एसआयपी’ सही है!

देशातील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या "एसआयपी' खात्यांची संख्या 2.29 कोटींवर पोचली आहे. छोट्या रकमेद्वारे गुंतवणूक करता येत असल्यामुळे "एसआयपी' हा प्रकार सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस "एसआयपी' खातेधारकांची संख्या वाढत चालली आहे. "ऍम्फी'च्या आकडेवारीनुसार दर महिन्याला सरासरी 9.83 लाख एसआयपी खात्यांची वाढ होत आहे.

म्युच्युअल फंड व्यवसायात दोन नवीन ‘एन्ट्री’

म्युच्युअल फंड क्षेत्रात आता सॅमको सिक्युरिटीज आणि इक्विटी इंटेलिजन्स इंडिया या दोन नवीन म्युच्युअल फंड कंपन्यांची भर पडली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने दोन्ही कंपन्यांना म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.   सॅमको सिक्युरिटीज एक ऑनलाइन डिस्काउंट ब्रोकरेज फर्म आहे  तर इक्विटी इंटेलिजन्स इंडिया ही कंपनी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) चालविते. मुंबई येथे मुख्यालय असलेल्या सॅमको सिक्युरिटीजचे जेमीत मोदी यांनी याच वर्षी जूनमध्ये सेबीकडे अर्ज केला होता. तर कोची येथे मुख्यालय असलेल्या इक्विटी इंटेलिजन्स इंडियाने जानेवारीमध्ये म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्यासंबंधी अर्ज केला होता.    सेबीकडे मुथुट फायनान्स, फ्रंटलाइन…

‘सुकन्या समृद्धी योजने’त केंद्राने केले महत्त्वाचे बदल

केंद्र सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत काही बदल केले आहेत. आता सुकन्या समृद्धी योजनेतील  किमान जमा रकमेची मर्यादा कमी करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत योजना सुरु ठेवण्यासाठी वर्षभरात किमान एक हजार रुपये भरणे गरजेचे होते. आता वर्षभरात अडीचशे रुपये भरूनही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.   सुकन्या समृद्धी योजनेत अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे यासाठी किमान रकमेची मर्यादा कमी केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आता वर्षभरात भरावयाची रक्कम एक हजारवरून कमी करून अडीचशे रुपये केल्याने  योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढेल .   केंद्र सरकारच्या आकडेवारी नुसार, या योजनेत आतापर्यंत १९ हजार १८३ कोटी रुपये जमा…

हीच योग्य वेळ

भारतातील युवावर्ग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांची खर्च करण्याची क्षमता वेगाने वाढत असल्याने ग्राहककेंद्री भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी येत्या काळात झपाट्याने सुधारणार असून, या बदलाचे आणि विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेचे लाभ मिळविण्यासाठी म्युच्युअल फंडासारख्या आधुनिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत भांडवली बाजार विश्‍लेषक आणि म्युच्युअल फंड क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ हितेश माळी यांनी पुण्यात नुकतेच व्यक्त केले.

“या” शेअरमधून बाहेर…

आयपीओतील तीन महिन्यातील घसरणीमुळे आयसीआयसीआय सिक्युरिटिजच्या शेअरकडे म्युच्युअल फंड पाठ फिरवत आहेत. मार्च महिन्यात आयसीआयसीआय सिक्युरिटिजचा आयपीओ बाजारात आला होता. त्यानंतर म्युच्युअल फंड कंपन्यांनी 352 रु. आणि 421 रु. या किंमतींवर या आयपीओत गुंतवणूक केली होती. मात्र आयसीआयसीआय सिक्युरिटिजच्या शेअरमध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे आता म्युच्युअल फंड कंपन्या यातून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंड, अॅक्सिस म्युच्युअल फंड, रिलायन्स म्युच्युअल फंड, एडेलवाईस म्युच्युअल फंड आपल्या काही योजनांमधून आयसीआयसीआय सिक्युरिटिजच्या शेअरची गुंतवणूक कमी करत आहेत.

मोठ्या गुंतवणूकदारांना संधी

संपत्ती व्यवस्थापन आणि वित्तीय सेवांचे व्यवस्थापन करणाऱ्या एडलवाइज ग्रुपने मोठ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठीची नवीन योजना जाहीर केली आहे. 'एडलवाइज क्रॉसओव्हर ऑपॉर्च्युनिटीज फंड - सिरीज 2' या योजनेमध्ये मोठ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी पारंपरिक पर्यायांऐवजी अधिक परतावा देणाऱ्या पर्यायाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ज्या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाले नाहीत. मात्र अशा कंपन्यांची कामगिरी दमदार राहिली आहे आणि लवकरच त्यांचे आयपीओ बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मोठ्या गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.   याविषयीसंबंधांची माहिती देताना एडलवाइज पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सीमांत शुक्ला म्हणाले, "विविध क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या आणि शेअर बाजारामध्ये आयपीओ दाखल…

प्रभुदास लिलाधरतर्फे ग्राहकांसाठी शेअर ट्रेडींगसाठी पीएल मोबाईल अॅप

भारतातील आघाडीची शेअर ब्रोकींग फर्म असलेल्या प्रभुदास लिलाधरने (पीएल) आपल्या ग्राहकांसाठी मोबाईलआधारे शेअर आणि करन्सी ट्रेडिंगसाठी पीएल मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध केली आहे. पीएलच्या या अत्याधुनिक अॅपमध्ये शेअर्ससंबंधी इत्यंभुत माहिती, सखोल निरीक्षणयादी याचबरोबर शेअर, डेरिव्हेटीव्हज, कमोडीटी आणि चलन (करन्सी) आदी अन्य प्रकारच्या व्यवहारांबाबतही क्षणाक्षणाला माहिती मिळणार आहे. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांच्यासाठी अॅपमध्ये अनेक पुरक टुल्स आहेत. ही टूल्स विशिष्ट सॉफ्टवेअरवर आधारीत इंजिन असून योग्य वेळेस गुंतवणूक आणि व्यवहारांची संधी लक्षात आणून देते. या अॅपच्या अन्य वैशिष्टांमध्ये शेअरबाजारातील व्यवहारांचे चार्टही मिळतात. शेअर ट्रेडींगशी संबंधित सुविधा या पीएलच्या ग्राहकांनाच उपलब्ध असुन ग्राहक नसलेल्यांना गेस्ट लॉगिन वापरुन सर्व सुविधा उपलब्ध होतील परंतु शेअर्सचे…

‘एसआयपी’साठी रोखेसंलग्न फंडांना वाढती पसंती – महिंद्र एमएफ

 सर्वागाने सुरक्षितता हव्या असलेल्या गुंतवणूकदारांसाठी रोखेसंलग्न अर्थात डेट योजना सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत आहे. सध्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये नियोजनबद्ध गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम ठरलेल्या ‘एसआयपी’ पद्धतीनेही डेट फंडातही मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक ओघ सुरू आहे, रोखेसंलग्न फंडांनी दिलेल्या जोखीमसंतुलित परताव्याची ऐतिहासिक कामगिरी पाहता, तो गुंतवणूकदारांसाठी आकर्षक राहिला आहे. मुख्यत: बँकांमधील मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, पोस्टाच्या अथवा तत्सम अल्पबचत योजनांसारख्या पारंपरिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना, तितकीच सुरक्षितता परंतु तुलनेने अधिक लाभ या पर्यायाने दिला असल्याचे आता सामान्य गुंतवणूकदारांच्याही लक्षात येत असल्याचे बिश्नोई यांनी सांगितले. आजवर स्थिर उत्पन्न पर्यायातील लिक्विड तसेच लो डय़ुरेशन फंडांचा वापर हा बहुतांश बडे उद्योग, संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच उच्च संपदा असणारे…

म्युच्युअल फंडांतील जनजागृतीसाठी ‘जन निवेश’ मोहीम

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया (ऍम्फी) 'जन निवेश' या राष्ट्रव्यापी गुंतवणूकदार जागरूकता मोहिमेची मुंबईत आज सुरुवात केली. या मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई, बडोदा आणि नोएडा येथे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची शपथ घेतली. या प्रसंगी नागरी उड्डान राज्यमंत्री जयंत सिन्हा, सेबीचे पूर्णवेळ सदस्य जी. महालिंगम, ऍम्फीचे अध्यक्ष ए. बालासुब्रह्मण्यन आदी उपस्थित होते. नागरिकांना बचतीच्या सवयीचा फेरआढावा घ्यावा आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला विचारात घ्यावे या उद्देशाने जन निवेश मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. लोकांना 18008333666 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन अथवा www.jannivesh.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून दरमहा आपल्या एका दिवसाची मिळकत म्युच्युअल फंडात गुंतविण्यासंबंधी शपथ घेऊन या मोहिमेत सामिल होता येईल, असे ऍम्फीने…

‘रिच डॅड, पुअर डॅड’

‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे एक वाक्य आहे – ‘तुम्ही किती पैसा कमावता हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही किती पैसा राखता, तो तुम्हाला किती मिळवून देतो आणि किती पिढय़ा तो राखला जातो हे महत्त्वाचे आहे.’ तेव्हा केवळ पैसा कमावण्यावर लक्ष केंद्रित करू नका, तर शहाणपणाने गुंतवणूक सुरू करा आणि चांगली संपत्ती निर्माण करा हा मिलेनिअल्ससाठी मंत्र असला पाहिजे.

End of content

No more pages to load