सोन्यामध्ये गुंतवणूक संधी — सोमवारपासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजना खुली होणार

सार्वभौम सोने खरेदी योजनेअंतर्गत २०२०-२१ (मालिका XII) १ ते ५ मार्च २०२१ या कालावधीत खुली होणार आहे. यासाठी प्रती ग्रॅम ४६६२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. जे गुंतवणूकदार या रोख्यांसाठी ऑनलाईन अर्ज करतील आणि डिजिटल माध्यमातून खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रती ग्राम ५० रुपये सवलत देण्यात येणार आहे. या गुंतवणुकदारांसाठी या सुवर्ण रोख्यांची किंमत ४६१२ रुपये प्रति ग्राम सोने अशी असेल. या योजनेसाठी प्रती ग्रॅमसाठी ४६६२ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षातील ही बारावी मालिका आहे. या योजनेसाठी जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजिटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.

मुदत विमा योजनेचे पाच प्रकार

मुदत विमा योजना फक्त एखाद्याची विद्यमान गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचा उद्धेश पूर्ण करत नाही तर भविष्यात कुटुंबातील सदस्यांचं कौटुंबिक ध्येयदेखील सहजतेने पार पाडण्यास मदत करते. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असणाऱ्या सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास कौटुंबिक ध्येय मोडकळीस येत नाहीत, कारण मिळणारी रक्कम हयात असलेल्या सदस्यांद्वारे वापरली जाऊ शकते. मुदत योजना ही जीवन विम्यातील सर्वाधिक उत्तम योजना असून कमी प्रीमियम आणि हाय कव्हरेज देते. कशा पद्धतीने काम करते – तुम्ही जो प्रीमियम भरणार आहात तो मुख्यत्वे चार गोष्टींवर अवलंबून असेल – विमा रक्कम (लाइफ कव्हर) खरेदी करणं आवश्यक, तुमचं वय, लिंग आणि किती वर्षांसाठी (पॉलिसी टर्म) तुम्हाला ही पॉलिसी हवी आहे. पॉलिसीच्या मुदतीत…

गुंतवणूक संधी–मिरे अॅसेट कॉपोरेट बॉण्ड फंड

वेगाने वाढणाऱ्या भारतातील म्युच्यूअल फंडांपैकी एक असलेल्या मिरे अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडियाने मुदतमुक्त प्रकारात नवीन म्युच्यूअल फंड बाजारात आणला आहे. प्रामुख्याने एए प्लस आणि त्यापेक्षा अधिक पतदर्जा असलेलल्या डेट योजनांमध्ये या फंडातील निधी गुंतविला जाणार आहे. हा फंड गुंतवणूकदारांसाठी खुला झाला असून ९ मार्च २०२१ ला बंद होणार आहे. या फंडासाठी निफ्टी कॉर्पोरेट बॉण्ड इंडेक्स हा आधारभूत निर्देशांक आहे. या फंडाचे व्यवस्थापन नियमित उत्पन्न विभागाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी महेंद्र जाजू करणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओच्या माध्यमातून परतावा आणि रोखता हे दोन्ही हवे आहेत. मिरे अॅसेट कॉपोरेट बॉण्ड फंड मध्यम प्रकारची जोखीम घेत उत्पन्न मिळवून देताना उच्च दर्जा आणि…

तांत्रिक अडथळा तेजीत रूपांतरित

राष्ट्रीय शेअर बाजारातील तांत्रिक अडथळा बुधवारी प्रमुख निर्देशांकाच्या पथ्यावर पडला. आठवडय़ातील तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासून निर्देशांक वाढ नोंदवणारा सेन्सेक्स व निफ्टी दुपारच्या खंड व्यवहारानंतर विस्तारित व्यवहार कालावधीत लक्षणीय तेजी नोंदवता झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवार सायंकाळअखेर १,०३०.२८ अंशवाढीने ५०,७८१.६९ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७४.२० अंशवाढीसह १४,९८२ पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांत मंगळवारच्या तुलनेत जवळपास प्रत्येकी २ टक्के वाढ नोंदली गेली. सेन्सेक्स ३० मध्ये अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक, ५ टक्क्यांनी झेपावला. त्याचबरोबर एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँकही वाढले. गुंतवणूकदारांकडून विशेषत बँक व वित्त क्षेत्रातील समभागांची खरेदी झाली, तर पॉवरग्रिड, डॉ. रेड्डीज्, टीसीएस, एशियन पेंट्स…

तांत्रिक बिघाडानंतर सेबीने शेअर बाजारांची वेळ वाढवली

राष्ट्रीय शेअर बाजारात सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने वाया गेलेली शेअर व्यवहारांची वेळ सेबीने वाढवली आहे. आज दोन्ही शेअर बाजार नेहमीच्या वेळेपेक्षा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहतील, असे सेबीने जाहीर केले आहे. शेअर बाजाराचे व्यवहार आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय सेबीने घेतला आहे. मुंबई शेअर बाजार  आणि राष्ट्रीय शेअर बाजा सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत सुरु असतात. मात्र आज सकाळी ११.४० मिनिटांनी राष्ट्रीय शेअर बाजारात तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्व व्यवहार ठप्प झाले. कोट्यवधींचे व्यवहार सुमारे तीन तासांहून अधिक वेळ ठप्प झाले होते. दुपारी ३.४५ मिनिटांनी राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार पूर्ववत झाले.

दोन न्यू फंड ऑफर्स

motilal ostwal असेट मॅनेजमेंट कंपनीने (एएमसी) दोन न्यू फंड ऑफर्सची (एनएफओ) घोषणा केली आहे. मोतीलाल ओसवाल असेट अलोकेशन पॅसिव फंड- अॅग्रेसिव आणि मोतीलाल ओसवाल असेट अलोकेशन फंड पॅसिव फंड ऑफ फंड्स-काँझर्वेटिव्ह असे दोन फंड 19.02.2021पासून  गुंतवणुकीसाठी खुले झाले. हे फंड ऑफ फंड्स (एफओएफ्स) डिजिटल पार्टनर ग्रोव (Groww) अॅपवरही उपलब्ध आहेत. यामुळे गुंतवणूकदाराला त्याची जोखीम पत्करण्याची तयारी व गुंतवणुकीची उद्दिष्टे यांच्या प्रमाणे कमी खर्चाच्या तसेच वैविध्यपूर्ण असेट्समध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल. मर्यादित (मॉडरेट) पोर्टफोलिओच्या शोधात असलेला गुंतवणूकदार दोन्ही फंड्समध्ये ५०:५० गुंतवणूक करू शकतो. आत्तापर्यंतच्या सर्वांत निचांकी स्तरावरील संबंधित असेट वर्गांमध्ये गुंतवणूक करण्याचा लाभ दोन्ही फंड्स घेऊ शकतात. एनएफओ बंद होण्याची तारीख :…

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या ४ योजनांचा परतावा पहा !!!!

सायक्लिकल म्हणजे असे शेअर्स जे विशिष्ट थीमवर किंवा हंगामावर आधारित असतात. प्राप्त आकडेवारीनुसार गेल्या ९ महिन्यांत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्फ्रा फंडाने ८२.९ टक्के परतावा दिला आहे. तर याच्या इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने ७३.५ टक्के, मल्टी असेट फंडाने ४८.८ टक्के आणि इक्विटी अँड डेट फंडाने ५५.६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ९ महिन्यात ज्या गुंतवणूकदारांनी सायक्लिकल शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल त्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या ४ योजनांनी ९ महिन्यांत ८२ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. विशेष म्हणजे हा परतावा सरकारी कंपन्यांच्या शेअर्समधून मिळाला आहे.  

टाटा समूहाचा किराणा व्यवसायातील प्रवेश

मागील सहा महिन्यांपासून ऑनलाईन किराणा व्यवसायात येण्यासाठी तयारी करणाऱ्या टाटा समूहाने मोठी घोषणा केली आहे. टाटा समूहाने ऑनलाईन किराणा व्यवसायातील 'बिग बास्केट' या कंपनीची थेट खरेदी केली आहे. बिग बास्केटमधील तब्बल ६८ टक्के हिस्सा टाटा समूहाने ९५०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. या डीलनंतर टाटा समूहाचा किराणा व्यवसायातील प्रवेश सुकर झाला आहे. टाटा समूह एक सुपर अॅप विकसित करत असल्याचे म्हटलं होते. टाटा सन्स आपल्या सुपर अॅपसाठी तोडीचा भागिदाराचा शोध टाटा समूहाकडून घेतला जात होता. टाटा या सुपर अॅपच्या माध्यमातून फॅशन, लाइफस्टाइल, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, किराणा, विमा, वित्तीय सेवा यांसारखे व्यवसाय एकाच छताखाली आणण्याची टाटा समूहाची योजना आहे. या सुपर अॅपमध्ये…

 कॅनरा रोबेको म्युच्युअल हायब्रीड फंड

कॅनरा बँक ही भारतातील  राष्ट्रीय बँक आहे.११३ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणा-या या बँकेच्या दहा हजारांहून अधिक शाखा आहेत आणि जवळपास नऊ कोटी ग्राहक आहेत.अशा या बँकेने १९८७ साली ‘ कॅनबँक म्युच्युअल फंड’ ची स्थापना केली. १९२९ पासून काम करणारी रोबेको ग्रुप ही नेदरलॅंड मधील जागतिक दर्जाची अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे.१५ देशांमध्ये तिचा विस्तार आहे. कॅनबँक म्युच्युअल फंड आणि रोबेको २००७ साली एकत्र आले आणि त्यांनी ‘ कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड ’ ची स्थापना केली. भारतामध्ये आज काम करणा-या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी ‘ कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड ’ ही एक दर्जेदार कंपनी आहे. कॅनरा रोबेको इव्कीटी हायब्रीड फंड हा  या कंपनीने…

‘पीपीएफ’वरील कराबाबत सरकारची मोठी घोषणा

भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) मध्ये अडीच लाखांवरील गुंतवणुकीवरील व्याजावर लागू होणार कर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसाठी नसेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

End of content

No more pages to load