फायदा पहा !!

गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळालेल्या देशातील दोनपैकी एक रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवा  ‘सेन्ट्रल डिपॉझिटरी सव्‍‌र्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड’ अर्थात सीडीएसएलची शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजारात ६८ टक्के अधिमूल्याने नोंदणी झाली. गत आठवडय़ात कंपनीने राबविलेल्या प्रारंभिक विक्रीत, एकूण विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या समभागांपेक्षा १७०.१६ पट अधिक प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळविला. प्रारंभिक विक्रीसाठी सर्वाधिक प्रतिसाद मिळविणाऱ्या कंपन्यांच्या पंक्तीतील एक म्हणून सीडीएसएलची इतिहासात नोंद झाली आहे.

सुरवात थोडीशी त्रासदायकच !!

"एक देश, एक बाजारपेठ, एक कर' हे उद्दिष्ट ठरवून स्वातंत्र्योत्तर काळातील अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या मांडणीतील सर्वांत महत्त्वाचा बदल आजपासून होत आहे व तो निश्‍चितच स्वागतार्ह आहे. वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) सरकारच्या कर संकलनात काही हजार वा लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. या कायद्याच्या संकल्पनेनुसार सर्व कर अंतिमतः उपभोक्‍त्याला म्हणजे ग्राहकाला द्यावा लागणार असल्याने वाढलेला करभारही सामान्य ग्राहकास सहन करावा लागणार आहे व म्हणूनच एकूण महागाई काही प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. कायदा स्वागतार्ह असला, तरी सामान्य माणसास तो अल्पकाळ तरी बोचणारा असेल... उत्पादन किंवा व्यापार क्षेत्रांपेक्षा सेवा क्षेत्रांच्या वस्तू व सेवा प्रणालीचा मोठा प्रभाव असेल, अशी अपेक्षा आहे. या कायद्याअंतर्गत…

रविन्द्ररावांचा प्रश्न

सध्या तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या वाटतात. अर्थसाक्षरतादेखील वाढते आहे. गुंतवणूक सल्लागाराला योग्य प्रश्न विचारून स्वत:च्या शंकांचे निरसन करून घेऊन मगच गुंतवणूक करावी. सुज्ञतेचा हाच मार्ग आहे. अनेक गुंतवणूकदाराप्रमाणे रवींद्ररावाना पडलेला प्रश्न अगदी वास्तविक होता. त्यांनी  विचारले की, एकरकमी गुंतवणूक करणे योग्य असते की थोडीथोडकी पण नियमित गुंतवणूक करणे चांगले? कोणता पर्याय योग्य? खरे तर, या प्रश्नांचे उत्तर अनेक घटकांवर अवलंबून आहे. जसे गुंतवणुकीचे उद्दिष्ट, कालावधी, जोखीम घेण्याची क्षमता, जबाबदाऱ्या, वय इ. एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर ती रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवावी. मात्र अशा गुंतवणुकीत जोखीम जास्त.पण  थांबण्याची तयारीअसल्यास फायदा हमखास !! परंतु नियमित गुंतवणूक करणे हे सर्वसामान्यपणे प्रत्येक…

का घ्यावा प्रवास विमा ?

परदेशी प्रवासात तुम्ही जिथे जाणार आहात त्या देशात प्रवास विमा सक्तीचा नसला तरी प्रवास विमा खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या योग्य ठरते. तुम्हाला सिंगल ट्रिप कव्हर किंवा मल्टि-ट्रिप प्लान यांतून निवड करता येते. तुम्ही अनेकदा परदेशी जात असाल तर तुम्ही मल्टि-ट्रिप प्लान घ्यावा. यामुळे एका वर्षात तुम्ही करणार असलेले सर्व परदेश प्रवास विम्यामध्ये समाविष्ट केले जातील. मात्र, ट्रिपचा जास्तीत जास्त कालावधी योजनेतील पर्यायानुसार ३० दिवसांपर्यंत, 45 दिवसांपर्यंत किंवा 60 दिवसांपर्यंत असतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, विविध कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या विमाकवचाची आणि लागू होण्याच्या प्रीमिअमची तुलना करून बघणे महत्त्वाचे आहे. कुटुंबासहित प्रवास करणार असाल तर कौटुंबीक प्रवास विमा फायदेशीर ठरतो. तुम्ही घेत असलेल्या विमा…

सुखद पर्याय

रिलायन्स जिओने 4जी क्षेत्रात केलेल्या दमदार प्रवेशानंतर आता लवकरच डीटीएच क्षेत्रात प्रवेशाची सुरूवात केली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आता रिलायन्स लवकरच डीटीएच सेवेचा शुभारंभ करणार आहे. ‘जनसत्ता डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स जिओच्या डीटीएच सेवेसाठी नोंदणी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. रिलायन्स जिओने ज्याप्रमाणे सुरुवातीचे काही महिने मोफत 4जी आणि मोफत कॉल्स करण्याची ऑफर देऊ केली होती त्याचप्रमाणे आता ग्राहकांना सुरुवातीचे काही महिने मोफत डीटीएच सेवा पुरवणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना 50 एचडी चॅनेल बघता येणार आहे. तर एकूण 432 चॅनेल पाहता येणार आहे. रिलायन्स जिओच्या ब्रॉडबँड आणि डीटीएचच्या बाजारातील प्रवेशामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना म्हणजेच टाटा स्काय, व्हिडिओकॉन आणि एअरटेलला मोठा…

कोणता फंड घ्यावा?

शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहेत. बाजारातील अश्या अस्थिरतेमुळे म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात अनेक नवीन फंड उपलब्ध आहेत. आनंद राठी प्रायव्हेट वेल्थचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज यांनी त्यातील काही फंड गुंतवणूकदारांसाठी सुचवले आहेत. आनंद राठी प्रायव्हेट वेल्थचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज यांच्यामते; अॅक्सिस म्युच्युअल फंडचा ''चिल्ड्रन'स गिफ्ट फंड'' अॅक्सिस म्युच्युअल फंडने लहान मुलांसाठी ''चिल्ड्रन'स गिफ्ट फंड'' नावाने नवीन फंड सादर केला आहे. ''चिल्ड्रन'स गिफ्ट फंड'' मध्ये फक्त अल्पवयीन मुला-मुलींना गुंतवणूक करता येणार आहे. मुला-मुलींच्या वतीने त्यांच्या पालकांना गुंतवणूक करता येणार आहे. भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्यापेक्षा ''चिल्ड्रन'स गिफ्ट…

तपासा – आपली पात्रता

केंद्र सरकारकडून "सर्वांसाठी घर' योजना राबवली जात आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी एचडीएफसी लिमिटेडची उपकंपनी 'एचडीएफसी रेड' या कंपनीने सीएलएसएस कॅलक्‍युलेटरची निर्मिती केली आहे. यातून ग्राहकांना गृहकर्जाची पात्रता पडताळता येणार आहे. अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा या योजनेत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटालाही प्रधानमंत्री योजनेत घेण्यात आले आहे. ग्राहकांना गृहकर्जासंबंधीची आपली पात्रता www.hdfcred.com/clss या लिंकवर जाऊन एका क्‍लिकवर पडताळता येईल. या लिंकवर जाऊन स्वतःचे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नोंदविले की पात्र असलेल्या सवलती आणि त्यातून अनुदान याची माहिती मिळेल. या साधनामुळे पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना गृहकर्जावर ६.५ टक्‍क्‍यांपर्यंत व्याजात सूट मिळणार आहे. या योजनेतील नियम आणि गुंतागुंत सामान्य माणसाला…

“बाहुबली “

NSE चा आय. पी. ओ. म्हणजेच शेअर मार्केट मधील  एक " बाहुबली " एकीकडे 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले?' या चर्चेला ऊत आलेला असताना, शेअर बाजारातील गुंतवणूकादारांना मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराच्या(एनएसई) दहा हजार कोटी रुपयांच्या प्राथमिक समभाग विक्रीची(आयपीओ) प्रतीक्षा आहे. “आयपीओचे लॉन्च आणि बाहुबली सिनेमात बऱ्यापैकी साम्य दिसून येते. भांडवली बाजारातदेखील सिनेमांप्रमाणे कथा, संहिता, नाट्य, वितरण आणि प्री-लॉन्च बिल्ट-अप समाविष्ट असते,” असे गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था,चे संस्थापक श्री. अरुण केजरीवाल यांनी सांगितले.आयपीओमध्ये देखील लाईट-कॅमेरा-अॅक्शन सारखी स्थिती असते. जेव्हा सेबीकडून संमती मिळते, तेव्हा आमच्यासाठी दिवे म्हणजे लाईट पेटतात. जेव्हा रोड-शोला सुरुवात होते तेव्हा कॅमेरा आणि अॅक्शनचा आरंभ होतो, ज्याप्रमाणे एखादा  सिनेमा…

मंदी व संधी

मी नुकतीच एक चांगली तुलना केली आहे, जी शिशू आणि बाजारातील शेअरचे मूल्य आणि म्युच्युअल फंडाचे युनिट यांच्यात तुलना करते, कसे ते समजून घेऊया : प्रश्‍न 1) जन्मल्याजन्मल्या बाळाने रांगले पाहिजे अशी अपेक्षा आपण करतो का? - याचे उत्तर "नाही' असे आहे, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे आपण नव्यानेच सुरू केलेल्या शेअरखरेदी किंवा म्युच्युअल फंडाच्या "एसआयपी' गुंतवणुकीतून पहिल्या दिवसापासूनच मोठ्या परताव्याची अपेक्षा करू नये. 2) जेव्हा लहान मूल रडते, तेव्हा तुम्ही काय करता? - जेव्हा मूल रडते, तेव्हा आई त्याला भरवते आणि शांत करते. याचप्रमाणे जेव्हा "सेन्सेक्‍स' आणि "निफ्टी' पडतात (रडतात), शेअरचे भाव गडगडतात; तेव्हा आपण त्यांना संयमाने आणखी पैसे दिले…

मर्यादा

सिक्युरीटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, अर्थात, 'सेबी' ने म्युच्युअल फंड उद्योग आणि गुंतवणूकदारांच्या हिताच्या दृष्टीने नुकतेच काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. म्युच्युअल फंडांना एका कंपनीच्या रोख्यांमध्ये योजनेच्या निव्वळ मालमत्ता मूल्याच्या 10 टक्क्यांपर्यंतच गुंतवणूक करता येईल. पूर्वी ही परवानगी 15 टक्क्यापर्यंत होती. सर्व ग्रुप कंपन्या मिळून हे बंधन 20 टक्के इतके राहील. त्याचप्रमाणे एका विशिष्ट क्षेत्रातील गुंतवणूकीची परवानगी निव्वळ मालमत्ता मूल्याच्या 30 टक्के होती, ती आता 25 टक्के इतकी कमी करण्यात आली आहे. या नियमांमुळे एखाद्या कंपनीचे मूल्यांकन जरी अचानक कमी झाले तरी गुंतवणूकदारांचे नुकसान मर्यादित राहील. म्युच्युअल फंड कंपन्या अशी अचानक उद्भवणारी परिस्थिती नीट हाताळू शकतील. त्याचप्रमाणे, गुंतवणूकदारांचे पैसे विभिन्न…

End of content

No more pages to load