पोर्टफोलिओ मॅनेजमेंट

पोर्टफोलिओ मॅनेज करून देण्याविषयी ज्या जाहिराती किंवा मार्केटिंग केले जाते, त्यामुळे बऱ्याच वेळा गुंतवणूकदारांना वाटते की, त्यांनी investment केल्यानंतर लगेचच १६ ते २० टक्के किंवा उच्चतम परतावा यायला सुरवात होईल. हीच खरी गोंधळाची सुरुवात आहे. मुळात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट काय आहे हे समजून घ्या. सेबीच्या मार्गदर्शक त्तत्वांनुसार गेल्या वर्षीपर्यंत पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये २५ लाख रुपये किमान गुंतवणूक ही मर्यादा होती आणि त्याकरिता त्यावर फी सुद्धा आकारली जायची. याचा अर्थ तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ एकाच पीएमएस संस्थेकडून तयार करायचा असेल व त्याच संस्थेने तुमच्या वतीने गुंतवणुकीचे निर्णय घेऊन तो पोर्टफोलिओ राखायचा असेल तर त्यासाठी त्या पीएमएसकडे तुम्हाला किमान २५ लाख रुपये जमा करावे लागतील.…

रिलायन्स जिओ आयपीओ आणणार ?

भांडवली बाजारातील तेजीच्या लाटेवर आशियातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी देखील स्वार होण्याची शक्यता आहे.अंबानी यांच्या रिलायन्स जिओचा IPOयाच वर्षी भांडवली बाजारात धडकेल, असा अंदाज सीएलएसए या ब्रोकरेज संस्थेनं व्यक्त केला आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या ५ जी स्पेक्ट्रम लिलावात मजबूत दावेदारी सादर करण्यासाठी अंबानींकडून रिलायन्स जिओच्या आयपीओची घोषणा केली जाऊ शकते, असा अंदाज या संस्थेने  व्यक्त केला आहे.

बालाजी अमाइन्स –मल्टीबॅगर

हैदराबाद येथे मुख्यालय असलेली बालाजी अमाइन्स ही भारतातील अ‍ॅलिफेटिक अमाईन आणि विशेष रसायने तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनी देशात मेथिलामाइन्स, इथिलामाइन आणि ऑफ स्पेशॅलिटी केमिकल्सचे डेरिव्हेटिव्ह्ज आणि फार्मा एक्सिपियंट्सचे उत्पादन, विक्री तसेच निर्यात करते. ही उत्पादने आषधनिर्माण, कृषी रसायन, शुद्धीकरण, रंग, जलरंग, कोटिंग, पॉलिमर, वस्त्र तसेच व्यक्तिगत व घरगुती निगा, प्राण्यांचे पोषण इत्यादी सेवा क्षेत्रात पुरविली जातात. या रसायन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने गेल्या वर्षात भागधारकांना २५४.८७% रिटर्न देत क्षेत्रातील मल्टीबॅगर बनण्याचा मान मिळविला आहे. कंपनीचा शेअर २२ डिसेंबर २०२१ रोजी रु. ३,१३०.५० वर स्थिरावला. वर्षभरापूर्वी, २२ डिसेंबर २०२० रोजी तो रु. ८८२.१५ या नीचांकी स्तरावर होता. परिणामी या कंपनीचे…

*गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय *

आपल्यातली जुनी पिढी पोस्ट ऑफिसमधील वेगवेगळ्या योजनामध्ये * गुंतवणूक करायची! सध्याची तरुण पिढी शेअरमार्केट किंवा म्युचूअल( Mutual Fund ) फंडमध्ये बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात. म्युचूअल फंडाची वाढती व्याप्ती लक्षात घेता *कोणता फंड निवडावा किंवा कोणत्या फंडातून आपल्याला जास्त परतावा मिळू शकतो ही माहितीसुद्धा * Fund Advisor तर्फे मिळत असते. यातील धोके बरेच लोक सांगत नाहीत , आणि बाजार घसरल्यास आपले नुकसान होऊ शकते याची जाणीवही बरेच जणांना नसते. पण आता *Senior Secured Bond * हा *wint wealth * तर्फे एक अत्यंत सुंदर असा पर्याय नव्याने उपलब्ध झाला आहे. त्याची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे !! *Senior Secured Bond * यामध्ये गुंतवलेल्या…

जोखीम निश्चित करणारी गुणोत्तरे

बिटा गुणोत्तर : बिटा हे गुणोत्तर निर्देशांकाच्या मानदंडाशी (बेंचमार्क) म्युच्युअल फंडच्या योजनेच्या अस्थिरतेची तुलना दर्शवणारे परिमाण आहे. निर्देशांकाच्या तुलनेत या योजनेची कामगिरी सकारात्मक किंवा नकारात्मक किती आहे ते बिटावरून लक्षात येते. म्युच्युअल फंडच्या स्टँडर्ड डेविएशनला निर्देशांकाच्या मानदंडाच्या स्टँडर्ड डेविएशनने भागून येणाऱ्या संख्येस आर-स्क्वेअरने गुणिले असता बिटा मिळतो. ज्यावेळी बिटा एक येतो त्यावेळी निर्देशांकातील शेअर्सच्या कामगिरीनुसार फंडाची कामगिरी समतूल्य ठरते. ज्यावेळी बिटा एकपेक्षा अधिक असतो त्यावेळी शेअर बाजारापेक्षा फंडाची कामगिरी अधिक उजवी ठरली आहे. तर ज्यावेळी बिटा एकपेक्षा कमी असतो त्यावेळी फंडाची कामगिरी निर्देशांक मानदंडापेक्षा कमी झाली आहे. जर फंडाचा बिटा एक आहे, तर याचा अर्थ शेअर निर्देशांकातील प्रत्येक १० टक्के…

आयुर्विमा घेताना लक्षात ठेवायच्या बाबी

जीवनांत आयुर्विम्याची साथ असायलाच हवी आणि आयुर्विमा घेण्याचा निर्णय शक्य तितक्या लवकर घेतला जायला हवा. तथापि तुमचा निर्णय चुकीचा ठरून पश्चातापाची वेळ येऊ नये या साठी लक्षात ठेवायच्या बाबी--- १. योग्य रकमेचा विमा घ्या. मासिक उत्पन्नाच्या किमान १०० पट विमा असायला हवा. विमा प्रकारातील ‘टर्म इन्शुरन्स’ (मुदत विमा) सर्वाकडेच असायला हवा. या विमा प्रकारात कमी विमा हप्त्यात अधिक रकमेचे विमा संरक्षण मिळते. २. विमा घेण्याचा आपला उद्देश काय आहे हे लक्षात घ्या. केवळ विमा प्रतिनिधी सांगतो म्हणून तो विमा प्रकार घेऊ नका. ३. जर बचत आणि गुंतवणुकीसाठी लागणारी शिस्त आपल्याजवळ नसेल तर विम्याकडे बचतीचा अनिवार्य मार्ग म्हणून बघा. कारण असे…

RBI ची रिटेल डायरेक्ट स्कीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच रिटेल डायरेक्ट स्कीमची सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. रिटेल डायरेक्ट स्कीमला (RDS) १२ नोव्हेंबर रोजी लॉन्च झाल्यापासून १२,००० हून अधिक नोंदणी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती आरबीआयने दिली. या योजनेचा उद्देश केंद्र सरकारी रोख्यांमध्ये (G-sec) मध्ये गुंतवणूक सुलभ करणे हा आहे. या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत, किरकोळ गुंतवणूकदार ऑनलाइन पोर्टल (https://rbirtaildirect.org.in) वापरून केंद्र सरकारची सुरक्षा (CG), राज्य सरकार सुरक्षा (SG) आणि ट्रेझरी बिले (T-Bills) यामध्ये किमान १०,००० रुपये आणि त्याच्या पटीत गुंतवणूक करू शकतात. गुंतवणूकदाराला आरबीआयमध्ये रिटेल डायरेक्ट गिल्ट (RDG) खाते उघडावे लागेल. तसेच…

आपली गुंतवणूक

काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची गोष्ट बाजारात घडली ज्याचे निरीक्षण साधारण कोणी केलं नसेल आणि ती म्हणजे आतापर्यंतची सर्वाधिक उलाढाल राष्ट्रीय शेअर बाजारात झाली. ती तारीख होती ८ नोव्हेंबर २०२१. साधारण ३६९ कोटी रुपयांचे व्यवहार या दिवशी बाजारात केले गेले. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे, मोठ्या प्रमाणावर खेळते भांडवल या बाजारात येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,००,००० होईल आणि निफ्टी २५,००० ते २८,००० असेल हे उगाचच सांगितलं जात नाहीये. त्याहीमागे एक सांख्यिकी डेटा आहे. याचा अभ्यास किंवा निरीक्षण आपण मराठीजन करत नाही. हे मुद्दाम लिहितो आहे, कारण अशी माहिती कोणीही ब्रोकर किंवा सल्लागार सहसा आपल्याला…

डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम – IPO

देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमची प्रवर्तक (प्रमोटर) वन ९७ कम्युनिकेशन्सचा १८,३०० कोटी रुपयांचा महा IPO आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक फायदेशीर ठरेल की नाही, याबाबत विश्लेषकांमध्ये मतभिन्नता आहे. काही विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना लिस्टिंग गेनसाठी हा आयपीओ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या आयपीओ (IPO) मध्ये ८,३०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आहेत, तर प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक १०,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. कंपनीने आयपीओसाठी २०८०-२१५० रुपये प्राईस बँड ठेवली आहे. कंपनीने आयपीओच्या आधी गेल्या आठवड्यात १२२ अँकर गुंतवणूकदारांकडून ८२३५ कोटी रुपये उभारले आहेत.

बिर्ला म्युच्युअल फंडाने सादर केली ‘ही’ योजना

आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाने नॅसडॅक १०० फंड ऑफ फंड्स (FoF) सादर केली आहे. ही एक ओपन एंडेड फंड ऑफ फंड्स असून जो परदेशातील ईटीएफ आणि नॅसडॅक १०० इंडेक्सवर आधारित इंडेक्स फंडात गुंतवणूक करेल. या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जगभरातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. यात फेसबुक, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, एडोब आणि इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येईल.

End of content

No more pages to load