विस्तारित “मुद्रा” योजना !!

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजनेला आता खासगी कंपन्यांचे बळ मिळणार आहे. या योजनेचा अधिकाधिक विस्तार व्हावा व सर्वसामान्य व्यावसायिकांपर्यंत ती सहज पोहोचावी या हेतूने ४० खासगी कंपन्या वा आर्थिक संस्थांशी केंद्र सरकार हातमिळवणी करणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. केंद्र सरकारने आठ एप्रिल २०१५पासून मुद्रा योजना सुरू केली असून त्या अंतर्गत बिगर कृषी, बिगर व्यावसायिक गटातील लघू उद्योजकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकांच्या माध्यमातून मिळते. मात्र चांगला व्यवसाय करणाऱ्या व रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ४० खासगी कंपन्या व आर्थिक संस्थांची सरकारने निवड केली असून त्यांच्या माध्यमातूनही हे कर्ज मिळू शकेल. हे कर्ज सरकारच देणार असून या कंपन्या…

फ्लिपकार्टचा ‘आयपीओ’ चार वर्षांत येणार

प्लिपकार्ट कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) चार वर्षांत केली जाईल, अशी माहिती वॉलमार्टने अमेरिकेतील भांडवली बाजार नियामकांसमोर दिली आहे. वॉलमार्टने १६ अब्ज डॉलरला फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. फ्लिपकार्ट कंपनी पुढील चार वर्षांत शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात येईल, अशी माहिती वॉलमार्टने अमेरिकेतील भांडवली बाजार नियंत्रक संस्थेला दिली आहे.

पाचवर्षात १० हजाराचे झाले दोन लाख

पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक घोटाळा, अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध, शेअर्सवर आकारण्यात येणाऱ्या LTCG टॅक्सवरुन असलेली अस्वस्थतता या सर्व प्रतिकुल परिस्थितीतून भारतीय शेअर बाजार आता बऱ्यापैकी सावरला आहे. मागच्या महिन्याभरापासून भारतीय शेअर्सच्या मुल्यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. पाचवर्षांचा विचार करता चीन आणि जपानच्या तुलनेत देशातंर्गत शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या मुल्यामध्ये घसघशीत वाढ झाली आहे. रिको ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड या वाहन क्षेत्रातील कंपनीच्या प्रगतीपुस्तकावर नजर टाकली तर लक्षात येईल कि, पाचवर्षांच्या आत या कंपनीने गुंतवणूकदारांना दामदुप्पट फायदा मिळवून दिला आहे. रिको ऑटो इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १८०० टक्के वाढ झाली आहे. पाचवर्षांपूर्वी ४.३ रुपये मुल्य असलेल्या एका शेअरची किंमत…

वयवंदना योजनेचा विस्तार

पंतप्रधान वयवंदना योजनेच्या विस्तार झाला आहे . आतापर्यंत या योजनेची कमाल मर्यादा साडेसात लाख रुपये होती. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतविता येतील व त्यांना जास्तीत जास्त १० हजार रुपये मासिक पेन्शन (व्याज) मिळेल. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) माध्यमातून कार्यान्वित आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना या विस्ताराबाबत सुतोवाच केले होते. मुदत ठेवींचे दर सतत घटते असल्याने आठ टक्क्यांचा निश्चित परतावा देणारी ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित व फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. वयाची अट या योजनेत ६० व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ…

NPS योजनेतून रक्कम काढणे शक्य

राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (एनपीएस) सदस्यांना आपल्या खात्यातील जमा रकमेपैकी काही रक्कम ठरावीक कारणांसाठी काढता येणार आहे. उच्चशिक्षण तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी ही रक्कम काढता येईल. या योजनेचे नियमन करणाऱ्या पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (पीएफआरडीए)ही माहिती दिली आहे. पीएफआरडीएच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उच्चशिक्षण घेऊ इच्छिणारे तसेच नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करणाऱ्या पेन्शन योजनेतील सदस्यांना यापुढे जमा रकमेचा विशिष्ट हिस्सा काढता येईल, असे पीएफआरडीएने सांगितले. या योजनेतील सदस्य आपली रक्कम इक्विटीमध्ये गुंतविण्याचा अधिकार एनपीएसला देऊ शकतात. एनपीएसच्या निर्णयानुसार इक्विटीमधील ही गुंतवणूक मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचे सध्या दोन कोटी १३ लाख…

धनादेशावर आधार नंबर ??

आता सरकार धनादेशावरही आधार नंबर लिहिणे सक्तीचे करणार आहे का? हा प्रश्न विचारण्यामागचे कारण म्हणजे चालू खात्याच्या धनादेशावर आधार नंबर लिहिण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या नव्या पर्यायामुळे व्यापारी वर्गांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सहारा म्युच्युअल फंड : सर्व स्किम्स बंद होणार !!

सहाराकडून चालवल्या जात असणाऱ्या सर्व म्युच्य़ुअल योजना 21 एप्रिल 2018 पर्यंत बंद करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. यात फक्त "सहारा टॅक्स गेन फंड" या योजनेचा अपवाद करण्यात आला आहे.  टॅक्स गेन फंड असल्यामुळे या योजनेला 27 ऑगस्ट 2018 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु या योजनेत नवीन गुंतवणूक स्वीकारण्यास मात्र मनाई करण्यात आली आहे. सहारा समूहाची सेबीबरोबर दिर्घकाळापासून कायदेशीर आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे. सहारा समूहातील दोन कंपन्यांनी सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच त्यांच्या कारभारात अनियमियता आढळून आल्यामुळे सेबीने त्यांना 24,000 कोटी रुपयांची  परतफेड करण्याचा आदेश दिला आहे. जुलै 2015 मध्ये सेबीने सहारा म्युच्युअल फंड कंपनीची नोंदणी रद्द केली होती.…

एचडीएफसीकडून मुदत ठेवींवर जादा व्याज

खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरांत वाढ केली आहे. या बँकेने एक कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर .०१ ते एक टक्क्यापर्यंत वाढ देऊ केली आहे. यामुळे एचडीएफसीच्या मुदत ठेवींवरील व्याजदराने स्टेट बँक तसेच अन्य अनेक बँकांच्या व्याजदरांना मागे टाकले आहे. सुधारित व्याजदरानुसार एचडीएफसी बँकेत एक वर्षांच्या मुदत ठेवीवर ६.८५ तर एक वर्ष व १७ दिवस ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी सात टक्के व्याज मिळेल. त्यापुढे पाच वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठीही सात टक्के व्याज मिळेल. यापूर्वी या ठेवींवर सहा ते सव्वासहा टक्के व्याज मिळत होते.

पीएफ आता सुरक्षित

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एखादी कंपनी वेतनातून भविष्यनिर्वाह निधी कपात करूनही तो वेळेत जमा करीत नसेल तर, त्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना समजू शकणार आहे. निधी भरण्यात अनियमितता झाल्यास ही माहिती आता दस्तुरखुद्द सरकारकडूनच ई-मेल किंवा एसएमएसद्वारे समजणार आहे. या माध्यमातून आधीच्या महिन्यात जमा न झालेल्या निधीची माहिती प्राप्त होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून घेतलेली रक्कम परस्पर हडप करणाऱ्या कंपन्यांवर अंकुश लागणार आहे.

डायरेक्ट म्युच्युअल फंडामध्ये मोफत गुंतवणूक

भारताच्या पसंतीचा स्वतंत्र डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म असणाऱ्या क्लियरफंड्सने आज डायरेक्ट प्रिमियम स्मार्ट पोर्टफोलिओ सेवा सुरू करताना जाहीर केले की,सर्व गुंतवणूकदारांना डायरेक्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक अगदी मोफत करता येईल. Clearfunds.comचे संस्थापक आणि सीईओ कुणाल बजाज यांनी याबाबत  सांगितले की, "आम्ही आमची कार्यप्रणाली स्वयंचलित बनवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डायरेक्ट म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांसाठी मोफत सेवा देऊ शकणार आहोत. आम्ही आता काही काळासाठी हे लक्ष्य निर्धारीत करत आहोत, कारण आमचा विश्वास आहे की गुंतवणुकीची संधी ही प्रत्येकासाठी संपत्ती किंवा उत्पन्नाचा विचार न करता सुलभ प्रकारे उपलब्ध असावी. आमचे अत्याधुनिक आणि सर्व कसोटीना पात्र अल्गोरिदम, सर्व गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. लाखो डेटा पॉईंट्सच्या माध्यमातून आपल्या विशिष्ट लक्ष्यांसाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंडाची शिफारस करण्यात येईल. तुमच्या ठिकाणावरून गुंतवणुकीची प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी आम्ही आमची कार्यप्रणालीही…

End of content

No more pages to load