ईएलएसएस म्युच्युअल फंड म्हणजे काय?
ईएलएसएस म्युच्युअल फंड म्हणजे काय? 'ईएलएसएस फंड' प्रामुख्याने इक्विटी आणि इक्विटीसम साधनांमध्ये गुंतवणूक करतात. इक्विटी ही एकमेव अॅसेट श्रेणी आहे, जी महागाई दरापेक्षा तुलनेत उच्च परतावा देते. त्यामुळे दीर्घ काळासाठी 'ईएलएसएस'मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला उत्तम परतावे मिळतील; तसेच '80सी' अंतर्गत कर लाभही घेता येईल. करबचत किती होऊ शकते? प्राप्तिकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत ईएलएसएस फंडात दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. त्यानुसार 5 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये असलेल्यांना 7800, एखादी व्यक्ती 20 टक्के कराच्या चौकटीत येत असल्यास त्या व्यक्तीला 31 हजार रुपयांपर्यंत तर 30 टक्के कराच्या चौकटीत येत असल्यास अशा प्रकारे जास्तीत जास्त अंदाजे 47 हजार रुपयांपर्यंत करबचत करता येते. ईएलएसएस का…