डीएचएफएलकडे गुंतवणूकदारांचा 87,905.6 कोटींचा दावा

दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल)वर विविध बॅंका, वित्तसंस्था, बॉंडधारक, कर्मचारी आणि इतर घेणेकऱ्यांनी तब्बल 87,905.6 कोटी रुपयांचा दावा लावला आहे. कर्जाच्या विळख्यात सापडलेली डीएचएफएल सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरी जाते आहे. कंपनी विविध वित्तसंस्था, बॅंका आणि गुंतवणूकदारांना देणे असलेल्या रकमेची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.    यात डीएचएफएलच्या मुदतठेवींदारांचा समावेश नाही. मुदतठेवींचे 6,188 कोटी रुपयांच्या क्लेमवर कंपनीकडून मार्ग काढण्यात आला आहे. डीएचएफएलचे प्रशासक आर सुब्रमनीयाकुमार यांच्याकडे यांसंदर्भातील तोडगा कंपनीने सादर केला आहे. डीएचएफएलला कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था, बॅंका आणि बॉंडधारकांचे एकत्रितरित्या कंपनी 86,892.3 कोटी रुपयांचे देणे लागते. तर बॉंडधारकांचे यात 45,550.7 कोटी रुपये आहेत. तर उर्वरित कर्ज देणाऱ्या संस्थांचे 41,342.23 कोटी…

एफपीआय — एका वर्षात गुंतविले तब्बल 1 लाख कोटी

परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफपीआय) भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याचा ओघ यावर्षी (2019) प्रचंड राहिला आहे. एफपीआयकडून भारतीय भांडवली बाजारात यावर्षी तब्बल 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. विशेष म्हणजे 2013 नंतर पहिल्यांदाच एफपीआय गुंतवणुकीने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एकूण गुंतवणुकीपैकी 1 लाख 86 कोटी रुपये इक्विटी प्रकारात तर 26 हजार 809 कोटी रुपये डेट प्रकारात गुंतविले आहेत. नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी ली.ने (एनएसडीएल) ही आकडेवारी प्रकाशित केली आहे. महत्वाचे म्हणजे, या अगोदर फक्त तीनच वेळा 2010, 2012 आणि 2013 मध्ये एफपीआयकडून 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक झाली होती. तर 2018 मध्ये गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेकडे पाठ फिरवली होती. मागील…

एसबीआय : ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासाठी ओटीपी बंधनकारक

खातेधारकांच्या व्यवहारांना संरक्षण देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) एटीएममधून पैसे काढताना ओटीपी (वन टाइम पासवर्ड) टाकणे बंधनकारक केले आहे. येत्या १ जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. एटीएम केंद्रांवर होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. यामुळे अधिकृत खातेधारकाशिवाय इतर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत.   सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रात्री 8 ते सकाळी 8 च्या दरम्यान 10 हजारांपेक्षा जास्त रुपयांच्या व्यवहारांनाच ओटीपी लागू असणार आहे. दिवसभरात होणाऱ्या व्यवहारांसाठी तसेच 10 हजारांपेक्षा कमी रकमेसाठी ओटीपी टाकण्याची आवश्यकता असणार नाही. तसेच एसबीआयचे खातेधारक जर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असतील तरी देखील ओटीपी विचारला जाणार नाही.…

SEBI simplifies process for transmission of units

SEBI has simplified the process of transmission of units in mutual funds due to absence of nominations or death of unitholders. Among its key measures are bringing uniformity across fund houses in dealing with transfer of assets due to demise of unitholders and spreading awareness about importance of nomination in mutual funds through IAPs. Here are some of the other key changes: •             Introduction of image based processing wherever the claimant is a nominee or a joint account holder in the investor folio •             AMCs to set up a dedicated central help desk and a webpage carrying relevant instructions to…

रिलायन्सकडून ‘शेअर स्वॅप’ ऑफर

मुकेश अंबानी यांच्या नैतृत्वाखालील मुख्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने समूहाची उपकंपनी आणि रिलायन्स रिटेल शेअरधारकांसाठी  'शेअर स्वॅप' ऑफर जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत रिलायन्स रिटेलच्या शेअरधारकांना चार शेअरच्या बदल्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक शेअर देण्यात येणार आहे.   2006 साली स्थापन झालेली रिलायन्स रिटेल ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. या उपकंपनी अंतर्गत रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट या प्रकारचे 45 वेगवेगळे व्यवसाय चालविले जातात. कंपनीच्या स्थापनेवेळी, 'रिलायन्स रिटेल एम्प्लॉईज’साठी रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट योजना 2006 आणि 2007 या दोन योजना राबविल्या होत्या. ज्यांतर्गत पात्र कर्मचार्‍यांना रिलायन्स रिटेलचे शेअर देण्यात आले होते. रिलायन्स रिटेल ही कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत  नसल्याने शेअर धारकांना शेअर लिक्विडेट करता…

आर्बिट्राज फंडांकडे गुंतवणूक वाढली !!

या कॅलेंडर वर्षातील अकरा महिन्यात गुंतवणुकदारांनी आर्बिट्राज फंडांमध्ये 27,958 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीचा पर्याय म्हणून आर्बिट्राज फंडाकडे बघितले जाते. उच्च उत्पन्न गटातील गुंतवणुकदार डेट फंडांसमोर आलेल्या संकटांमुळे डेट फंडांपासून दूर राहिले आणि त्यांनी आर्बिट्राज फंडांकडे मोर्चा वळवला. त्यातून या फंड प्रकारातील गुंतवणूक वाढली आहे. त्यातच करबचतीचा पर्याय आणि लिक्विड फंडांमधून मिळणारा कमी परतावा यामुळे देखील गुंतवणूकदार आर्बिट्राज फंडात गुंतवणूक करताना दिसत आहेत. एका अहवालानुसार आर्बिट्राज फंडांनी मागील वर्षभरात जवळपास 5.82 टक्क्यांचा परतावा दिला आहे. आर्बिट्राज फंड हा बाजारातील अनिश्चिततेच्या काळात अधिक सुरक्षित फंड प्रकार आहे असे गुंतवणूकदारांना वाटत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.…

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

येत्या ४ दिवसात नवीन वर्षाची सुरवात होईल ! गेल्या वर्षी गुंतवणुकीत झालेल्या चुका यावर्षी आपण करणर नाही असा निश्चय आपण सर्वानीच करूया !! सन २०२० मध्ये गुंतवणूक करताना खालील गोष्टी आपण पहाव्यात हा धनलाभ तर्फे आपल्याला सल्ला !! १ कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या किंवा कोणते रोखे आहेत ते बघा. फक्त मागील परतावे बघून गुंतवणूक करू नका. २ मार्केट कॅप संलग्न गुंतवणूक करताना किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तराकडे लक्ष असू द्या. आजघडीला स्मॉल आणि मिड कॅप निर्देशांक गुंतवणुकीसाठी जास्त आकर्षक आहेत. परंतु तिथे जोखीमसुद्धा जास्त आहे. ३ बाजाराच्या पी/ई बरोबर महागाई आणि त्यानुसार वाढणाऱ्या व्याजदरांकडेसुद्धा लक्ष असू द्या.…

पिरामल एंटरप्राईझेस उभारणार 2,750 कोटी

पिरामल एंटरप्राईझेस बॉंड बाजारात आणून 2,750 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हे बॉंड बाजारात आणले जाणार आहे. 28 डिसेंबरला पिरामल एंटरप्राईझेसच्या संचालक मंडळाच्या प्रशासकीय समितीची बैठक होणार असून त्यात हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कंपनी नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचरच्या माध्यमातून 2,750 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे.

PPF विषयी नवे नियम !

वर्षभरात कितीहीवेळा पैसे डिपॉझिट करता येणार 'पीपीएफ'विषयीच्या नव्या नियमानुसार पीपीएफ खातेधारकांना 'पीपीएफ' खात्यात एका वर्षात ५० रुपयांच्या पटीत कितीही वेळा पैसे भरता येणार आहेत. मात्र ही रक्कम दिड लाखांहून अधिक नसावी. यापूर्वी खातेधारकाला एका वर्षात केवळ १२ वेळा पैसे जमा करण्याची परवानगी होती. - मुदतपूर्ती पूर्वी खाते बंद करण्यासाठी आणखी एक अट 'पीपीएफ' खाते सुरु केल्यानंतर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर विशिष्ट परिस्थिती खाते बंद करण्याची परवानगी आहे. ज्यात खातेधारकाला तसेच त्यावर अवलंबून असलेल्या पत्नी किंवा मुलांना गंभीर आजार झाल्यास पीपीएफ खाते मुदतपूर्ती पूर्वी बंद करण्याची परवानगी आहे. त्याशिवाय खातेधारक किंवा त्याच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीपीएफ खाते मुदतपूर्ती पूर्वी बंद करता…

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हित संरक्षण करण्यासाठी समिती

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी तसेच म्युच्युअल फंडाविषयी गुंतवणूकदार जनजागृती करण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यासाठी सेबीने एक आठ सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती चर्चासत्रे, प्रशिक्षण, संशोधन कार्यक्रम आणि प्रकाशने यासारख्या उपक्रमांची शिफारस करेल. आयआयएम - अहमदाबादचे माजी प्राध्यापक अब्राहम कोशी हे या समितीचे अध्यक्ष असतील. आदित्य बिर्ला सन लाइफचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बालसुब्रमण्यन हे म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधी म्हणून या समितीचे सदस्य आहेत. त्याच बरोबर शेअर बाजार नियामक संस्था सेबीच्या वतीने तीन सदस्यांचा समावेश आहे: सेबीचे मुख्य महाव्यवस्थापक एन. हरिहरन आणि कार्यकारी संचालक नागेन्द्र पारख व व्ही. एस. सुंदरसन हे ते तीन सदस्य आहेत. या पाच…

End of content

No more pages to load