कुटुंबाचे फंड मॅनेजर स्वतः बना!

आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आर्थिक नियोजन म्हणजेच "फायनान्शियल प्लॅनिंग' असणे महत्त्वाचे असते. पुरेशा विमा संरक्षणाबरोबरच आपल्या गरजा, जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्दिष्ट यांच्याशी जुळणारी योग्य प्रकारची गुंतवणूक, मिळणाऱ्या उत्पन्नातून मासिक खर्च आणि बचतीसाठी तरतूद करणे, केलेल्या बचतीची योग्य गुंतवणूक पर्यायात विभागणी, करनियोजन, गुंतवणुकीचा उपयोग आपत्कालीन आणि शैक्षणिक हेतूंसाठी करणे आदी बाबींचे व्यवस्थापन "फायनान्शियल प्लॅनिंग'मुळे होते. यासाठी प्रत्येकाला तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराकडे जाणे जमेलच असे नाही. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःच स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक सल्लागार बनू शकता.  आर्थिक नियोजनाचे फायदे, आर्थिक नियोजन कसे करावे, बाजाराचे मानसशास्त्र, इक्विटी व डेट, कर्जाची मूलतत्त्वे, इक्विटीची मूलतत्त्वे आणि त्याचे मूल्यमापन, म्युच्युअल फंडाची आवश्‍यकता व त्याची निवड कशी…

एलआयसी हाऊसिंग

एलआयसी हाऊसिंग फायनान्सने चालू आर्थिक वर्षात 55,000 कोटी रुपये कर्जवितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.ने मागील आर्थिक वर्षात 48,000 कोटी रुपयांचे केले  आहे. दोन दिवसीय मेगा प्रॉपर्टी फेअरच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समजली आहे. यावर्षी आतापर्यत कंपनीने 26,000 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे. कंपनीच्या एकूण थकित कर्जात मागील वर्षाच्या तुलनेत सुधारणा करण्याचेही एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे उद्दिष्ट आहे. सध्या हे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे. स्वस्त घर योजनेमुळे गृहनिर्माण क्षेत्रात हळूहळू सुधारणा होत आहे . प्रधान मंत्री आवास योजनेचा एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या पोर्टफोलिओमधील वाटा 26 टक्के इतका आहे. 25 ते 35 वर्षे…

नवा ‘टाटा फोकस्ड इक्विटी फंड’ बाजारात

टाटा अॅसेट मॅनेजमेंटने नवा इक्विटी फंड बाजारात आणला आहे. 'टाटा फोकस्ड इक्विटी फंड' असे या नव्या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड आहे. या फंडाद्वारे कमाल 30 कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा एक मल्टीकॅप प्रकारातील फंड आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये या फंडाद्वारे गुंतवणूक केली जाणार आहे. टाटा फोकस्ड इक्विटी फंडासाठी एस अॅंड पी बीएसई 200 टीआरआय हा बेंचमार्क असणार आहे. नव्या 'टाटा फोकस्ड इक्विटी फंडाचे व्यवस्थापन रुपेश पटेल करणार आहेत. हा एनएफओ (न्यू फंड ऑफर) 15 नोव्हेंबरला गुंतवणूकीसाठी खुला होत असून 29 नोव्हेंबर 2019 ही त्याची अंतिम मुदत आहे.   या फंडाद्वारे बाजारातील…

वाहनविम्याचे नूतनीकरण

मोटार विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना प्रामुख्याने तुमच्या गरजा लक्षात घेण्याची गरज आहे. अ‍ॅड-ऑन कव्हर : प्रत्येक वेळी पॉलिसीचे नूतनीकरण करताना, अ‍ॅड-ऑन कव्हरविषयी विमा कंपनीकडे विचारपूस करणे श्रेयस्कर ठरेल. काही फेरबदलही केले जाऊ शकतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही नियमित पूर येणाऱ्या क्षेत्रात राहात असाल, तर तुम्हाला गाडीच्या इंजिनला हायड्रोस्टॅटिक लॉकमुळे पोहचू शकणाऱ्या नुकसानीपासून वाचण्याच्या वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करून अतिरिक्त संरक्षण मिळविता येईल. झीरो डेप्रीसिएशन अथवा डेप्रीसिएशन शील्ड हे आणखी एक अ‍ॅड-ऑन कव्हर आहे, ते खरेदी करण्याची आवश्यकता आहे. नव्या वैशिष्ट्यांतर्गत, विमा उतरविणाऱ्या कंपनीला दाव्याच्या वेळी घसारा (डेप्रीसिएशन) लक्षात न घेता वाहनाच्या सुट्या भागाची त्या समयी असलेल्या बाजार भावाइतकी भरपाई करावी लागते. याला 'बम्पर…

मुदत ठेवींचे कमी झालेले व्याजदर पहा !!

सर्वसामान्य गुंतवणूकदाराची पहिली पसंती असणाऱ्या बँक मुदत ठेवींचे व्याजदर कमी झाल्याने त्यांच्यात काळजीचे वातावरण आहे. या कपातीनंतर आघाडीच्या बँकांचे व्याजदर किती झाले आहेत, त्याचा आढावा. हे व्याजदर सर्वसामान्य नागरिकांसाठी असून बहुतांश बँकांतर्फे ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्के अधिक व्याज दिले जाते. स्टेट बँक ठेवींचा कालावधी व्याजदर सात ते ४५ दिवस ४.५ % ४६ दिवस ते १७९ दिवस ५.५ % १८० दिवस ते २१० दिवस ५.८ % २११ दिवस ते एक वर्ष ५.८ % एक वर्ष ते १० वर्षे ६.२५ % अॅक्सिस बँक सात ते १४ दिवस ३.५ % १५ दिवस ते २९ दिवस ४.२५ % ३० दिवस ते ४५ दिवस ५…

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील मालकी हिस्सा कमी करणार

सर्वात मोठी तेलशुद्धीकरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील (आयओसी) भागभांडवल कमी करण्यास प्रयत्नशील असल्याचे समजते . आयओसीमधील सरकारी मालकी 51 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची सरकारची योजना आहे.   सद्यस्थितीत इंडियन ऑईलमध्ये सरकारचा हिस्सा  51 टक्के आहे, तर एलआयसी आणि ओएनजीसीच्या माध्यमातून सरकारकडे  25.9 टक्क्यांची मालकी आहे. निर्गुंतवणूकीचे उद्दिष्ट पूर्ण करणे आणि मंदीसदृश परिस्थिती तसेच कंपनी करात कपात केल्यानंतर वाढलेली राजकोषीय तूट आवाक्यात आणण्यासाठी हा निर्णय  पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. 

लवकर निवृत्त होताय ??

‘पंचेचाळीसाव्या वर्षी नोकरी सोडून, वी वॉन्ट टू लिव्ह ऑन अवर ओन टर्म्स .’ असे म्हणणे ही आजच्या तरुण पिढीची क्रेझच बनली आहे. मात्र हा निर्णय आर्थिक नियोजन तज्ज्ञाकडून तपासून घेणे आवश्यक आहे. समजा, तुमचे आजचे वय ३० वर्षे आहे. तुमचा मासिक खर्च ५० हजार रुपये आहे. तुम्ही ४० व्या वर्षी निवृत्त होऊ इच्छिता. तुमचे अपेक्षित आयुर्मान १०० वर्षे आहे. महागाईचा दर पाच टक्के आणि गुंतवणुकीवर परतावा आठ टक्के धरल्यास तुमचा १० वर्षांनंतर मासिक खर्च ८१,५०० रुपये होईल. हा खर्च तुमच्या वयाच्या शंभराव्या वर्षांपर्यंत वाढत जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला निवृत्तीनिधी रुपये २.८७ कोटी रुपयांचा लागेल. हा निधी चालू १० वर्षांत जमा…

म्यु्च्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 26.33 लाख कोटी !!!!

ऑक्टोबर महिन्यात देशातील म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 26.33 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. सप्टेंबरमध्ये असलेल्या एकूण गुंतवणूकीत ऑक्टोबर महिन्यात 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमधील एसआयपीद्वारे झालेली गुंतवणूक घसरली आहे. ऑक्टोबर महिन्यात एसआयपीद्वारे 8,245.62 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

एचडीएफसी बँकेचे कर्ज आणखी स्वस्त

खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने 'एमसीएलआर' आधारित कर्जांच्या व्याजदरांमध्ये पाच ते दहा बेसिस पॉइंट्सने (०.०५ ते ०.१ टक्का) कपात केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली असून, घटलेले नवे दर तातडीने म्हणजे गुरुवार, सात नोव्हेंबरपासून अंमलात आले आहेत.

बुस्टर प्लॅनचा ‘या’ शेअरना होऊ शकतो फायदा.

गृहनिर्माण क्षेत्रासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बुस्टर प्लॅनमुळे या क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन त्याचा लाभ असंख्य कंपन्यांना होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने गृहनिर्माण क्षेत्राला 25,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. सरकारने यासाठी अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडाची (एआयएफ) घोषणा केली आहे. या फंडाद्वारे सरकारने 10,000 कोटी रुपयांच्या मदतीचा पहिला हफ्ता जाहीर केला आहे. या विशेष पॅकेजसाठी सरकारने एलआयसी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इतर काही वित्तीय संस्थाचे सहकार्य घेतले आहे. त्यातून 25,000 कोटी रुपयांचा निधी उभा केला जाणार आहे. सध्या देशात 1,600 पेक्षा जास्त गृहनिर्माण प्रकल्प रखडले असून त्यातून 4.58 घरांचे बांधकाम…

End of content

No more pages to load