इक्रा ही एक आघाडीची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. या म्युच्युअल फंड ट्रॅकरमुळे आर्थिक सल्लागार, वितरक आणि वेल्थ मॅनेजरना मोठाच फायदा होणार आहे. या ट्रॅकरमुळे फंड सल्लागारांना महत्त्वाच्या माहितीचे विश्लेषण तसेच फंडाची हाताळणी करताना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहे.   नवा म्युच्युअल फंड ट्रॅकर संगणक, टॅबलेट्स आणि स्मार्टफोनवर वापरता येणार आहे. देशातील म्युच्युअल फंडात होत असलेली मोठी गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यात दुवा साधण्याचे काम म्युच्युअल फंड ट्रॅकर करणार आहे. इक्रा ही एक आघाडीची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. या ट्रॅकरची रचना सल्लागारांना सोप्या पद्धतीने हाताळता येईल अशी…

अनिश्चित खर्चासाठी—-

आर्थिक नियोजन करताना सर्वसाधारणपणे यादीत असणारी उद्दिष्टं म्हणजे – मुलांचे शिक्षण, मुलांची लग्न आणि निवृत्ती निधी. या सर्वाची तरतूद झाली की मग नंबर येतो तो गाडी, परदेश प्रवास किंवा एखादा खर्चीक छंद. सगळे मोठे खर्च पटकन असे डोळ्यासमोर येतात आणि त्यानुसार नियोजन सुरू होतं. अशा प्रकारच्या नियोजनातून काही छोटे परंतु वारंवार होणारे खर्च अलगद निसटून जातात. हे खर्च तसे वार्षकि यादीतसुद्धा मोडत नसल्याने त्यांचा विसर पडणं साहजिकच आहे. परंतु यांचा विचार वेळीच झाला तर त्यानुसार तरतूद करता येऊ शकते.  घरातील विद्युत उपकरणे जसं की टीव्ही, वॉिशग मशीन, फ्रीज, मिक्सर, म्युझिक सिस्टीम, इत्यादी गोष्टींना एक वयोमर्यादा असते आणि त्यानुसार त्यांना बदलावं…

विद्यार्थ्यांना ‘पॉकेट्मनी’साठी मिळतेय कर्ज

शैक्षणिक कर्जाबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती असते. शक्यतो पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँका, एनबीएफसीज, यांबरोबरच अनेक स्टार्टअप कंपन्या विद्यार्थ्यांना कर्जे देत असतात. यामध्ये विद्यार्थ्याने निवडलेल्या कोर्सचे शुल्क आणि होस्टेल किंवा पुस्तके यांसारख्या घटकांचा विचार करून कर्जे दिली जातात. मात्र विद्यार्थ्यांना दैनंदिन पातळीवर आवश्यक असणाऱ्या खर्चाचा 'पॉकेटमनी'चा विचार होत नाही. नेमकी हीच बाब ओळखून मोठ्या प्रमाणात असलेल्या विद्यार्थी वर्गावर लक्ष केंद्रित करून अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात कार्यरत झाली आहेत.   तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांची खर्च करण्याची पद्धत यांसारख्या विविध बाबींचा विचार करून नवनवीन सर्जनशील स्टार्टअप कंपन्या या व्यवसायातील जोखीम आणि कमी नफ्यावर आधारित व्यवसायाचे मॉडेल घेऊन आल्या आहेत. विद्यार्थी आणि नुकत्याच पदवीधर…

नवीन सरकारसमोर प्रमुख पाच आर्थिक आव्हाने

निवडणूक निकालपूर्ण एक्झिट पोल्समध्ये पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीएचे सरकार येताना दिसत आहे. सर्व एक्झिट पोल्स बहुमताचे सरकार दाखवीत असल्याने शेअर बाजारात उत्साह संचारला आहे. मात्र, तत्कालीन 'रिऍक्शन' सोडल्यास आणि 23 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन सरकारसमोर मोठी आव्हाने असतील. यातील आर्थिक आवाहनांचा विचार करूया:   1) रोजगार/ नोकरी : देशांतर्गत तरुण लोकसंख्येचा विचार करता रोजगार उपलब्ध करणे हे सरकार समोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. प्रति महिना तब्बल 10 लाख युवक किंवा रोजगार मिळविण्यासाठी सक्षम मनुष्यबळ तयार होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये भारत सरकारने अधिकृतरित्या रोजगाराची आकडेवारी जाहीर केलेली नाही मात्र, जी माहिती मिळत आहे त्यानुसार बेरोजगारीचा दर मागील…

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे

मुदत ठेव योजना, सोन्यातील गुंतवणूक, रियल इस्टेट सारख्या पारंपरिक गुंतवणुकीची साधने वाढत्या महागाई किंवा अव्वाच्या सव्वा किंमतींमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरत नाहीत. तर दुसरीकडे, प्रचंड अस्थिरतेमुळे शेअर बाजारातील गुंतवणूक देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट असते. अशा वेळी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हुकमी एक्का ठरत आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे विशेष फायदे आहेत. त्याची थोडक्यात माहिती घेऊया. तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शन मिळतं प्रत्येक म्युच्युअल फंड हाउस त्यांचे फंड व्यवस्थापनेसाठी अनेक फंड मॅनेजर्स व फंड मॅनेजरला साहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम व व्यावसायिक तज्ञ यांची नेमणूक करत असतात जे तुमच्यासाठी सतत आर्थिक बाजारपेठेवर लक्ष ठेवून असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधील मार्केट ट्रेड्स व भावी संभाव्यता…

घरखरेदी करताना…

माझ्या एका माहितीतील व्यक्तीने आमच्याच जवळच्या गावात एक वर्षापूर्वी ३५ लक्ष रुपयांना flat खरेदी केला व सहा महिन्यात तो flat  २० लक्ष रुपयांना विकायचा आहे अशी जाहिरातही दिली हे का झाले याची चौकशी करता तो flat चौथ्या मजल्यावर असल्याने आणि लिफ्ट नाही म्हणून गैरसोयीचा आहे हे समजले -----याला काय म्हणावे ?? म्हणून घरखरेदी करताना... घर विकत घेण्याचा निर्णय झाला की सर्वप्रथम विचार करावा लागतो तो बजेटचा. त्यासाठी आपल्याजवळ शिलकी रक्कम किती उपलब्ध आहे याचा अंदाज घ्यावा. पुढल्या पाच वर्षात येणाऱ्या म्हणजेच मुलांचे शैक्षणिक  खर्च, घरातली लग्न, व इतर आणखी खर्चाचा अंदाज घेऊन शिलकी रक्कम ठरवावी. नंतर आपल्याला कर्ज किती उपलब्ध…

End of content

No more pages to load