सेबीने घेतला मोठा निर्णय

भांडवल बाजार नियंत्रक सेबीने देशातील म्युच्युअल फंडांना विदेशी कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. जानेवारी महिन्यात सेबीने विदेशी समभाग खरेदी करण्यास फंडांना मनाई केली होती. परंतु आता ही मनाई उठवली गेली आहे. त्यामुळे साहजिकच गुंतवणूकदारांना विदेशी समभागांमध्ये म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे. सध्या भूराजकीय अशांततेमुळे जागतिक शेअर बाजारांत मोठी पडझड झाली आहे. अनेक विदेशी कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत. अनेक विदेशी कंपन्यांचे बाजार भांडवलही घसरले आहे. या पार्श्वभूमीवर सेबीने म्युच्युअल फंडांना दिलेली ही अनुमती फंडांच्या आणि पर्यायाने गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडणार आहे.

टर्म इन्शुरन्स

पन्नास लाखांचा मुदत विमा काढल्यास (टर्म इन्शुरन्स) मृत्यू झाल्यानंतर खरंच पन्नास लाख रुपये मिळतात का? टर्म इन्सुरन्सचा अर्थ प्रथम समजून घेऊया! टर्म इन्शुरन्स म्हणजे तुमच्या आयुष्याचा विमा. जितक्या वर्षांचा विमा उतरविला गेला असेल, तितक्या वर्षांच्या आत जर विमाधारकाच्या बाबतीत काही बरीवाईट घटना घडली, तर त्याच्या कुटुंबाला विम्याची पूर्ण रक्कम मिळते. उदा: जर 'अ' ने, वयाच्या पंचविसाव्या वर्षी आपला पन्नास लाखांचा जीवन विमा उतरवला, तर त्याला पुढील पन्नास वर्षे, म्हणजे त्याच्या वयाच्या पंचाहत्तर वर्षांपर्यंत (टर्म इन्सुरन्सची जास्तीत जास्त मर्यादा), दरवर्षी ₹.4,400 (अंदाजे) इतका हप्ता भरावा लागेल. त्याचवेळी, त्याचा मित्र 'ब' ने तितकेच ₹.4,400 बँकेत आरडी मध्ये गुंतविण्यास सुरवात केली असे मानुया.…

‘या’ कॉर्पोरेट एफडी ३ वर्षांसाठी देतात भरघोस व्याज —

मुदत ठेव किंवा फिक्स्ड डिपॉझिट तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वात सोपी आणि सुरक्षित बचत योजनांपैकी एक आहे. हे जोखीम मुक्त आहेत आणि परताव्याची हमी देते. ज्येष्ठ नागरिक हे एफडीचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) आणि इतर वित्तीय संस्था आकर्षक व्याजदरांसह मुदत ठेव ऑफर करतात. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs)/हाऊसिंग फायनान्स कंपन्या (HFCs) द्वारे जारी केलेल्या कॉर्पोरेट मुदत ठेवी बँक मुदत ठेवी (FDs) पेक्षा जास्त व्याज दर देतात. उच्च रेटेड कॉर्पोरेट एफडीमध्ये व्याज आणि मुद्दलाची परतफेड करण्यात चूक होण्याची शक्यता कमी असते. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड तीन वर्षांच्या कालावधीसाठी उघडलेल्या संचयी एफडीवर वार्षिक…

एस. आय . पी. बद्दल अधिक काही —-

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये वेळेचा फार मोठा वाटा आहे. मध्यम गुंतवणूकदार त्यांची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड  निवडू शकतात. धोकादायक श्रेणी निवडू नका कारण तुम्हाला अत्यंत अस्थिरता आणि संभाव्य नुकसान हाताळणे कठीण जाईल. नेहमी लक्षात ठेवा की आपण प्रचलित बाजार परिस्थिती किंवा टॉपर्स किंवा श्रेणींवर आधारित म्युच्युअल फंड कधीही निवडू नये. तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर नेहमी भर द्या. १. गुंतवणुकीचे पहिले सूत्र म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी काही खास सूत्रे आहेत. पहिले सूत्र १५१५१५ आहे. या फॉर्म्युल्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने १५ वर्षांसाठी १५ टक्के परताव्याच्या दराने दरमहा १५…

माझी मुलगी सहा महिन्यांची आहे ! तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली ?

तुमची मुलगी काही महिन्यांचीच आहे. जर आता पासून तुम्ही तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी चांगल्या आणि योग्य आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक केली तर तुमची चिंता दूर होऊ शकेल . गुंतवणुकीचा काही हिस्सा इक्विटी म्युच्युअल फंडात आणि काही हिस्सा डेट मालमत्ता वर्गात टाका . पण या चिंता आणि तणावाच्या खाली चुकीच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करू नका . डेट मालमत्ता वर्गासाठी तुमच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेतच गुंतवणूक करा. लवकरात लवकर तिच्या साठी हे खाते उघडा . केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत हे खास गुंतवणुकीचे साधन मुलींच्या पालकांसाठी उपलब्ध करून दिले आहे . मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ…

आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार !!!

कोरोना व्हायरसच्या चिंतेमुळे जागतिक शेअर बाजारांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेले आहेत. कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीचे जागतिक अर्थकारणावर दीर्घकालीन दुष्परिणाम होईल अशी भीती ही व्यक्त होत आहे. या सर्व गोष्टींचा गुंतवणुकीदारांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. तथापि हि जागतिक मंदीची भीती कितीही खरी असली तरी ,इक्विटी गुंतवणूकदार या संकटाचा हि चांगल्या प्रकारे सामना करू शकतात आणि त्यासाठी काय आवश्यक आहे तर संयमित मनोवृत्ती आणि उज्वल भविष्य काळावरचा विश्वास... सध्याच्या जागतिक अस्थिर आर्थिक स्थितित तर अशा बातम्यांवर आधारित कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपण शेअर बाजारात दीर्घकालीन दृष्टिकोन ठेऊन डोळसपणे चांगल्या कंपन्यांमध्ये किंवा चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये नियमित…

शेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते?

डीलिस्ट हा शब्द काही दिवसांपूर्वी खूप वापरला जात असे ज्या वेळेला वेदांता कंपनी ने डिलिस्टिंग जाहीर केले व त्याची किंमत जाहीर केली परंतु त्यांचे डीलिस्टिंग पूर्णतः अपयशी ठरले व त्यांना ते मागे घ्यावे लागले. डीलिस्टिंग म्हणजे थोडक्यात शेअर बाजारातील त्याचा प्रवेश बंद करणे, त्या शेअरची खरेदी विक्री बंद करणे असे होय. थोडक्यात आयपीओ प्रोसेस च्या विरुद्ध ही प्रोसेस आहे. परंतु मग शेअर बाजारांमध्ये एकदा आयपीओ द्वारे किंवा इतर मार्गाने आलेली कंपनी ही डीलिस्टिंग हा पर्याय का निवडते:- डीलिस्टिंग मध्ये दोन प्रकार आहेत :- १. स्वेच्छेने होणारे डीलिस्टिंग. २. अनिवार्य केलेले डीलिस्टिंग. मग कंपन्या डीलिस्टिंग चा पर्याय का निवडते :- १.…

सुवर्ण रोख्यांमधून सहा वर्षांत ५७ टक्के परतावा

केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत १७ नोव्हेंबर २०१६ मध्ये गुंतविलेल्या रोख्यांचे मुदतपूर्व विमोचन (रिडम्प्शन) करायचे झाल्यास, रिझव्‍‌र्ह बँकेने ५,११५ रुपये प्रतिग्रॅम असा दर निश्चित केल्याचे रविवारी जाहीर केले. सहा वर्षांपूर्वी रोख्यांच्या खरेदी किमतीच्या तुलनेत हा दर ५७ टक्के अधिक आहे. सुवर्ण रोख्यांचा  दर हा सरलेल्या ९ मे ते १३ मे २०२२ या दिवसाअंती बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या सरासरीच्या आधारावर निश्चित केला गेला आहे. भारतीयांमधील  सोन्याचे आकर्षण पाहता त्याला पर्याय या रूपाने आणि सोन्याच्या आयातीवर खर्च होणाऱ्या विदेशी चलनात कपात केली जाऊ शकेल, या उद्देशाने १४ जानेवारी २०१६ रोजी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली गेली. १७ नोव्हेंबर २०१६ मध्ये…

मुदत ठेवी संबधी——

*Shreeram finance & Shreeram Transport Finance Company * तर्फे अनेक प्रकारच्या *Fix Deposit Schems * अर्थात मुदत ठेवी संबधी अनेक योजना उपलब्ध आहेत. सध्या बँकांच्या Fix Deposit मधील व्याजदर फारच कमी झालेले आहेत. त्यामुळे अशा चांगल्या कंपन्यांच्या योजना विचारत घेणे आवश्यक झाले आहे ! बरेचशे निवृत्तीधारक बँकेमध्ये Fix Deposit मध्ये आपली निवृत्तीपश्चात मिळालेली रक्कम ठेवून त्याच्या व्याजावर आपला उदरनिर्वाह करतात. व्याजदर कमी झाल्यामुळे हातात येणारी रक्कम सुद्धा फार कमी असते. Shreeram Finance Company तर्फे अशा व्यक्तींसाठी जास्त व्याजदर मिळणाऱ्या काही योजना सध्या उपलब्ध असून त्याच्या व्याजाचे प्रमाण सुद्धा ९.५% पर्यंत आहे. म्हणून दरमहा काही ठराविक रक्कम हाती येण्याच्या दृष्टीने Shreeram…

गुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात?

जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असते तेव्हा बहुतेक वेळा सामान्य गुंतवणूकदार काय करतात? आपल्यापैकी बरेचजण प्रसिद्ध वेबसाइटवर जातात आणि म्युच्युअल फंडाची स्टार रेटिंग पाहतात. आपल्याला एकाच वेबसाइटवर अवलंबून राहणे धोक्याचे वाटत असल्याने आपण अशा २/३ वेबसाइट्सवर जाऊन स्टार रेटिंग तपासतो आणि या सगळ्या वेबसाइटवर ज्या म्युच्युअल फंडाचे नाव असेल अशा फंडाला पसंती दर्शवतो. आपली मासिक गुंतवणूक ५/१० हजार जरी असेल तरीही आपण ४/५ स्टार फंडांची निवड करतो. १/२ हजाराची गुंतवणूक करताना ५ फंडांची निवड केल्यास आपल्याला वाटते कि आपण आपल्या जोखमीला कमी केले . परंतु असे करून आपण खरोखरच गुंतवणुकीत वैविध्य आणले की त्याच त्याच प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून…

End of content

No more pages to load