SIP + HIP + TIP += full security

स्वातंत्र दिनाच्या मुहूर्तावर आर्थिक स्वातंत्र्यासंबंधी * *“धनलाभमध्ये " * दिलेला लेख पाहून माझे एक मित्र त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी कार्यालयात आले. त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपामुळे आजपर्यंत त्यांनी स्वत: व आपल्या पत्नीच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने *प्रीमियम भरणे आवश्यक असलेल्या जीवन विमा (LIC) * च्या पॉलिसी घेतल्या आहेत असे संगितले. पण रिस्कफॅक्टर सोडता त्याद्वारे मिळणारा परतावा हा Infletion * सुद्धा पार पडू शकत नाही हे त्यांच्याही ध्यानी आले नाही. आणि त्या दृष्टीने त्यांना SIP (Systematic Investment Plan ), HIP (Health Insurance Plan), TIP (Term Insurance Plan) या संबधी मी माहिती दिली. आज ही माहिती मी तुम्हा सर्वांना या लेखाद्वारे थोडक्यात सांगणार आहे. एखादे आर्थिक…

१० हजारांच्या SIP चे झाले १.०८

गुंतवणूक जर दीर्घ कालावधीकरिता असेल तर त्याचा चांगला फायदा होतो. उदाहरण द्यायचे झाल्यास आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या १७ वर्षात दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ती रक्कम आज १.०८ कोटी रुपये झाली असेल. म्हणजेच वार्षिक १७.५ टक्के सीएजीआर दराने या योजनेत परतावा मिळाला आहे. सीएजीआर म्हणजे चक्रवृद्धी व्याज दराने मिळणारा परतावा. एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही सुविधा म्युच्युअल फंडमध्ये असते. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी योजनेची सुरुवात ऑगस्ट २००४ मध्ये करण्यात आली होती. हा म्युच्युअल फंड उद्योगातील जुन्या व्हॅल्यू फंडपैकी एक आहे ज्याने १७ वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनेत गुंतवणूकदारांची…

‘गोल्ड बॉण्ड’मध्ये करा कमी दरात गुंतवणूक

गोल्ड बॉण्ड २०२१-२२ मधील VI मालिका सोमवार ३० ऑगस्ट २०२१ पासून खुली होणार आहे. या योजनेसाठी सरकारने प्रती ग्रॅम ४७३२ रुपये भाव निश्चित केला आहे. याआधीच्या गोल्ड बॉण्ड योजनेच्या तुलनेत सोने दर ५८ रुपयांनी कमी आहे. डिजिटल माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांचे मूल्य ४६८२ रुपये प्रती ग्रॅम असेल. 'आरबीआय'ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात रोखे खरेदी कालावधीत रोख्यांची इश्यू किंमत ४७३२ रुपये प्रती ग्रॅम असेल. यापूर्वीच्या बाॅण्ड योजनेनुसार सोनं ५८ रुपयांनी स्वस्त आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या योजनेत प्रती ग्रॅम दर ४७९० रुपये होता. नोव्हेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरु केली होती. रिझर्व्ह बँकेने २०२०-२१ या…

ऑलिंपिक आणि गुंतवणूक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला भालाफेकीतील सुवर्णपदक प्रदान केल्यानंतर वाजवल्या गेलेल्या भारतीय राष्ट्रगीताची ध्वनिचित्रफीत पाहताना भारतीय असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटला असेल. मोठी स्वप्न पाहणे, या स्वप्नपूर्तीसाठी नियोजन करणे, दृढनिश्चय करणे, कठोर परिश्रम करणे आणि हार न मानता येणाऱ्या अडचणींवर मात करत ध्येय गाठणे असे अनेक जीवनातील धडे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धा आपल्याला शिकवते. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने आपल्याला अनेक ऑलिम्पिकमधून धडे शिकण्यासारखे आहेत. टोक्यो ऑलिम्पिकच्या पदक तालिकेवर भारताच्या वतीने पहिल्या पदकाची कमाई मीराबाई चानूने केली, परंतु रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू तिच्या तीन प्रयत्नांमध्ये वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्यासाठी ही मोठी निराशा होती, पण तिने स्वत:च्या क्षमतांचे आकलन केले. ज्यामुळे तिला समजले की, ऑलिम्पिक…

मुत्तुट मिनी फायनान्स लिमिटेड

मुत्तुट मिनी फायनान्स लिमिटेड कंपनीने सिक्वियर आणि अनसिक्वियर डिबेंचरची घोषणा केली आहे. (NCD) . या प्रत्येक डिबेंचरची किमंत 1000/- रु. आहे आणि कंपनी 125 कोटी रु पर्यंत डिबेंचर विकणार आहे. यासाठी कंपनीने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.यात वार्षिक परतावा 8.75% पासून 10% पर्यंत मिळणार आहे. ही विक्री 18 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली असून 9 सप्टेंबर पर्यंत सुरू राहू शकते. कंपनीकडे आता NPA 0.75% इतके आहे. सोने तारण कर्ज , मायक्रोफायनान्स आणि इन्शुरन्स संबधी कंपनी व्यवसाय करते. या कंपनीचा NCD तर्फे 125कोटी रु. कोटी उभे करण्याचे उद्धिष्ट ठरवले आहे. या जमा होणार्‍या निधिचा उपयोग सामान्य कार्पोरेट उद्धीष्टे आणि कर्जाच्या…

सोन्या संबंधी थोडेसे

* सोन्या संबंधी थोडेसे * भारतीय लोकांना सोने खरेदीमध्ये पारंपारिक दृष्टीने आणि गुंतवणूकीच्या दृष्टीने सुध्दा खूप स्वारस्य असते. अजूनही सोन्यातील गुंतवणूक ही secure स्वरूपाची आहे अशी मानली जाते. तसेच सोन्याचे वाढते दर लक्षात घेता सोन्याचा * परतावा * हा मोठा आहे असेही समजले जाते. आपल्या देशात केवळ सोने तारण घेऊन कर्ज व्यवहार करणा-या अनेक संस्था मोठया झाल्याचे दिसून येत आहे . या सोन्यासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे : 1) सर्वात मोठी सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सोने मिळते. २) भारतात कोलार येथे सोन्याची मोठी खाण आहे पण सध्या 2003 पासून ही खाण बंद आहे. ३) जागतिक स्तरावर लंडन बुलीयन मार्केट…

रिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा  उपयोग —

रिटायरमेंट प्लॅनिंग साठी राहत्या घराचा  उपयोग --- रिव्हर्स मोर्गेज कर्ज म्हणजे काय?👈 रिव्हर्स मॉर्गेज’ हा गृहकर्जाच्या अगदी उलट प्रकार आहे. गृहकर्जामध्ये आपण कर्ज काढून घर घेतो, तर ‘रिव्हर्स मॉर्गेज’मध्ये मात्र स्वत:च्या मालकीचं राहतं घर बॅंकेकडं मॉर्गेज म्हणजे तारण ठेवून कर्ज घेता येतं. विशेषतः जेव्हा ज्येष्ठ नागरिकांकडची उत्पन्नाची साधनं बंद होतात आणि इतर काही पर्याय राहत नाही, तेव्हा अशा वेळी ते या पर्यायाचा वापर करून स्वतःचं बाकी आयुष्य स्वाभिमानानं जगू शकतात👈. वेगवेगळ्या बॅंकांकडं चौकशी करून आपल्या गरजेनुसार योग्य अशी योजना निवडता येते. असं कर्ज एकरकमी अथवा दरमहा हप्त्यानं घेता येतं. विशेष म्हणजे हे कर्ज फेडण्याची जबाबदारी कर्जदारावर नसते.👈☺ त्यामुळं ती मोठी…

एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड वितरणाला मुभा

खासगी क्षेत्रातील अग्रणी एचडीएफसी बँकेवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने मंगळवारी अंशत: शिथिल केले. त्यामुळे आठ महिने सुरू राहिलेल्या बंदीनंतर बँकेला पुन्हा नवीन क्रेडिट कार्ड वितरण शक्य होणार आहे. तथापि कोणतीही नवीन डिजिटल सुविधा सुरू करण्यावरील बँकेवरील निर्बंध मात्र तूर्त लागू राहणार आहेत. तांत्रिक बिघाडामुळे अनेकवार सेवा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचा दंड म्हणून रिझर्व्ह बँकेने बंदीचे हे अभूतपूर्व पाऊल डिसेंबर २०२० मध्ये टाकले होते. आता ही बंदी उठविण्याचा निर्णय घेताना, माहिती-तंत्रज्ञानविषयक परीक्षण पूर्ण केले गेले आहे, असे एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाचे लेखी पत्रही रिझर्व्ह बँकेने मागितले असल्याचे समजते.  

‘एसआयपी’ गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी

म्युच्युअल फंड आणि त्यातील गुंतवणुकीची नियोजनबद्ध पद्धती अर्थात ‘एसआयपी’बद्दल सर्वसामान्यांची एकंदर रुची गेली काही वर्षे वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेतील ‘एसआयपी’ गुंतवणुकीचा ओघ विक्रमी उच्चांकावर पोहचला असून, महाराष्ट्राचे त्यात सर्वाधिक योगदान आहे. या आघाडीवर देशस्तरावर अग्रस्थानी असलेल्या दहा शहरात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरचा समावेश आहे. मागील वर्षभरात टाळेबंदीमुळे बहुतांशांचे महिन्याचे गणित कोलमडले आहे. तरी काही पूरक उत्पन्नासाठी भांडवली बाजारात पहिल्यांदा सक्रिय झाल्याचेही आढळून येते. मोठय़ा प्रमाणात उघडली गेलेली डीमॅट खाती या सक्रियतेची ग्वाही देतात. थेट भांडवली बाजारात सहभागाऐवजी अनेकांनी म्युच्युअल फंडाची कास धरली. ‘एसआयपी’ खात्यांची वाढती संख्या आणि दरमहा ‘एसआयपी’ मार्गाने ९,६०८ कोटी रकमेची (जुलै…

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २०२१-२२ मधील V मालिका आज सोमवार ९ ऑगस्ट २०२१ पासून खुली झाली आहे. यासाठी सरकारने प्रती ग्रॅम ४७९० रुपये भाव निश्चित केला आहे. याआधी जुलै महिन्यातील गोल्ड बॉण्डच्या तुलनेत १७ रुपयांनी कमी आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना ९ ते १३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत खुली राहणार आहे. 'आरबीआय'ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात रोखे खरेदी कालावधीत रोख्यांची इश्यू किंमत ४७९० रुपये प्रती ग्रॅम असेल. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकारने ऑनलाईन अर्ज आणि देय रक्कम डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसच्या प्रती ग्राम ५० रुपये सवलत जाहीर केली आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांचे मूल्य ४७४० रुपये प्रती ग्रॅम असेल,…

End of content

No more pages to load