क्राफ्ट्समन ऑटोमेशनची समभाग विक्री योजना

क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेडने IPO योजना जाहीर केली आहे. हा इश्यू १५ मार्च रोजी खुला होणार असून १७ मार्च २०२१ रोजी बंद होईल. यासाठी प्रती शेअर १४८८ ते १४९० रुपये इतका किंमत पट्टा निर्धारित करण्यात आला आहे. या योजनेत किमान १० शेअरसाठी गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये कंपनीच्या एकूण १५० कोटींचा फ्रेश इश्यू असून एकूण ४५२१४५० पर्यंतच्या इक्विटी शेअरच्या विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश आहे. या ऑफरमध्ये किमान १० इक्विटी शेअर्सच्या एकगठ्ठा खरेदीसाठी व त्यानंतर १० च्या पटीत इक्विटी शेअर्स विकत घेण्यासाठी बोली लावता येईल.

अनुपम रसायन इंडियाची समभाग विक्री योजना

सुरत येथील कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत असलेली अनुपम रसायन इंडिया लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री करुन निधी उभारणीचा निर्णय घेतला आहे. ही योजना १२ मार्च २०२१ पासून खुली होणार असून १६ मार्च २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. या योजनेत प्रती शेअर ५५३ रुपये ते ५५५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. आयपीओतून ७६० कोटी उभारले जाणार आहेत. कंपनीचा शेअर बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”)वर सूचीबद्ध होणार आहे. अनुपम रसायन ही एक अग्रगण्य कंपनी असून ती भारतात कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत आहे. फ्रॉस्ट अँड सुल्लीवन निर्मित आणि…

पीएसयू बॉण्ड्समध्ये गुंतवणुकीची संधी– एडेलवाईस असेट मॅनेजमेंटची नवी गुंतवणूक योजना

भारतातील वेगाने वाढणाऱ्या एएमसीपैकी एक असलेल्या एडेलवाईस असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आज एडेलवाईस nifty psu bond-२०२६ ची घोषणा केली. अशा प्रकारचा हा पहिला निर्देशांक फंड आहे जो निष्क्रीयपणे व्यवस्थापित असेल आणि एएए मुल्यांकित (AAA Rated) पीएसयू बॉण्ड्स आणि स्टेट डेव्हलोपमेंट लोन्स (एसडीएल) मध्ये गुंतवणूक करेल. या योजनेत ५००० रुपयांपासून गुंतवणूक करता येईल. या फंडची मुदतपूर्तता ३० एप्रिल २०२६ असेल. परिपक्वतेनंतर गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे उत्पन्न परत मिळेल. गुंतवणूकदारांना परताव्याची स्थिरता आणि दृश्यता मिळावी यासाठी फंड परिपक्वतेपर्यंत बॉण्ड्स मध्ये निवेशीत राहण्याचे लक्ष्य ठेवेल. इंडेक्सएशन नंतर २० टक्के दराने कर आकारला जात असल्याने, हा निधी पारंपारिक निवेशाच्या मार्गांच्या तुलनेत अधिक कर-कार्यक्षम असेल,

आज महिला दिन

आज महिला दिन आहे !  या दशकातील हा पहिला महिला दिन !! सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत असे दिसत असूनही अनेक महिलांमध्ये अर्थसाक्षरता आहे हे जाणवत नाही ! महिलांनी  अर्थसाक्षर व्हावे यासाठी या काही प्राथमिक सूचना धनलाभतर्फे करण्यात येत आहेत !! बहुतांश महिला त्यांचे आर्थिक व्यवहार पाहत नाहीत, ही समस्या आहे. याच वेळी *दीर्घकालीन निर्णय आणि आर्थिक नियोजन * यापासून महिला दूर राहतात. महिलांना दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा आत्मविश्‍वास आणि अनुभव नसणे अथवा पतीकडून स्वातंत्र्य न मिळणे अथवा पालकांकडून त्यांच्यातील या नैसर्गिक क्षमतेला डावलले जाणे, ही यामागील कारणे असतात. खूप आधीपासून भारतीय महिला या *बचत करणाऱ्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करणाऱ्या *…

her circle

To mark International Women’s Day 2021, Reliance Foundation Chairperson Nita Mukesh Ambani has launched ‘Her Circle’, a dedicated content, social media, and digital platform for women. The digital networking platform aims at empowering women and strengthen the bonds of sisterhood globally by providing them a safe space to interact, engage, collaborate, and build each other. Her Circle is envisioned to be a worldwide digital collective of women. While it will begin with Indian women, it will be open to participation of women from across the globe.

योनो–सुपर सेव्हिंग डेज

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या कर्जपुरवठादार बँकेने ‘योनो सुपर सेव्हिंग डेज’ या खरेदी महोत्सवाचे दुसरे पर्व जाहीर केले आहे. हा चार दिवसीय महोत्सव ४ मार्च रोजी सुरू होत असून ७ मार्च रोजी त्याची सांगता होणार आहे. या खरेदी महोत्सवामधे एसबीआयचा बँकिंग आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म योनोच्या युजर्सना आकर्षक सवलती आणि कॅशबॅक मिळणार आहे.

सर्वात कमी कर्जदर

अनलॉकनंतर अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असून सर्वच क्षेत्रात सध्या तेजी दिसून आली आहे. त्यामुळे बँकांनी ही संधी साधून जास्तीत जास्त कर्ज वितरणाचे नियोजन केले आहे. 'एसबीआय'नंतर आता खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने कर्जाचा दर कमी करून तो ६.६५ टक्के केला आहे. हा विशेष कर्जदर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू असेल, असे बँकेने म्हटलं आहे. विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रातील हा सर्वात कमी कर्जदर आहे.

‘एमटीएआर टेक्नोलॉजिज’चा आयपीओ

MTAR Techonologies या हैदराबाद येथील प्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीने भांडवली बाजारातून निधी उभारणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीची समभाग विक्री योजना बुधवार ३ मार्च रोजी खुली होणार असून ५ मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी अर्ज करता येईल. आयपीओसाठी कंपनीने प्रति इक्विटी शेअरसाठी ५७४ रुपये ते ५७५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदाराला किमान २६ शेअरसाठी बोली लावता येईल. तसेच १३ लॉटसाठी अर्ज करता येऊ शकतो, असे माहिती पत्रकात म्हटलं आहे. आयपीओत १२४ कोटीपर्यंत फ्रेश इश्यू आणि ४७३ कोटींचे ८,२२,२७० इक्विटी शेअर्सपर्यंत विक्री (ऑफर ऑन सेल) करण्याची योजना आहे. १० मार्च रोजी शेअर वाटप होण्याची शक्यता आहे. तर १५ मार्चपासून…

एनएसई

राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) गेल्या चार वर्षात आपल्या तंत्रज्ञान पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने मोठी गुंतवणूक केली आहे. 'एनएसई'ने या भांडवलावरील वर्षिक रोख खर्चात साधारण तिपटीने वाढ केली असून आतापर्यंत सुमारे ९०० कोटी रुपये गुंतवले आहेत. सध्या 'एनएसई'कडे एक मजबूत, लवचिक, सुरक्षित आणि त्रुटीविरहित तंत्रज्ञान पायाभूत व्यवस्था असून या व्यवस्थेत त्या त्या उपकरण क्षेत्रात सर्वोत्तम अशा कंपन्या-जसे सिस्को, एचपी, डेल, हिताची, चेकपॉईंट, पालो ऑल्टो, ऑरेकल इत्यादींची उपकरणे वापरण्यात आली आहेत. तसेच टीसीएस, कॉन्ग्नीझंट आणि विप्रो अशा सेवा प्रदाता कंपन्यांकडून सेवा घेतली जात आहे. 'एनएसई' ही कामाच्या आकारमानानुसार जगातील सर्वात मोठी डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज कंपनी असून, अत्यंत मोठ्या प्रमाणातील डेरीव्हेटिव्ह समर्थपणे हाताळण्याचा त्या कंपनीचा…

प्राथमिक बाजार (Primary Market)

प्राथमिक बाजार (Primary Market) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन प्रकार उपलब्ध असतात. पहिला प्रकार हा प्राथमिक बाजार ( Primary Market ) असून आपण नेहमी जिथे शेअर ट्रेडिंग करतो त्याला (Secondary Market ) मार्केट असे म्हटले जाते. Secondary मार्केट मध्ये बहुतांशी व्यवहार हे आपल्या DP मार्फत NSE व BSE ह्या दोन प्लॅटफॉर्मवर मुखत्वे होतात,आणि ब-याच जणांना प्राथमिक मार्केटसंबधी खूप कमी माहिती असते. एखादी नवीन कंपनी बाजारात लिस्टिंग होणार असेल तर त्याच्या प्रवर्तकांना सेबी कडे नोंदणी करून प्राथमिक बाजारात आपले समभाग लोकांसाठी उपलब्ध करून द्यावे लागतात.त्याची रक्कम, त्याचा दर आदिबाबतची माहिती विवरण पत्रकात देवून आपण उभारत असलेला निधी कोणत्या प्रकारच्या वृद्धीसाठी वापरणार…

End of content

No more pages to load