फोकस्ड इक्विटी फंड

फोकस्ड फंड या फंड प्रकारात ‘सेबी’च्या नियमानुसार कमाल ३० समभागांत गुंतवणूक करणे आवश्यक असल्याने निधी व्यवस्थापक काळजीपूर्वक समभागकेंद्रित पोर्टफोलिओ तयार करतात. फोकस्ड फंड या फंड प्रकाराच्या या वैशिष्टय़ामुळे समभाग एकाग्रतेचा धोका अधिक असतो. फंडाच्या पोर्टफोलिओत निवडक समभागांची मात्रा अधिक असल्याने एखाद्या समभागाच्या किमतीत घसरण झाल्यास पोर्टफोलिओची कामगिरी खालवण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडलेल्या समभागांचे पोर्टफोलिओत प्रमाण निश्चित करतानाच जोखीम आणि परतावा यांच्यात समतोल साधावा लागतो. म्युच्युअल फंडाच्या ‘सेबी’च्या वर्गीकरणानंतर ‘अल्फा’ तयार करण्याची (संदर्भ मानदंडाहून अधिक परतावा) क्षमता या फंड प्रकारात जास्त आहे. म्हणूनच परंपरावादी जोखीमांक असलेले गुंतवणूकदार वगळता, जोखीम आणि परताव्याचा समतोल साधू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना तुलनेने अस्थिर, परंतु अधिक परताव्यासाठी या…

उज्ज्वल भविष्यासाठी- SIP

आपल्या मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आर्थिक तजवीज करणे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी, करिअरसाठी आजकाल बरेच पैसे मोजावे लागतात. यासाठी योग्य वेळी गुंतवणुकीला सुरवात करणे खूप महत्त्वाचे असते. पैशाला नीट समजून न घेतल्यामुळे अथवा योग्य प्रमाणात अर्थसाक्षरता नसल्याने आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम आपल्या पाल्यांच्या भविष्यावर होऊ नये, असे वाटत असेल; तर आपण वेळीच पावले उचलायला हवीत.   भविष्यात भांडवलवृद्धी आणि भांडवलसुरक्षा यांचा समतोल साधण्यासाठी म्युच्युअल फंडात मुलांच्या नावे "सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' (एसआयपी) सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. याद्वारे मुलांना दीर्घकालीन गुंतवणुकीचे रहस्यही आपण उलगडून दाखवू शकतो. "एसआयपी'द्वारे बाजारातील चढ-उतार…

‘वर्ल्ड सेव्हिंग डे’

आज जगभरात 'वर्ल्ड सेव्हिंग डे' साजरा केला जात आहे. चांगल्या जीवनमानासाठी उत्पन्नातून मिळालेल्या पैशाचा योग्य आणि विवेकी वापर करणे का गरजेचे आहे हे सांगणारा दिवस म्हणून याकडे पहिले जाते. वास्तविक भारत आणि पैशांची बचत हे दोन अगदी समानार्थी शब्द म्हणता येतील इतकी भारतात पैशांची बचत केली जाते. विशेषतः मागील काही काळापर्यंत तरी हे अगदी तंतोतंत खरे होते. मात्र आता तरुणांच्या आयुष्याविषयीच्या व्याख्या बदलत आहेत. महागाई वाढत आहे. भौतिक गोष्टींची मागणी वाढत आहे. अनावश्यक खर्च देखील वाढत आहेत. अशा वेळी बचतीकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. मात्र ते न टाळता येणारे आहे.  पैसा बचतीची आवश्यकता वाढत्या गरजांच्या संख्येमुळे शिक्षण, आरोग्य, निवारा, व्यवसाय,…

यंदा कोणते शेअर घ्याल?

यंदाच्या दिवाळीसाठी देशातील प्रसिद्ध ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी काही कंपन्यांचे शेअर सुचविले आहेत. काही निवडक शेअर पहा   अ) आनंद राठी   1) रिलायन्स इंडस्ट्रीज, सध्याचा भाव ः रु. 1428.25 (उद्दिष्ट ः रु. 1610) ः ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी आहे. मागील सहा वर्षांत "रिलायन्स'चा महसूल सातपटीने, तर नफा 14 पटीने वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत 11,262 कोटी रुपयांचा दणदणीत नफा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता कंपनीच्या नफ्यात 18.37 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत महसूल 4.8 टक्‍क्‍यांनी वाढून 1,63,854 कोटी रुपयांवर पोचला आहे.    2) भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स (बीईएल),…

ऍक्सिस म्युच्युअल फंड

मागील वर्षभरापासून संकटात असलेल्या वाहन उद्योग क्षेत्राकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली असताना ऍक्सिस म्युच्युअल फंडाने मात्र या क्षेत्रावर विश्वास दाखविला आहे. यावर्षी झालेला चांगला पाऊस यामुळे वाहन उद्योग क्षेत्राला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील अशी चिन्हे निर्माण झाली असल्याचे ऍक्सिस म्युच्युअल फंडाचे इक्विटी हेड जिग्नेश गोपाणी यांनी म्हटले आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार ऍक्सिस म्युच्युअल फंडाने आपल्या ऍक्सिस लॉंग टर्म इक्विटी फंडामध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, आयशर मोटर्स लि. आणि ऑटो घटक निर्माता कंपनी मदर्सन सुमी सिस्टम्स लि.मध्ये गुंतवणूक केली आहे. ऍक्सिस लॉंग टर्म इक्विटी फंडाचा एकूण एयुएम 20,400 कोटी इतका आहे. फंडाने मागील वर्षी 20 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर मागील…

‘इन्कम टॅक्स’बाबत मोठा निर्णय?

मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी  केंद्र सरकारकडून आता वैयक्तिक करातही सवलत देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये केलेल्या कपातीनंतर उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख विवेक देबरॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार,  'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये कपात केल्यानंतर आता केंद्र सरकार वैयक्तिक करातही कपात करण्याची शक्यता आहे.   प्राप्तिकरात बदल करण्यासाठी एका 'टास्क फोर्स'ची स्थापना करण्यात आली होती. या टास्क फोर्सने आपला अहवाल केंद्र सरकारला सोपविला असून करात कपात करण्याचा प्रस्ताव असून ५ टक्के, १० टक्के आणि २० टक्के अशी कर रचना करण्याची शिफारस केली आहे. सध्या ५ टक्के, २०…

SEBI allows graded exit load in liquid funds

In a letter sent to AMFI, SEBI has today confirmed that fund houses can levy graded exit load on investors of liquid funds, who exit the scheme within 7 days. This essentially means fund houses can impose exit loads in liquid funds to the extent of 7 days. However, such loads will be reduced with the increase in days. Simply put, investors redeeming after a day will have to pay more exit load than the investors redeeming it on seventh day. While fund houses can impose exit load of 0.007% if an investor redeems his money in 1 day, there…

मिडकॅप फंडाचे काय करावे?

गेल्या दोन वर्षांत मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंड सर्वांत कमी किंवा "निगेटिव्ह' परतावा देत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात आता असा विचार नक्कीच येत असेल, की ही मिडकॅप, स्मॉलकॅप फंडात केलेली गुंतवणूक बरोबर आहे ना? का यातील गुंतवणूक येईल त्या मूल्यांकनात विकून सरळ ते पैसे मल्टीकॅप अथवा लार्जकॅप फंडात ठेवावेत?   "निगेटिव्ह रिटर्न्स'मुळे चिंता  ----------------------  आता इक्विटी मुच्युअल फंडातील गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या गुंतवणूक प्रकाराबद्दलची जागरूकता गेल्या 3-4 वर्षांत अधिक झाली आहे. बऱ्याच लोकांनी यामध्ये गुंतवणूक चालूही केली असेल. ही गुंतवणूक करताना आपण लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप फंडांत विभागून करीत असतो. ही विभागणी अतिशय योग्य आहे.…

Baroda MF and BNP Paribas MF enter into a merger

Rationalisation in TER seems to have opened door for AMCs to explore consolidation opportunity to reduce costs and increase profits in the Rs.26 lakh crore mutual fund industry. Two mid-sized AMCs - Baroda MF and BNP Paribas MF have entered into a merger today, Bank of Baroda said in an exchange filing. While the release did not mention name of the new merged entity, sources said it would be called Baroda BNP Paribas MF. The merged entity would look to leverage both BNP Paribas AMC’s expertise in global asset management and BOB's experience in running Indian retail networks. The merged…

‘Aab 100 Rupaye mein mutual funds’

At a time when vegetable prices are soaring, investment in mutual funds are getting more affordable. Two fund houses -  Aditya Birla Sun Life Mutual Fund and Reliance Nippon Life Mutual Fund have reduced the minimum lump sum investment amount in their schemes to as low as Rs 100. Recently, Reliance Nippon Life MF changed the minimum investment amount for lump sum investment in its multi cap fund and growth fund to Rs 100 from Rs 5000. The measure came into effect from August 29 this year. Aditya Birla Sun Life MF is another fund house that has been offering…

End of content

No more pages to load