आर्थिक स्वातंत्र्य

आर्थिक स्वातंत्र्य ही अशी मानसिक स्थिती आहे जी आपण आपल्या आर्थिक स्थितीबाबत पूर्णपणे चिंतामुक्त झालो आहोत असे वाटू लागल्यावर तसेच आपण आपल्या मनात वारंवार पैशांच्या बाबतीत विचार करणे थांबवून जीवनाचा मनमुराद आनंद उपभोगू याचा आत्मविश्वास वाटू लागल्यावर अनुभवू शकतो. आर्थिक स्वातंत्र्य फक्त नोकरी, व्यवसाय, स्वरोजगारामुळे येणाऱ्या उत्पन्नामुळे मिळत नाही. असे उत्पन्न तुमचे दैनंदिन जीवन जगण्याचे साधन असते परंतु बराचवेळ आपण ही मिळकत सुरु झाल्यावर  आर्थिक स्वतंत्र झालो अशी समज करून घेतो . ही समजूतच मुळी चुकीची आहे. जो पर्यंत आपण अशा मिळकतीवर आपले दैनंदिन जीवन जगणे अवलूंबून ठेवतो तो पर्यंत आपण आर्थिक स्वातंत्र्य पासून दूर असतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे पैशाचे…

वॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-

जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस आहे. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय प्रभावी ठरते. बफे यांनी वेळोवेळी सार्वजनिक मंचांवर गुंतवणुकीबाबतचे त्यांचे अनुभवही सांगितले आहेत. जाणून घ्या गुंतवणूक गुरू बफेंचे 5 गुंतवणूक मंत्र.. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते. परंतू त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका…

आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —

आज १५ ऑगस्ट रोजी आपण ७६ वा स्वातंत्र दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्य या शब्दात एक जादू आहे, हा शब्द शुद्ध हेवेत घेतलेल्या मोकळ्या श्वासासारखा अनुभव देऊन जातो. भारतीय राज्य घटनेने आपल्याला बरेच मूलभूत हक्क दिले आहेत. ते सगळे एक प्रकारचे स्वातंत्र्यच आहे. माणसाला जगण्याची मोकळीक मिळाली म्हणजे त्याच्यातील प्रतिभेला उभारी मिळते आणि तो उतुंग शिखरे पदांकृत करण्याचे ध्येय स्वतः समोर ठेवतो. मनातील ऊर्जेचा स्रोततच मुळी आपल्याला कडे असणारे स्वातंत्र्य असते . पारतंत्र्य या शब्दाची वेदना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जाणली आणि त्यातून आपल्या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त केले. आत्ताच्या स्वतंत्र भारतात इंग्रज सरकारच्या पारतंत्र्याची बोचरी जाणीव आपण अनुभवत नसलो…

अटल पेन्शन योजनI

केंद्र सरकारकडून अटल पेन्शन योजनेच्या पात्रतेबाबत नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलानंतर जे लोक आयकर भरतात त्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. वित्त मंत्रालयाने या संदर्भात एक आदेश जारी केला असून तो १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार आहे. प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना यापुढे अटल पेन्शन योजनेमध्ये पैसे गुंतवता येणार नाहीत. सध्या ज्या करदात्यांनी ‘अटल पेन्शन योजने’अंतर्गत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे, ती गुंतवणूक पुढे सुरू ठेवता येणार आहे, मात्र नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या करदात्यांना येत्या १ ऑक्टोबरपासून अटल पेन्शन योजना गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणार नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे दिली आहे.

श्रीराम फायनान्स ची fix deposit योजना

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी मुदत ठेवींवर ICRA, AA+/Stable द्वारे ICRA आणि IND AA+/स्टेबल इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने रेट केले आहे, जे उच्च दर्जाची सुरक्षितता दर्शवते.  कॅनरा बँक आणि इंडियन ओव्हरसीस बँकेसह काही बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवर व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचे एफडी दर सर्व खाजगी, सार्वजनिक आणि अगदी लहान वित्त बँकांच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे श्रीराम फायनान्स ची fix deposit योजना निश्चितच फायदेशीर योजना आहे ! आणि सुरक्षित सुद्धा !! याचे वाढलेल्या दरानुसार पाच वर्षासाठी ९.७३% yield मिळणार आहे !! आणि वरिष्ठ नागरिकांना ०.५% जादा व्याज मिळेलच !!

कर्ज अ‍ॅप खरे आहे की बनावट?

हे झटपट कर्जाचे युग आहे. आज प्रत्येकाला त्वरित कर्जाची गरज आहे. दररोज आपल्याला पर्सनल लोन घेण्यासाठी अनेक बँकांकडून फोन केले जातात. तसेच ई-मेल किंवा एसएमएसही पाठवले जातात. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पैसे उभारण्यासाठी पर्सनल लोन (personal app) हा एक उत्तम पर्याय आहे. हे कर्ज तात्काळ आणि सहजपणे मिळत असल्याने अनेक जण याला प्राधान्य देतात. सध्या इंटरनेटवर असे अनेक अ‍ॅप्स (loan app) आहेत जे स्वस्त कर्ज (loan) देण्याचे आश्वासन देतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लोक कर्ज घेतात. यातील काही अ‍ॅप्स खरे आहेत तर काही खोटेही आहेत. गेल्या काही दिवसांत अशा खोटा अ‍ॅप्स मार्फत अनेक लोकांना लुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे खरे कर्ज…

ब्लू चीप शब्द कसा आला?

ब्लू चीप शब्द कसा आला? ब्लू चीप हा शब्द कोठून आला याची माहिती आपण अगोदर करून घेऊया. १९ व्या शतकात अमेरिकेत पोकर हा खेळ प्रतिष्ठेचा होता. या खेळात पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगाच्या चीप्स म्हणजे चकत्या वापरल्या जायच्या. या चीप्सचे मूल्य अनुक्रमे १ डाॅलर, ५ डाॅलर आणि २५ डाॅलर असे. म्हणजे यामध्ये निळ्या रंगाच्या चीप्सचे मूल्य सर्वाधिक होते. त्यानंतर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात उच्च मूल्यासाठी ब्लू चीप शब्द वापरण्याची परंपराच झाली. त्यानंतर याची व्याप्ती वाढत जाऊन उच्च मूल्यांकन असलेल्या मालमत्तेसाठीसुद्धा ब्लू चीप हा शब्द वापरला जाऊ लागला. अमेरिकन शेअर बाजारात १९२० च्या सुमारास उच्च भावातील शेअर्स किंवा उत्तम प्रतीचे शेअर्स…

भारतीय रुपयात होणार आंतरराष्ट्रीय व्यापार

आता रुपयात आंतरराष्ट्रीय व्यापार केला जाईल. याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने केली असून याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. भारत जगभरात आयात आणि निर्यात करभारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने सोमवारी भारतीय रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सेटलमेंटसाठी "अतिरिक्त व्यवस्था" स्थापित केल्याची घोषणा केली आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीवर भर देऊन जागतिक व्यापाराच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारतीय रुपयामध्ये जागतिक व्यापारी समुदायाच्या वाढत्या हिताला पाठिंबा देण्यासाठी इनव्हॉइसिंग, पेमेंट आणि निर्यात/आयातीच्या सेटलमेंटसाठी अतिरिक्त व्यवस्था ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहेते. निर्यातीत भारतीय रुपयाचा वापर केल्यामुळे, जागतिक व्यापारात रुपयाला चालना मिळेल ज्यामुळे भारतीय रुपया मजबूत होईल. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करणे सहज होईल.  

टाटा समूहातील ‘टाटा टेक्नाॅलाॅजिज’ कंपनी आणणार IPO

१२ लाख कोटी रुपये बाजार मूल्य असलेली टीसीएस २००४ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. आता जवळपास दोन दशकानंतर टाटा समूहातील अन्य कंपनी भांडवली बाजारात उतरत आहे.टाटा मोटर्सचे भागीदारी पाठबळ लाभलेली टाटा टेक्नाॅलाॅजिज आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील या कंपनीत टाटा मोटर्सचा ७४ टक्के हिस्सा आहे. टाटा समुहाचे अध्यक्षपद भूषविणारे एन. चंद्रेशखरन हे टीसीएसचे सीईओ होते. समुहाचे २०१७ मध्ये सर्वेसर्वा बनल्यानंतर टाटा टेक्नॅलॅजिजच्या रूपात पहिलीच कंपनी आयपीओ आणत आहे.

प्राप्तिकर कायद्यातील नवीन तरतुदी

प्राप्तिकर कायद्यात झालेल्या बदलानुसार १ जुलै २०२२ पासून खालील बदल लागू झाले आहेत * ज्या करदात्यांनी आधार आणि पॅनची जोडणी अद्याप केलेली नाही त्यांना दुप्पट म्हणजे १,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. ३० जून २०२२ पर्यंत तो ५०० रुपये होता. * मागील अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायद्यात नव्याने ‘१९४ आर’ हे कलम जोडण्यात आले. हे कलम १ जुलै २०२२ पासून लागू झाले. या कलमानुसार उद्योग-व्यवसायातून किंवा व्यवसायातून उद्भवलेला कोणताही लाभ किंवा अनुलाभ, जो पैशात बदलता येण्याजोगा असो किंवा नसो, असा लाभ किंवा अनुलाभ प्रदान करण्यापूर्वी अशा लाभाच्या किंवा अनुलाभाच्या मूल्याच्या किंवा एकूण मूल्याच्या दहा टक्के दराने उद्गम कर (टीडीएस) कापण्याची तरतूद आहे.…

End of content

No more pages to load