आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल—नवीन म्युच्यूअल फंड
आयसीआय़सीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त प्रकारातील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल हा नवीन म्युच्यूअल फंड गुंतवणुकीसाठी बाजारात आणला आहे. समभाग तसेच त्याच्याशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करत दीर्घ कालावधीसाठी संपत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आलेला आहे. व्यापार चक्राआधारे विविध क्षेत्रात तसेच समभागांमध्ये या फंडातील निधीची गुंतवणूक केली जाणार आहे. शेअरबाजारातून मिळणारा परतावा सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेतील विविध व्यापार चक्र प्रभावित करत असतात. पारंपारिक व्यापार चक्रात वाढ, मंदी, घसरण आणि फेरवाढ हे चार टप्पे आढळतात. प्रत्येक टप्पा हा इतरांपेक्षा वेगळा असतो. अर्थव्यवस्थेतील हे प्रमुख टप्पे ओळखुन तसेच त्याच्या विश्लेषणाआधारे स्वीकारलेला गुंतवणूकीचा पर्याय हा सकारात्मक गुंतवणूकीचा अनुभव देण्यास मदत करु शकतो. बाजारात प्रसंगानुरुप…