राकेश झुनझुनवाला म्हणतात—

‘आगामी निवडणुकीतही देशात पुन्हा नरेंद्र मोदीच सत्तेवर येतील आणि यंदाच्या निवडणुकीत भाजपाला मिळणाऱ्या जागांचा आकडा हा सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरेल’, असे राकेश झुनझुनवाला यांनी म्हटले आहे. गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला हे बुधवारी टायकॉन परिषदेत सहभागी झाले होते. दलाल स्ट्रीटवरचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून त्यांना ओळखले जाते. झुनझुनवाला म्हणाले, भाजपा आगामी निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देईल. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदीच विजयी होतील, असे त्यांनी सांगितले.

सरकारी अधिकाऱ्यांसाठी शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी मोदी सरकारने केला बदल

27 वर्षे जुन्या कायद्यात बदल करून केंद्राने सरकारी अधिकाऱ्यांना शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स सारख्या गुंतवणूक प्रकारांमध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा वाढविली आहे. या अगोदर वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांना वरील प्रकारात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करताना वेगळा फॉर्म भरून सरकारला त्यासंदर्भातील माहिती द्यावी लागत असे. यापुढे ही मर्यादा 6 पटींनी वाढविली आहे. 1992 च्या कायद्यानुसार शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स मध्ये गुंतवणूक वर्ग 1 आणि 2 च्या अधिकाऱ्यांना 50 हजार तर, वर्ग 3 आणि 4 च्या अधिकाऱ्यांना 25 हजार रुपयांची मर्यादा होती. मात्र 27 वर्षांच्या काळात सरकारी अधिकाऱ्यांच्या वेतनात वाढ होऊनदेखील या मर्यादेत वाढ करण्यात आली नव्हती. या बाबींचा…

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा रिटायरमेंट फंड लॉंच

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रिटायरमेंट फंड' बाजारात आणला आहे. ही एक ओपन एंडेड योजना आहे. यात पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी किंवा निवृत्तीपर्यतचे वय (यातील जे आधी येईल ते) अशी अट आहे. हा एनएफओ 7 फेब्रुवारीला खुला होत असून 21 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत आहे.   'तुम्ही तरुण असता त्याचवेळेस तुमचे निवृत्तीनंतरचे नियोजन करणे जास्त योग्य असते. म्युच्युअल फंडात दिर्घकाळासाठी गुंतवणूक करून निवृत्तीपर्यत चांगला निधी उभा करता येतो. त्याचबरोबर तुम्हाला एसडब्ल्यूपीसारखा पर्यायसुद्धा वापरता येतो.   'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रिटायरमेंट फंडात चार पर्याय देण्यात आले आहेत.   a)प्युअर इक्विटी प्लॅन - 25 ते 45 वयोगटातील गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय सुचवला…

डीएसपी म्युच्युअल फंडाचा नवा डीएसपी निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड

डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे डीएसपी निफ्टी  50 इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड हे नवीन ओपन एण्डेड इंडेक्स फंड सादर करण्यात आले आहेत. याद्वारे, अनुक्रमे निफ्टी  50 इंडेक्स व निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स या फंडांची प्रतिकृती उपलब्ध होत आहे. या फंडासाठीचा एनएफओ कालावधी 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2019 असा ठरवण्यात आला आहे.   निफ्टी 50 इंडेक्स या फंडातर्फे भारतीय बाजारपेठेतल्या कॅपनुसार 50 अग्रणी कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेतला जातो. हा निर्देशांक विविध क्षेत्रातील बाजारपेठांमधल्या बड्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि योग्य वेळेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतो. निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स बाजारपेठेतील कॅपने मूल्यांकित केलेल्या 51 ते…

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडने लाँच केला स्मॉल कॅप फंड

कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने  कॅनरा रोबेको स्मॉक कॅप फंड या खुल्या योजनेसाठी नवीन फंड प्रस्तावाची (एनएफओ) घोषणा केली. अन्य इक्विटी वर्गांच्या तुलनेत दीर्घकाळामध्ये अधिक मोबदला मिळवून देण्याची क्षमता असलेल्या स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इक्विटींमध्ये स्मॉल कॅप कंपन्या या भविष्यकाळातील संभाव्य मिड / लार्ज कंपन्या समजल्या जातात.   हा एनएफओ २५ जानेवारी रोजी खुला झाला असून, ८ फेब्रुवारी रोजी बंद होणार आहे. एकूण निधीचा (कॉर्पस) किमान ६५ टक्के भाग स्मॉल कॅप कंपन्यांच्या इक्विटी व इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवण्याचा या योजनेचा प्रस्ताव आहे. पोर्टफोलिओच्या दुसऱ्या भागाच्या (बिटा) व्यवस्थापनासाठी ३५ टक्क्यांपर्यंत भाग विभाजित करून मोठ्या,…

आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाद्वारे ‘बाल भविष्य योजना’ लॉंच

आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाने 'बाल भविष्य योजना' हा एक नवा चिल्ड्रन्स फंड बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड फंड आहे. या फंडासाठी लॉक-इन कालावधी किमान पाच वर्षांचा किंवा अपत्याचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यतचा असणार आहे. यातील जी अट आधी पूर्ण होईल ती स्वीकारली जाणार आहे. हा एनएफओ 22 जानेवारी 2019 ला खुला होणार असून 5 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत आहे. या फंडाचे व्यवस्थापन अजय गर्ग आणि प्रणय सिन्हा करणार आहेत. या फंडातील गुंतवणूक, गुंतवणूकीच्या वेळेस 18 वर्षांपेक्षा वयाने कमी असणाऱ्या अपत्याच्याच नावे करता येता आहे. ज्याचे नावे गुंतवणूक केली जाणार आहे त्या अपत्याचे प्रतिनिधित्व त्याचे पालक करणार आहेत.…

रिलायन्स इंडस्ट्रीजने एक नवा विक्रम केला

मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने एक नवा विक्रम केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 10,251 कोटी रुपयांचा दणदणीत नफा मिळवला आहे. 10,000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा एकाच तिमाहीत मिळवणारी रिलायन्स ही देशाच्या खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे. रिलायन्सच्या नफ्यात 8.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधीच्या सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने 9,516 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त नफा रिलायन्सने कमावला आहे.

तज्ञ म्हणतात —

 डिसेंबर 2018 अखेर इएलएसएस प्रकारातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत 27 टक्क्यांची घसरण झाली आहे. डिसेंबर अखेर इएलएसएसमध्ये 841 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली होती. तर डिसेंबर 2017 अखेर इएलएसएसमधील गुंतवणूक 1,166 कोटी रुपयांवर होती. अॅम्फीने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. मागील वर्षभरात शेअर बाजारात सुरू असलेले चढउतार, अस्थिरतेचे वातावरण यामुळे इक्विटी प्रकारात चांगला परतावा मिळालेला नाही. याचा परिणाम इएलएसएसमधील गुंतवणूकीवरही झाला आहे. इएलएसएस प्रकारातील गुंतवणूक मुख्यत: करबचतीच्या उद्देशाने केली जाते. 'इक्विटीचा परतावाच नकारात्मक असल्यामुळे मागील वर्षभरात या प्रकारातून गुंतवणूकरदारांना अपेक्षित असलेला परतावा मिळू शकलेला नाही. त्याचबरोबर मागील वर्षभरात मुदतठेवींच्या व्याजदरांमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या प्रकारातील गुंतवणूक कमी केलेली…

‘एलआयसी शॉर्ट टर्म डेट फंड

एलआयसी म्युच्युअल फंडाने नवा 'एलआयसी शॉर्ट टर्म डेट फंड' बाजारात आणला आहे. हा फंड ओपन एंडेड शॉर्ट टर्म फंड आहे. 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना डोळ्यासमोर ठेऊन हा फंड बाजारात आणण्यात आला आहे. या एनएफओची ऑफर अंतिम मुदत 25 जानेवारी आहे. या फंडाचे व्यवस्थापन मर्झबान इराणी करणार आहेत. गुंतवणूकीच्या जोखमीच्या तुलनेत परतावा मिळवून देण्याचे या फंडाचे उद्दीष्ट आहे.    फंड मॅनेजर क्रेडीट रेटींग एजन्सीने दिलेल्या मानांकनाच्या आधारात डेट प्रकारात गुंतवणूक करणार आहे. व्याजदर, व्याजदराची रचना, रोकडेची उपलब्धता, रिझर्व्ह बॅंकेचे धोरण, वाढत्या अपेक्षा, वित्तीय तूट, जागतिक व्याजदर, चलनवाढ या सारखे मुद्दे लक्षात घेऊन फंड मॅनेजर या फंडाद्वारे…

इन्फोसिस पुन्हा ‘शेअर बायबॅक’ करण्याची शक्यता

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली ‘इन्फोसिस’ पुन्हा एकदा ‘शेअर बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या 11 जानेवारीला होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअरच्या ‘बायबॅक’ प्रस्तावावर विचार केला जाणार असल्याचे समजते. कंपनीकडून 1.6 अब्ज डॉलर मूल्यही शेअर पुन्हा विकत घेतले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे भारतीय रुपयात सुमारे 11 हजार 264 कोटी रुपयांचे शेअर विकत घेतले जाणार आहे. शिवाय गुंतवणूकदारांसाठी स्पेशल डिव्हिडंटची देखील घोषणा केली जाणार आहे.   कंपनी येत्या 11 जानेवारीला तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. गेल्यावर्षी कंपनीने 13 हजार कोटी रुपयांचे ‘शेअर बायबॅक’ केले होते. इन्फोसिसच्या जवळपास 36 वर्षांत पहिल्यांदाच कंपनीने शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय एप्रिल महिन्यात…

End of content

No more pages to load