गुंतवणुकीचा श्रीगणेशा—
नोकरी, व्यवसायाद्वारे कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तरुण, तरुणींना बचत व गुंतवणुकीबाबत फारशी माहिती नसते. अशा नवगुंतवणूकदारांनी पुढील गोष्टी लक्षात घेऊन बचतीचा श्रीगणेशा करावा. खर्चाचा आढावा आपल्या खर्चांवर नियंत्रण राखण्यासाठी व खर्चांचा मागोवा घेण्यासाठी बजेट निश्चित करणे आवश्यक असते. आपला सरासरी मासिक खर्च किती आहे व त्यातील किती रक्कम अनावश्यकपणे खर्च झाली आहे हे त्यातून लक्षात येते. सध्याच्या आधुनिक काळात यासाठी स्मार्टफोनमधील अॅप्सचाही वापर करता येतो. १५ टक्के बचत एकूण उत्पन्नाचा पाचवा भाग म्हणजे १५ / २० टक्के रकमेची बचत करण्याचा प्रयत्न करा. हे प्रमाण अनेकांना मोठे वाटेल. मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीला कौटुंबिक जबाबदारी व खर्चांचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे दरमहा एवढी रक्कम जमा होत…