‘पीएफसी’चे ५,००० कोटींचे अपरिवर्तनीय रोखे

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी) या ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या वित्तपुरवठा संस्थेने ५ हजार कोटींचे अपरिवर्तनीय रोखे बाजारात आणले असून १५ जानेवारीपासून खुली विक्री होणार आहे. या रोख्यांवर मुदत ठेवींपेक्षा अधिक व्याज मिळणार आहे. देशातील विविध प्रकारच्या पारंपरिक व अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी या ५ हजार कोटींचा उपयोग केला जाणार आहे. मूळ रोखे ५०० कोटी व लोकांच्या प्रतिसादानुसार आणखी ४५०० कोटी अशी ही एकूण ५ हजार कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय रोख्यांची खुली विक्री होईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ती होईल. तीन, पाच, १० व १५ वर्षे मुदतीचे हे रोखे असतील व त्यावर वार्षिक ४.६५ टक्के ते १५ वर्षांंसाठी दरवर्षी ७.१५…

‘एनपीएस’, ‘अटल पेन्शन’मधील गंगाजळीत वाढ

राष्ट्रीय निवृत्ती वेतन पद्धती (एनपीएस), अटल निवृत्ती वेतन योजना (एपीवाय) सारख्या सरकारी सामाजिक सुरक्षा योजना अखत्यारीतील व्यवस्थापन मालमत्ता डिसेंबर २०२० अखेर ५.४९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वार्षिक तुलनेत त्यात ३६.८३ टक्के वाढ नोंदली गेली आहे. डिसेंबर २०१९ अखेर या योजनांमधील एकूण मालमत्ता ४.०१ लाख कोटी रुपये होती. एनपीएस तसेच एपीवायचे सदस्य ३१ डिसेंबर २०२० अखेर ३.९७ कोटी झाले आहेत. डिसेंबर २०१९ मधील ३.२६ कोटी सदस्यांच्या तुलनेत त्यात यंदा २१.६७ टक्के वाढ झाली आहे.सुरुवातीच्या टप्प्यात केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ‘एनपीएस’ योजनेचा लाभ नंतर खासगी कंपन्यांमधील कर्मचारी तसेच अन्य जनतेकरिता उपलब्ध झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीज

निफ्टी-५० मंचावर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचे weightage मंगळवारी १०.०८ टक्के झाले. सोमवारी ते ९.८२ टक्के होते. मागील काही दिवसांत रिलायन्सच्या शेअरचे The stock’s weightage सातत्याने कमी झाले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची अव्वल स्थावरून घसरण झाली असून त्याजागी आता एचडीएफसी बँकेच्या शेअरची वर्णी लागली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर चर्चेत होता. या काळात शेअर तब्बल १६९ टक्के वाढला. रिलायन्स समूहाची निधी उभारणी, जिओ मार्ट या ऑनलाइन पोर्टलचे अनावरण करून किराणा क्षेत्रात घेतलेला प्रवेश यामुळे कंपनीच्या शेअरला सुगीचे दिवस आले होते. रिलायन्स जिओच्या हिस्सा विक्रीतून तब्बल दोन लाख कोटींचा निधी उभारला होता. या काळात ११ सप्टेंबर रोजी…

SEBI — लवकरच आणखी एक शेअर बाजार

भांडवल बाजार नियामक sebi ने देशामध्ये नवीन भांडवल बाजार (स्टॉक एक्स्चेंज) उभारण्यासंदर्भात नवीन प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे ‘राष्ट्रीय शेअर बाजारा’चे (एनएसई) गेल्या १६ वर्षांमध्ये वाढलेले महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास विदेशी भांडवल बाजारांना देशामध्ये येण्याची संधी मिळून गुंतवणूकदारांची ‘ट्रेडिंग’ खर्च कमी होण्याची शक्यता आहे. ‘सेबी’ने या प्रस्तावावर ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

ICICI Prudential US Blue-chip Equity Fund !

ICICI Prudential Mutual Fund ही भारतातील आघाडीची अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. भारतातील अग्रगण्य खासगी बँक ICICI Bank आणि UK मधील फायनान्शिअल सर्व्हीसेस सेक्टरमधील कंपनी Prudential यांचा तो संयुक्त उपक्रम आहे.म्युच्युअल फंडस्,विमा क्षेत्रातील एक अतिशय प्रथितयश कंपनी म्हणून या Joint Venture ने स्थान पटकावले आहे. अशा या आघाडीच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने ६ जुलै २०१२ रोजी एका इंटरनॅशनल फंडाची सुरुवात केली. ICICI Prudential US Blue-chip Equity Fund ! S & P 500 TRI हा त्याचा बेंचमार्क इंडेक्स आहे.फंडामधील १०० टक्के गुंतवणूक Giant कंपन्यांमध्ये करणारा हा फंड असल्यामुळे सावध आणि सुरक्षित अशी गुंतवणूक करणा-यांसाठी हा फंड एक आदर्श फंड आहे. स्थापनेपासून १७ टक्के…

जवळपास १५ आयपीओ बाजारात दाखल होणार!!!!!

करोना संकटअसताना देखील २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत जोखीम घेणाऱ्या कंपन्यांनी आयपीओतून हजारो कोटींचे भांडवल उभारून दाखवले. त्यातून धडा घेत जवळपास डझनभर कंपन्यांनी प्राथमिक बाजारात नशीब आजमावण्याची तयारी केली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १५ आयपीओ भांडवली बाजारात धडकण्याच्या तयारीत आहेत. यातील किमान सहा आयपीओ जानेवारी महिन्यात बाजारात दाखल होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची संधी चालून येणार आहे. या वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन , कल्याण ज्वेलर्स, SSFB, ESAF स्मॉल फायनान्स बँक, इंडिगो पेंट्स, ब्रुकफिल्ड RIET, Barbeque Nation आणि रेलटेल या कंपन्या आयपीओ आणणार आहेत. जानेवारीत इंडिगो पेंट्स, होम फर्स्ट फायनान्स कंपनी, आयआरएफसी, ब्रुकफिल्ड RIET तसेच रेलटेल या कंपन्यांचे आयपीओ…

म्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे

गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांप्रमाणे म्युच्युअल फंडांमध्येही नामांकन (नॉमिनी) करण्याची सुविधा उपलब्ध आहे. गुंतवणूकदाराचे आकस्मिक निधन झाल्यास नामांकन केलेल्या व्यक्तीच्या नावे म्युच्युअल फंड हस्तांतरित करणे सोपे जाते. १) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना नामांकन करण्याचे स्वरूप नेमके काय आहे? म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या पश्चात या गुंतवणुकीचा दावेदार कोण हे निश्चित करण्यासाठी नामांकन केले जाते. नॉमिनी म्हणून नेमली जाणारी ही व्यक्ती गुंतवणूकदाराची पत्नी, मुले, कुटुंबातील अन्य व्यक्ती, मित्र अथवा कोणीही विश्वासपात्र व्यक्ती असू शकते. म्युच्युअल फंडाच्या फोलिओत नव्यानेच प्रवेश केला असेल तर किंवा प्रथमच खाते उघडले असेल तर नामांकन अनिवार्य असते. संयुक्त खाते असेल तर मात्र नामांकन अनिवार्य नसते.…

‘पॉझिटिव्ह पे’ यंत्रणा स्टेट बँकेत कार्यान्वित

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने चेकच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी positive pay यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सर्व धनादेश ‘पॉझिटिव्ह पे’मार्फतच जारी होणार आहेत. याशिवाय ग्राहकांना धनादेश काढताना तो कुणाच्या नावे आहे, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. चेक देणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या व्यक्तीची माहिती पडताळून पाहिल्यानंतरच तो वटणार आहे. ‘पॉझिटिव्ह पे’च्या माध्यमातून चेक क्लिअरिंगला जाण्यापूर्वी त्याचा क्रमांक, चेक जारी करण्यात आल्याची तारीख, चेक देणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, रकमेसह अन्य तपशील बँकेतर्फे पुन्हा तपासण्यात येणार आहेत. चेक जारी करणाऱ्याला ज्याच्या नावे चेक देण्यात येणार आहे, त्याची सर्व माहिती द्यावी लागणार आहे. दोघांची…

अल्पबचत योजनांचे व्याजदर स्थिर

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) तसेच अन्य अल्पबचत व पोस्टाच्या योजनांचे व्याजदर जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत आहे त्याच पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी जाहीर केला. आगामी तिमाहीत पीपीएफ आणि एनएससीमधील गुंतवणूकदारांना अनुक्रमे ७.१ टक्के आणि ६.८ टक्के दसादशे या दराने व्याज मिळेल. त्याचप्रमाणे पाच वर्षे मुदतीच्या ज्येष्ठ नागरीक ठेव योजनेवर वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज दर दिला जाईल. या योजनेत ज्येष्ठ नागरीक ठेवीदारांना व्याज मात्र दर तिमाहीला दिला जातो. सुकन्या समृद्धी योजना (७.६ टक्के), किसान विकास पत्र (६.९ टक्के), तर पोस्टाच्या पाच वर्षे मुदतीच्या आवर्ती ठेवींवर ५.८ टक्के दराने व्याज लाभ मिळेल.

२०२१ साठी हे समभाग घ्या —

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मिडकॅप शेअर विभागाचे उपाध्यक्ष अमरजीत मौर्य यांनी खालील शेअरबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. १) हॉकिन्स कूकर्स सीएमपी : ५,८२० अपसाइड-१५ टक्के २) स्वराज इंजिन्स सीएमपी : १,४०८ अपसाइड- २५ टक्के ३) व्हर्लपूल ऑफ इंडिया सीएमपी : २,५५६ अपसाइड- २२ टक्के ४) रॅडिको खेतान सीएमपी : ४५० रुपये अपसाइड- २० टक्के ५) पेज इंडस्ट्रीज सीएमपी: २७,५२५ रुपये. अपसाइड- २० टक्के

End of content

No more pages to load