५ रूपयांत खरेदी करता येणार सोनं–

ग्राहकांना आता चक्क पाच रूपयांत सोनं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉननं आपल्या अ‍ॅमेझॉन पे सेवेद्वारे ही संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना आणि गुंतवणुकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कंपनीनं ‘गोल्ड व्हॉल्ट’ सेवेला सुरूवात केली आहे. कंपनीनं या सेवेसाठी सेफगोल्डसोबत करार केला आहे. ‘गोल्ड व्हॉल्ट’ सेवेद्वारे गुंतवणुकदाराला कमीतकमी पाच रूपयांचं सोनं खरेदी करता आहे. अ‍ॅमेझॉनपूर्वी पेटीएम, फोनपे, गूगल पे, मोबिक्विक, अ‍ॅक्सिस बँकेच्या फ्रिचार्च यांमार्फेत डिजिटल माध्यमांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात येत आहे. या सर्वांशी स्पर्धा करण्यासाठी आता अ‍ॅमेझॉनही ‘गोल्ड व्हॉल्ट’ ही सेवा सुरू केलीआहे.

नवा प्रस्ताव

करविस्ताराचा एक भाग म्हणून प्राप्तिकर विभाग करदात्यांना रिटर्न भरताना केलेल्या काही खर्चांचा तपशील भरण्यास सांगणार आहे. यामध्ये २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे हॉटेलचे बिल, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आयुर्विम्याचा हप्ता, २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आरोग्यविम्याचा हप्ता आदींचा समावेश आहे. शाळा किंवा कॉलेजमध्ये भरलेले व एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे वर्षभरासाठीचे शिक्षणशुल्क किंवा फी, विदेशप्रवास, बिझनेस क्लासमधून केलेला देशांतर्गत विमानप्रवास, दागिनेखरेदी, एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची पेंटिंगची खरेदी, डिमॅट खाती, बँकेतील लॉकर्स यांचाही तपशील प्राप्तिकर रिटर्नमध्ये द्यावा लागणार आहे. हा सगळा तपशील आर्थिक व्यवहार निवेदनात द्यावा लागेल. हे सर्व मुद्दे प्राप्तिकर विभागाने सध्या प्रस्तावित केले आहेत.

FD ऑफर;७.३५ टक्के

देशातील गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरुन सर्वात मोठं वेल्थ मॅनेजमेंट अॅप ETMONEY ने बजाज फायनन्ससोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीद्वारे ऑनलाइन फिक्स डिपॉझिटची (एफडी) सुविधा देण्यात येणार आहे. या ऑफरमुळे गुंतवणूकदारांना ७.३५ टक्क्यांच्या शाश्वत परताव्यासह अत्यंत सोप्या पद्धतीने गुंतवणूक करता येणार आहे. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून भारतीयांनी नेहमीच फिक्स डिपॉझिटकडे एक वित्तीय साधन म्हणून पाहिलं आहे. दरम्यान, एफडीवर बँकांकडून दिलं जाणारं व्याजदर गेल्या काही वर्षात कमालीचं घटलं आहे आणि अनेक भारतीयांना यामुळे वाढत्या महागाईला अनुसरुन परतावा मिळत नाही. पण आता ETMONEY च्या ऑफरमुळे लाखो भारतीयांना बँकेच्या तुलनेत चांगल्या परताव्यासह गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लवचिक…

धनादेशाचे व्यवहार

चेकच्या संदर्भातील गैरव्यवहार रोखण्यासाठी बँकिंग प्रणालीत 'पॉझिटिव्ह पे' व्यवस्था करण्यात येणार आहे. 'पॉझिटिव्ह पे' अंतर्गत चेक जारी करणारा ग्राहक लाभार्थ्याला चेक देण्यापूर्वी फोटो काढतो आणि नंतर हा फोटो बँकेच्या मोबाइल अॅपवर अपलोड करतो. चेक पेमेंटची सुरक्षितता वाढवण्यासाठी ५० हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या सर्व चेकसाठी पॉझिटिव्ह पे व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यवस्थेच्या अंतर्गत बँकेला चेक जमा होण्यापूर्वीच समजते की कोणत्या लाभार्थ्याला तो देण्यात येत आहे. त्यामुळे हा चेक जेव्हा वटवण्यासाठी येतो, त्या वेळी बँक अधिकारी निधी हस्तांतर करण्यापूर्वी त्याच्या तपशीलांची खातरजमा करू शकतो. चेक अदा करणारा ग्राहक त्याचे तपशील बँकेच्या अॅपमध्ये देत असल्याने कोणताही गैरव्यवहार…

गोल्ड लोन

सहा ऑगस्ट २०२०पर्यंत एक लाख रुपये मूल्याच्या सोन्यावर ७५ हजार रुपयांचे कर्ज मिळत होते. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर सात ऑगस्ट २०२०पासून संबंधिताला एक लाख रुपयांच्या सोन्यावर ९० हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याचाच अर्थ आता एक लाख रुपयांच्या सोन्यावर १५ हजार रुपये अतिरिक्त कर्ज मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या नियमामुळे सर्वसामान्यांना आता कमी सोने तारण ठेवून अधिक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या बँका आणि वित्त संस्थांचा 'गोल्ड लोन'चा व्याजदर बँक/ एनबीएफसी गोल्ड लोन कर्जदर प्रक्रिया शुल्क एसबीआय ७ ते ७.५० टक्के ०.५० टक्के कॅनरा बँक ७.६५ टक्के - बँक ऑफ महाराष्ट्र ८ टक्के नियमानुसार युको बँक ८.५० टक्के…

पत धोरण जाहीर

आज  ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण रिझर्व्ह बँके (Reserve Bank of India)कडून जाहीर करण्यात आले. या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले होते. RBIने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने रेपो रेट आहे तसाच म्हणजे ४ टक्के इतका ठेवला आहे. तर रिझर्व्ह रेपो रेट देखील आहे तितकाच ३.३ टक्के इतका ठेवला आहे. बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाउनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात १.१५ टक्के इतकी कपात केली होती.

आता सोन्यावर मिळणार 90 % कर्ज RBI

करोना व्हायरस संकट काळात अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी अनेकांचा मोठा आधार ठरले ते gold loan   होय. आता आरबीआयने सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. गोल्ड लोन अर्थात सोन्यावरील कर्जाची व्हॅल्यू वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय. आता सोन्यावर ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार आहे. आतापर्यंत सोन्याच्या एकूण मुल्यावर ७५ टक्केपर्यंत कर्ज मिळत होते.

क्रिसिल म्युच्युअल फंड पत क्रमवारी

क्रिसिल म्युच्युअल फंड पत क्रमवारीत समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंड गटात अ‍ॅक्सिस आणि कॅनरा रोबेको फंड घराण्याने बाजी मारली आहे. तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात एडलवाईस फंड घराणे अव्वल ठरले आहे. क्रिसिल प्रत्येक तिमाहीतील फंडांच्या त्या फंड गटातील तुलानात्मक कामगिरीनुसार फंडाची क्रमवारीत विभागणी करीत असते. एप्रिल-जून २०२० या कालावधीतील कामगिरीनुसार क्रिसिल क्रमवारी नुकतीच प्रसिद्ध झाली. ‘सीएमएफआर’ म्हणजेच क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंगमध्ये समावेशासाठी मूलभूत निकष निश्चित आहेत. किमान तीन वर्षेपूर्ण केलेल्या आणि गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या (ओपन एंडेड) फंडांचा या क्रमवारीसाठी विचार केला जातो. याव्यतिरिक्त किमान मालमत्ता हादेखील एक निकष आहे. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाची विभागणी १० फंड गटात, हायब्रीड फंडांची विभागणी…

व्यवहारांना गती

मुंबईतील अनेक भागांत करोना नियंत्रणात येत असल्याने ५ ऑगस्टपासून सर्व दुकाने सातही दिवस खुली ठेवण्यास मुंबई पालिकेने परवानगी दिली. मद्य दुकानांनाही ग्राहकांना थेट विक्रीची मुभा देण्यात आली असून, मॉल आणि बाजार संकुलातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. त्यामुळे व्यवहारांना गती मिळणार असून, मुंबई हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईत करोना रुग्णवाढीचे प्रमाण नियंत्रणात येताना दिसत आहे. अनेक भागांत रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांच्या पुढे गेला आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील सर्वच दुकाने ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्यास पालिका आयुक्त…

सोने घ्या !! bondच्या रुपात —

गोल्ड bond ची पाचवी सिरीज उद्या सोमवार दि ३.०८.२०२० पासून सुरु होत असून त्यासाठी सोन्याचा दर रु ५३३४ प्रती gram हा निश्चित झाला असून online खरेदीसाठी रु ५० चा discount मिळणार आहे !! सोन्याचे वाढत जाणारे दर पाहता यामधील गुंतवणूक भविष्यात फायदेशीर होईल हे निश्चित !! या सोने खरेदीवर दरवर्षी २.५% व्याजही निश्चित आहे !! पाच वर्षानंतर हे bond बाजार्दारानुसार विक्री करता येतील !!

End of content

No more pages to load