आयटीआय फार्मा आणि हेल्थकेअर फंड ही नवीन योजना जाहीर

आयटीआय म्युच्यूअल फंडाने iti pharma and healthcare fund  ही नवीन योजना बाजारात आणली आहे. या योजनेचा एनएफओ १८ ऑक्टोबर २०२१ ला खुला झालेला असून १ नोव्हेंबर २०२१ ला बंद होत आहे. या योजनेत किमान गुंतवणूक पाच हजार रुपयांची असून त्यानंतर एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. या फंडाचे व्यवस्थापन प्रदीप गोखले आणि रोहन कोरडे हे संयुक्तपणे सांभाळणार आहेत. फंडातील निधी फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतविला जाणार असून निफ्टी हेल्थकेअर टोटल रिटर्न इंडेक्स या फंडासाठी पायाभूत निर्देशांक राहणार आहे. आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत समाधानाचा अनुभव मिळण्यासाठी अतिशय छोट्या कालावधीत समुहाने आपल्या एएमसीत उच्च कारभार, मनुष्यबळ, प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा याबाबत…

चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर ते परत मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

कधी- कधी पैसे चुकीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. आणि असे झालेच तर त्यावर त्वरित काही पावले त्वरित उचलणे आवश्यक आहे. असे, न केल्यास तुम्ही तुमचे पैसे गमावू शकता . येथे आम्ही तुम्हाला नेट बँकिंग टिप्सबद्दल सांगत आहोत, ज्यांचा वापर बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करताना केला पाहिजे. या प्रकारचे व्यवहार प्रेषक आणि प्राप्तकर्ता यांच्यात होतात आणि काही मिनिटांत पैसे हस्तांतरित केले जातात. यूपीआय सारख्या प्रणालींपेक्षा वेगळे, क्यूआर कोड फोन नंबर आणि रिसीव्हर निवडण्याच्या इतर पद्धतींवर अवलंबून असतो. पैसे हस्तांतरित करण्याच्या इतर पद्धतींमध्ये व्यवहार करण्यापूर्वी प्राप्तकर्त्याची माहिती व्यक्तिचलितपणे जोडणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, तुमच्या बँक आणि तुमच्या स्थानिक बँक व्यवस्थापकाला त्वरित कळवा.…

InvITs म्हणजे काय? जाणून घ्या गुंतवणूक संधी—

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आपल्या पहिल्या खाजगी पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट च्या माध्यमातून पाच ते सहा हजार कोटी रुपये जमा करण्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. या गुंतवणूकदारांमध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIB) आणि ओंटारियो म्युनिसिपल एम्प्लॉइज रिटायरमेंट सिस्टम (OMERS) यांचा समावेश आहे. इन्व्हिटद्वारे (InvIT) सरकारी मालकीच्या उपक्रमाद्वारे मालमत्ता कमाईची ही पहिली वेळ असेल. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) म्युच्युअल फंडाप्रमाणे असतात. ज्याद्वारे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणूकदार कमी गुंतवणूक करून परताव्याच्या स्वरूपात उत्पन्नाचा एक छोटा हिस्सा मिळवू शकतात. InvITs म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसारखे काम करतात. InvIT ट्रस्ट म्हणून स्थापिक केली जाऊ शकतात आणि सेबीकडे नोंदणीही केली जाऊ शकते.…

राष्ट्रीय पेन्शन योजना आकर्षक; केंद्र सरकारने हे केले महत्वाचे बदल

निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देणाऱ्या राष्ट्रीय पेन्शन योजनेला केंद्र सरकारने आकर्षक केलं आहे. पेन्शन फंडांचे नियमन करणाऱ्या पीएफआरडीएकडून या योजनेत सहभागी वयाची वयोमर्यादा वाढवण्यात आली असून गुंतवणुकीबाबत काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन नियमानुसार यापुढे राष्ट्रीय पेन्शन योजनेत व वर्ष ७० पर्यंतची व्यक्ती सहभागी होऊ शकते. सध्याची वयोमर्यादा ६५ असून त्यात नव्या नियमानुसार पाच वर्षांची वाढ करण्यात आली आहे. १८ ते ७० वयोमर्यादतील व्यक्ती एनपीएससाठी पात्र आहे, असं पीएफआरडीएने म्हटलं आहे. आणखी एक महत्वाचा बदल सरकारने या योजनेत केला आहे. त्यानुसार ६५ वर्षांनंतर एनपीएस गुंतवणूक करणाऱ्यांना तीन वर्षांचा किमान गुंतवणूक कालावधी (लॉकइन) आहे. योजनेतून बाहेर पडण्यासाठी कमाल ७५ वर्ष वय…

‘नाॅमिनेशन’चे महत्व आणि उपयुक्तता

भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या म्युच्युअल फंड नियम १९९६ च्या कलम २९ ए च्या परिशिष्ट ४ नुसार म्युच्युअल फंडांना किरकोळ गुंतवणूकदारांपुढे नामनिर्देशनचा पर्याय उपलब्ध करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन (नॉमिनेशन) ही अशी सुविधा आहे ज्याने वैयक्तिक युनिटधारकाला आपला नॉमिनी (वारसदार) नियुक्त करता येतो. जो युनिटधारकाचा अचानक मृत्यू झाला तर युनिटधारकाकडील युनिटची विक्री करणे किंवा गुंतवणूक पैसे काढून घेण्याचा दावा करू शकतो. करोना संकटाने पुन्हा गुंतवणूकदारांच्या नामनिर्देशनाचे (इन्व्हेस्टर नॉमिनेशन) गंभीर मुद्दयाला महत्व आले आहे. या संकटकाळात ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना (जे युनिटहोल्डर्स) गमावले अशाना युनिट्सबाबत संघर्ष करावा लागत आहे. ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी अॅम्फीने ज्या ठिकाणी नॉमिनी नाही अशा वैयक्तिक युनिटधारकाचे मृत्युपश्चात…

बँक ग्राहकांनो ही बातमी तुमच्यासाठी !!!!

बँक ग्राहकांनो ही बातमी तुमच्यासाठी. देशातील प्रमुख बँकांपैकी तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर कोड पुढील महिन्याच्या १ तारखेपासून इतिहासजमा होणार आहेत. या तीन बँकामध्ये अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या तीन बँका आता इतर बँकांचा भाग होणार आहेत. अलाहाबाद बँक १ एप्रिल २०२० रोजी इंडियन बँकेत विलीन झाली आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया १ एप्रिल २०१९ पासून पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विलीन झाल्या आहेत.

म्युच्युअल फंडांच्या ‘एमएनसी’ फंडांमध्ये गुंतवणुकीचे फायदे

बहुराष्ट्रीय कंपन्या (एमएनसी) या अशा कंपन्या असतात ज्या आपल्या देशासह इतर देशांतही व्यवसाय करतात. या कंपन्यांचे मध्यवर्ती कार्यालय असते. एमएनसी कंपन्या स्थानिक बाजारांसाठी जागतिक उत्पादने आणि सेवा पुरवतात ज्यात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्तम संस्थात्मक संस्कृतीचा समावेश असतो. ते गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध करून देतात. बहुराष्ट्रीय कंपन्या या बदलत्या काळाबरोबर आपली स्थिती मजबूत करणा-या सुस्थापित कंपन्या असतात. त्यांनी विविध बाजार चक्रांचा सामना केलेला असतो. यामुळे त्या केवळ बाजारात टिकून राहत नाहीत तर स्पर्धेत राहून वेगाने पुढे जाण्यातही त्यांनी यश मिळवले असते. हे संभाव्यतः मजबूत ब्रँडची कमतरता, पेटंट अधिकार, कमी किमतीच्या उत्पादन केंद्रांचे उत्पादन इत्यादींमुळे असू शकते. या कमतरतेची पूर्तता बहुराष्ट्रीय…

टाटा डिजिटल इंडिया फंड

भारत हा इंटरनेट वापरकर्त्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेला देश आहे. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशभरात रोज ७४.९ कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांच्या यादीत भारत रोज नवे उच्चांक प्रस्थापित करीत असून हा आकडा २०४० पर्यंत १.५ अब्ज वापरकर्त्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. टाटा डिजिटल इंडिया फंड हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक संधींचा लाभ घेणारा फंड आहे. गुंतवणुकीचा परीघ मर्यादित असल्याने फंडाच्या गुंतवणुकीत ३० ते ३५ कंपन्यांचा समावेश असतो. समभाग केंद्रित गुंतवणुका असल्याने ‘धाडसी’ गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणुकीचा विचार करावा. जोखीम सहिष्णुता कमी असल्यास या फंडात गुंतवणूक टाळावी. फंडाचा मानदंड असलेल्या एस अ‍ॅण्ड पी बीएसई आयटी निर्देशांकाने २४ ऑगस्ट रोजी वार्षिक ८७.७५ टक्के…

* शेअर बाजार समज आणि गैरसमज *

* शेअर बाजार समज आणि गैरसमज * भारताची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता, भारतामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील गुंतवणूक ही फारच कमी आहे. गेल्या वर्षभरात 67 लाखापेक्षा जास्त नवीन डिमॅट खाती उघडली गेली असली तरी, एकंदारीत “3 ते साडे 3 कोटींच्या ” संख्येची * डिमॅट व ट्रेडींग * अकाऊंट सध्या कार्यरत आहे. आणि सध्या ट्रेडींग संबधीचे सर्व व्यवहार हे* ऑनलाईन * स्वरूपात असल्याने बाजारासंबंधी प्रचलित असलेले गैरसमज आणि वस्तुस्थिती यासंबंधी काही मुद्दे मी खाली सांगत आहे. 1.शेअर बाजारातील मिळालेला फायदा हा तिथेच सोडावा लागतो. प्रत्यक्षात अशी स्थिती नाही, गेल्या वर्षभरात माझ्या पाहण्यात अनेकांनी शेअर बाजारातुन मिळालेला फायदा हा रिडीम करुन दुसरीकडे…

नफ्यासाठी समभाग विकण्याच्या दृष्टीने

आता चालू असलेली तेजीच्या माध्यमातून जी काही नवनवीन शिखर गाठली जातात ती तांत्रिक विश्लेषणातील विविध प्रमेयांमुळेच. आता या प्रमेयांचीदेखील वरची लक्ष्य सेन्सेक्सवर ५८,००० ते ५९,५०० आणि निफ्टीवर १७,३०० ते १७,७०० साध्य होताना दिसतील. त्यामुळे आता सावध होण्याची गरज आहे. या ऐतिहासिक उच्चांकावरून निर्देशांक सेन्सेक्स ५३,५०० ते ५१,८०० आणि निफ्टी निर्देशांक १६,००० ते १५,५०० पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. म्हणूनच सध्याच्या ऐतिहासिक उच्चांकाला अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी, नफ्यातील अर्धे समभाग विकायला हवेत. नफ्यासाठी समभाग विकण्याच्या दृष्टीने, त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी खालील गोष्टी उपयोगी पडतील १.आपल्याकडे असलेल्या चांगल्या प्रतीच्या समभागांची जी आपण विक्री करणार आहोत ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे, किंबहुना ही नफारूपी…

End of content

No more pages to load