करपर्याय निवडा दरवर्षी

प्राप्तिकराच्या नव्या रचनेमध्ये वजावट घेण्याचा किंवा वजावट न घेण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल, तर तो दरवर्षी तुम्हाला बदलता येणार आहे. ही सुविधा वेतनधारकांसाठी केंद्र सरकारने देऊ केली आहे. मात्र व्यावसायिक उत्पन्न असलेले वेतनधारक किंवा व्यावसायिक यांना एकदा एक पर्याय निवडल्यास तोच पर्याय कायम ठेवावा लागणार आहे. व्यावसायिक उत्पन्न असलेल्यांनाही पर्याय निवड लवचिक ठेवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. त्याचबरोबर प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांना मिळणारा, त्यांच्या उगमकराची (टीडीएस) माहिती देणारा फॉर्म २६एएस इतिहासजमा होणार असून त्याजागी वार्षिक वित्तीय विवरण दिले जाणार आहे.

म्युच्युअल फंडावरील ‘टीडीएस’वर सरकारचे स्पष्टीकरण

म्युच्युअल फंडाकडून केवळ लाभांशावर १० टक्के 'टीडीएस' कापला जाईल, मात्र म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील भांडवली नफ्यावर 'टीडीएस' आकारला जाणार नाही, असे कर मंडळाने स्पष्ट केले आहे. ज्यावेळी गुंतवणूकदार म्युच्युअल फंडावर ५००० रुपयांहून अधिक लाभांश उत्पन्न मिळवेल, तेव्हा त्याला १० टक्के 'टीडीएस' द्यावा लागेल, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दरम्यान, लाभांश वितरण कर रद्द केल्यामुळे, सरकारचा दरवर्षी २५ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडण्याची शक्यता आहे. सध्या कंपन्यांना आपल्या नफ्यावर कर देतानाचा, आपल्या समभागधारकांना दिलेल्या लाभांशावर देखील १५ टक्के दराने DDT आणि अधिभार व उपकर देखील द्यावा लागतो. त्यामुळे गुंतवणूकदारांवर कराचा बोजा वाढतो. विशेषतः जेव्हा DDTच्या दरांहून कमी कर द्यावा लागतो आणि…

आयडीएफसी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची संधी

आयडीएफसी म्युच्युअल फंडाने ‘आयडीएफसी एमर्जिंग बिझनेस फंडा'ची घोषणा केली आहे. इक्विटी प्रकारातील ही स्मॉल कॅप योजना आहे. 3 ते 17 फेब्रुवारी दरम्यान योजनेचा एनएफओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 5 हजार रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. ही योजना स्मॉलकॅप संबंधित योजनांमध्ये किमान 65 टक्के व कमाल 100 टक्के तर इतर इक्विटी प्रकारात शून्य टक्के ते 35 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करेल.   सर्वात महत्वाचे म्हणजे किमान 100 रुपये प्रतिमहिना स्वरूपात देखील या योजनेत एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करता येणार आहे.    ‘आयडीएफसी एमर्जिंग बिझनेस फंडासाठी S&P BSE 250 Small Cap TRI बेंचमार्क इंडेक्स आहे. आयडीएफसी एएमसीच्या इक्विटीचे प्रमुख…

पोस्टात बचत खाते आहे?; मग ‘हे’ वाचा!

पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे बचत खाते असेल आणि तुमच्याकडे अजूनही 'मॅग्नेटिक स्ट्रीप'वाले एटीएम कार्ड असेल तर, १ फेब्रुवारीपूर्वी 'ईएमव्ही चिप' असणारे एटीएम कार्ड घेणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. पोस्ट खात्याने ग्राहकांना जानेवारी महिना संपण्यापूर्वी मोबाइल क्रमांकही अपडेट करण्याची सूचना केली आहे. पोस्ट खात्याने जारी केलेल्या निवेदनानुसार जे ग्राहक ३१ जानेवारीपर्यंत आपले जुने एटीएम कार्ड बदलणार नाहीत, त्यांचे कार्ड फेब्रुवारीपासून ब्लॉक करण्यात येणार आहे. मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी किंवा सध्याचे एटीएम कार्ड बदलण्यासाठी पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खातेधारकांना आपापल्या शाखेत जाणे आवश्यक आहे

बर्गर किंग इंडियाच्या आयपीओला सेबीची मंजूरी

बर्गर किंग इंडिया या रेस्टॉरंट साखळीला बाजारात आयपीओ आणण्यासाठी सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची (सेबी) परवानगी मिळाली आहे. बर्गर किंग इंडियाने आयपीओसाठीच्या मसुद्याचे कागदपत्रे नोव्हेंबर महिन्यात सेबीकडे सादर केले होते. 24 जानेवारीला सेबीने काही अंतिम दुरुस्त्या, निरिक्षणे कंपनीकडे पाठवल्या होत्या. सेबीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोणत्याही कंपनीला आयपीओ बाजारात आणण्याआधी सेबीकडून देण्यात येणारी निरिक्षणे महत्त्वाची असतात. त्यात आयपीओबद्दलची माहिती, पब्लिक ऑफरवरील फॉलोअप आणि राईट्स इश्यू इत्यादींचा समावेश असतो. आयपीओच्या मसुद्यानुसार बर्गर किंग 400 कोटी रुपयांचा इक्विटी शेअरचा आयपीओ आणणार आहे. त्याद्वारे कंपनीचे प्रवर्तक 6 कोटी इक्विटी शेअर बाजारात आणणार आहेत. कंपनीच्या विस्तारासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी कंपनी या भांडवलाचा…

‘आयटीआय स्मॉल कॅप फंड’

आयटीआय म्युच्युअल फंडाने नवा स्मॉल कॅप फंड बाजारात आणला आहे. 'आयटीआय स्मॉल कॅप फंड' असे या नव्या फंडाचे नाव आहे. या फंडाचा एनएफओ आज खुला होत असून 10 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत आहे. नवा फंडाचा बेंचमार्क निफ्टी स्मॉल कॅप 100 टीआरआय हा असणार आहे. या फंडात गुंतवणूक करण्याची किमान रक्कम 5,000 रुपये इतकी आहे. त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत पुढील गुंतवणूक करता येणार आहे.    या फंडाद्वारे 65 टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित गुंतवणूक प्रकारात आणि स्मॉल कॅप प्रकारातील कंपन्यांमध्ये केली जाणार आहे. तर उर्वरितत 35 टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप व्यतिरिक्त कंपन्यांमध्ये, डेट प्रकारात आणि मनी मार्केट प्रकारात केली…

एलआयसीच्या विमा योजनांच्या प्रिमियममध्ये वाढ होण्याची शक्यता

ग्राहकांना अधिक अनुकूल ठरणाऱ्या आणि त्यांच्या गरजांनुरुप विमा योजना बाजारात याव्यात यासाठी आयआरडीएआय प्रयत्नशील आहे. शिवाय ग्राहकांना आमिष दाखवून चुकीच्या पद्धतीने विमा योजना विकल्या जाण्याच्या पद्धतीलाही आयआरडीएआय आळा घालू इच्छिते. त्यामुळे आयआरडीएआयने विमा कंपन्यांना काही नवीन निकष लागू केले आहेत.    त्यामुळेच काही नॉन लिंक्ड विमा योजना, युलिप योजना, तीन नॉन लिंक्ड ग्रुप विमा योजना इत्यादी योजना एलआयसी बंद करते आहे. यामध्ये सिंगल प्रिमियम एन्डोव्हमेंट प्लॅन, न्यू मनी बॅंक-20 वर्षे, न्यू जीवन आनंद, अनमोल जीवन 2, लिमिटेड प्रिमियम एन्डोव्हमेंट प्लॅन, न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन, जीवन लक्ष्य, जीवन तरुण, जीवन लाभ, न्यू जीवन मंगल, भाग्य लक्ष्मी प्लॅन, आधार पिलर, आधार…

करबचत करण्यासाठी–

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात करबचत करण्यासाठी अनेक गुंतवणूकदार विविध पर्याय शोधात असतात. प्राप्तिकराच्या कलम 80 सी अंतर्गत बचतीचा लाभ मिळेल अशा अनेक योजना / पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यातल्या ठराविक पर्यायांचा घेतलेला  आढावा !! सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पब्लिक प्रॉव्हिडन्ट फन्ड (‘पीपीएफ’) ही केंद्र सरकारची, पूर्ण संरक्षण असलेली व करबचत मिळवून देणारी सर्वात लोकप्रिय योजना आहे. निश्चित परतावा, करबचत, दीर्घकालीन गुंतवणूक ही या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या योजनेला 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी आहे. मात्र गुंतवणूकदाराला काही आर्थिक अडचण आल्यास तो लॉक-इन कालावधीच्या आधी यातील काही रक्कम काढू शकतो. कोणतीही व्यक्ती आपल्या ‘पीपीएफ’ खात्यात…

नवा ‘अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड’

अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आपला नवा 'अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड' बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड इक्विटी प्रकारातील फंड आहे. ईएसजी प्रकारातील दीर्घकालीन  चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये या फंडाद्वारे गुंतवणूक करण्यात येणार आहे. ईएसजी प्रकारातील कंपन्या म्हणजे एनव्हायर्नमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स घटकांशी संबंधित कंपन्या.    चांगल्या कामगिरीसंदर्भातील इक्विटीतील नेहमीचे निकष आणि उत्तम ईएसजी घटक याआधारे या कंपन्यांची निवड केली जाणार आहे. 'अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंडाचा एनएफओ 22 जानेवारीपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तर 5 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत असणार आहे. या नव्या फंडाचे व्यवस्थापन अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे इक्विटीचे प्रमुख जिनेश गोपानी आणि फॉरेन सिक्युरिटीजचे फंड व्यवस्थापक हितेश दास करणार…

साधारण किती कर्ज घ्यावे?

1. आपल्याला खरोखरच पैशाची गरज आहे का ? सध्या 'इन्स्टंट लोन' मिळत असल्याने बऱ्याचदा घराज नसताना कर्ज घेतले जाते. त्यामुळे अत्यावश्यक नसलेल्या बाबींसाठी कर्ज घेतले जाते. ते योग्य नाही. उदा. दागिन्यांसाठी कर्ज घेणे, एक गाडी असताना दुसरी आणखी एक गाडी घेणे.   2. कर्ज आपल्याला परवडणारे आहे का ? कर्जाची एकूण रक्कम, व्याज आणि त्यासाठीचा हप्ता (ईएमआय) आपल्याला परवडणारे आहेत का याचा आधी हिशोब केला पाहिजे. (हफ्ते आपल्या मासिक उत्पन्नाच्या 30 टक्क्यांहून कमी असावेत म्हणजे भविष्यासाठी बचत करता येते)   3. कर्ज उत्पादित आहे का ? कर्ज घेऊन भविष्यात त्यातून उत्पन्न मिळणार असेल तर कर्ज घेणे योग्य असते. उदा. रिअल…

End of content

No more pages to load