करदात्यांच्या व्यवहार
अनवधानाने का होईना पण करदात्याकडून योग्य ती माहिती विवरणपत्रात भरताना नमूद केली गेली नाही, तर अशा करदात्याला त्रास सहन करावा लागतो. अशा व्यवहारांची माहिती प्राप्तिकर खात्याकडे अनेक स्रोतांतून जमा होत असते. विवरणपत्र भरण्यापूर्वी करदाता ती माहिती आता बघू शकणार आहे. करदाता आपल्या उत्पन्नाची, व्यवहाराची आणि कराची माहिती विवरणपत्राद्वारे प्राप्तिकर खात्याकडे दर वर्षी सादर करीत असतो. प्राप्तिकर खात्याकडेसुद्धा करदात्याच्या अनेक व्यवहारांची माहिती विविध सरकारी खाते, बँका, संस्थांकडून प्राप्त होत असते. ही माहिती करदात्याने सादर केलेल्या विवरणपत्राबरोबर तपासली जाते आणि त्यात काही तफावत असेल तर प्राप्तिकर खात्याकडून याबाबत विचारणा केली जाते. अनवधानाने का होईना पण करदात्याकडून योग्य ती माहिती विवरणपत्रात भरताना नमूद…