आता एटीएममधून हेल्थ इन्शुरन्स देखील मिळणार

ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम) म्हणजेच सर्वसामान्यांसाठीची 'ऐनी टाईम मनी' मशीन आता 'ऐनी टाईम हेल्थ' (एटीएच) झाली आहे. या एटीएच मधून तुम्हाला अवघ्या तीन मिनिटांमधे आरोग्य विमा / हेल्थ इन्शुरन्स घेता येणार आहे. मॅक्स बुपा लाईफ इन्शुरन्स या कंपनीने ही (एटीएच) दाखल केली आहेत. यासाठी त्यांनी एचडीएफसी बँकेबरोबर करार केला असून देशभरातील एचडीएफसी बँकेच्या शाखांमध्ये ही एटीएच मशीन उपलब्ध असणार आहे.   मॅक्स बुपा लाईफ इन्शुरन्सने या प्रकारच्या मशिन्स 2017 मध्येच सादर केल्या होत्या मात्र आता अधिक आक्रमकपणे बाजारात उतरण्यासाठी त्यांनी एचडीएफसी बँके बरोबर करार केला आहे.    या मशीनचा वापर करून आरोग्य विमा घेणे सहज शक्य होणार आहे. या मशीनमध्ये…

एसबीआयचे बँकिंग आता घरबसल्या

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरु केली आहे. डोअर स्टेप बँकिंग असे या नवीन सेवेचे नाव आहे. 70 वर्षांवरील  ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ग्राहक यांच्यासाठी ही सुविधा असून कॅश पिकअप आणि डिलिव्हरीसहित अनेक सेवा यात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आदेशांनुसार डोअर स्टेप सेवा सुरू झाली आहे.   या योजनेअंतर्गत, कॅश पिकअप आणि डिलिव्हरी, चेक पिकअप, चेकबुकच्या मागणीसाठी भरलेल्या रिसिटची पिकअप, ड्राफ्टची डिलिव्हरी आणि टर्म डिपाॅझिटचा सल्ला, लाइफ सर्टिफिकेटचं पिकअप, इन्कम टॅक्स वाचवण्याशाठी फाॅर्म 15Hचं पिकअप अशा 6 सुविधांचा समावेश आहे.    सर्वात महत्वाचे म्हणजे, केवायसी झालेले खातेधारकच डोअरस्टेप बँकिंग सेवेचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय तुमचा वैध मोबाइल…

एसबीआय सायबर डिफेन्स इन्शुरन्स लॉन्च

एसबीआय जनरल इन्शुरन्स (एसबीआयजी), या भारतातील वेगाने वाढणाऱ्या जनरल इन्शुरन्स कंपनीने त्यांचे नवे उत्पादन – सायबर डिफेन्स इन्शुरन्सच्या लॉन्चची घोषणा केली आहे. हे उत्पादन व्यवसायांकरिता सायबर इन्शुरन्स देऊ करते. प्रारंभिक टप्प्यात एसएमई, मध्यम-बाजारांतील व्यापारांवर लक्ष असून मोठ्या व्यापारांनाही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.    हे एक चपखल उत्पादन असून ‘सायबर डिफेन्स इन्श्युरन्स’ वाढत्या सायबर उल्लंघन धोक्यांमध्ये संरक्षण पुरवते. हे उत्पादन हॅकिंग हल्ले, ओळख चोरणे, संवेदनशील माहिती उघड करणे आणि व्यापारी अडथळे यांसारख्या मुख्य सायबर असुरक्षिततेविरुद्ध संरक्षणाच्या दृष्टीने डिझाईन केले आहे.        अलीकडच्या काळात डिजीटल प्रगती झपाट्याने होत असताना सर्वच प्रकारच्या आणि आकाराच्या व्यवसायांमध्ये सायबर जोखीमही वाढली. व्यापारामध्ये बहुसंख्य…

प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंड—हे वाचाच

प्रिन्सिपल म्युच्युअल फंडाने आज प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडसाठी त्यांच्या न्यू फंड ऑफर (एनएफओ) सादर करत असल्याची घोषणा केली. ही ओपन एंडेड (खुली योजना) इक्विटी स्कीम मुख्यत्वे स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणार आहे. या योजनेद्वारे दीर्घकाळात अधिक परतावा देऊ शकण्याची क्षमता असणाऱ्या छोट्या कंपन्यांना शोधून त्यात गुंतवणूक केली जाणार आहे. हा एनएफओ  २२ एप्रिल रोजी खुला झाला असून ६ मे २०१९ पर्यंत खुला राहणार आहे.   प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात स्मार्ट ट्रिगर एनेबल्ड प्लॅन (एसटीईपी-स्टेप) आणि ऑटो ट्रिगर अशा सुविधा आहेत. बाजारपेठेत काळानुसार येणारे धोके कमी करण्यासाठी बहुविध प्रकारे गुंतवणूक करून बाजारपेठेत प्रचंड पडल्यास गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याचा उद्देश स्टेपमध्ये ठेवण्यात आला…

टीसीएस आणि इंडिया पोस्ट एकत्र

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) भारतीय पोस्ट ऑफिसबरोबर अत्याधुनिकीकरणासंदर्भातील करार केला आहे. या कराराद्वारे टीसीएस अनेक पातळीवरील अत्याधुनिक सुविधा पोस्ट खात्याला उपलब्ध करून देत आहे. पुढील काही वर्षांसाठीचा हा करार आहे.    याद्वारे अत्याधुनिक डिजिटल हब, मेल आणि पॅकेजेसची डिलिव्हरी टीसीएस पोस्ट ऑफिसला उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांनासुद्धा अत्याधुनिक सेवा पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय महसूलाचे नवे मार्ग शोधण्यासाठी काही नाविन्यपूर्ण सेवांचीही पोस्ट ऑफिसमध्ये सुरूवात करून दिली जाणार आहे.    टीसीएस पोस्टामध्ये कोअर सिस्टम इंटेग्रेशनची अंमलबजावणी करणार आहे. ही एक एंटरप्राईझेस रिसोसर्स प्लॅनिंग (ईआरपी) यंत्रणा असून त्याद्वारे मेल, फायनान्स आणि अकाऊंटिंग, एचआरचे कामकाज यासारख्या विभागांचे कामकाज हाताळले जाणार आहे.    टीसीएसच्या…

टीडीएसच्या दाखल्यात बदल

form 16 या नावाने प्रचलित असणाऱ्या अर्जाच्या स्वरूपात प्राप्तिकर खात्याने काही बदल केले आहेत. हा अर्ज अधिक सर्वसमावेशक व तपशीलवार करून करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. नवीन बदल कोणते? नवीन अर्जात कर्मचाऱ्यांना अधिक तपशीलवार माहिती द्यावी लागणार आहे. गृहमालमत्तेपासूनचे उत्पन्न, अन्य आस्थापनांकडून मिळणारे उत्पन्न, विविध करबचत योजनांमधील गुंतवणुकीची तपशीलवार माहिती, प्राप्त झालेले विविध भत्ते तसेच अन्य स्रोतांतून झालेले उत्पन्न याची माहिती या अर्जात द्यावी लागेल. बचतीच्या योजनांमधील व्याजापोटी मिळणारी करवजावट, सवलत आणि अधिभार या माहितीसाठीही नव्या अर्जांत रकाने आहेत. नोकरदार व्यक्ती व ज्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची गरज नाही अशा व्यक्तींच्या करविवरणाच्या अर्जाची अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आहे. या…

(2019) ‘एसआयपी’साठी उत्तम”-एस नरेन

भारतीय शेअर बाजार हा सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. परकी संस्थात्मक गुंतवणूकदार हे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारातील कंपन्यांसाठी चालू वर्ष फायदेकारक राहील. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात अस्थिरता दिसू शकते. त्यामुळे संधीचा फायदा घेऊन अस्थिरता टाळण्यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपीचा मार्ग उत्तम राहील असा विश्वास आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाचे मुख्य आर्थिक सल्लागार एस नरेन यांनी इंग्रजी वृत्तसंस्था 'इकॉनॉमिक टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यामध्ये इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंडात जोरदार कमबॅक केले आहे. विद्यमान सरकारच पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता अनेक सर्वेमधून समोर आल्याने इक्विटीमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. मार्च…

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ

छोट्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा ओघ सुरूच ठेवला आहे. मार्च महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात 8,055.35 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मागील वर्षी याच कालखंडाशी तुलना करता त्यात 13 टक्क्यांची वाढ झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यात एसआयपीद्वारे 8,094 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.    'एसआयपीमध्ये आम्हाला सातत्याने वाढ होतानाच दिसते आहे. काही महिन्यांमध्ये जरी त्यात घट झालेली दिसली तरी ती नगण्यच आहे. नवीन एसआयपी खाती सुरू होण्यात मात्र खंड पडलेला नाही. मार्च महिन्यात तीन लाख नवीन एसआयपी खाती उघडण्यात आली आहेत', असे मत अॅम्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस व्यंकटेश यांनी व्यक्त केले आहे.    मार्चअखेर म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 23.80 लाख…

जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदी डेव्हिड मालपास

जागतिक बॅंकेच्या 13 व्या अध्यक्षपदावर डेव्हिड मालपास यांची निवड झाली आहे. जागतिक बॅंकेकडून कार्यकारी मंडळाकडून 63 वर्षीय मालपास यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. डेव्हिड मालपास सध्या ट्रेझरी फॉर इंटरनॅशनल अफेअर्सच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मालपास 9 एप्रिलपासून सांभाळणार आहेत. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. जागतिक बॅंकेचे आतापर्यतचे सर्व तेरा अध्यक्ष हे अमेरिकीचे आहेत. जागतिक बॅंकेचा अध्यक्षपदी असणारी व्यक्ती इंटरनॅशनल बॅंक फॉर रिकन्स्ट्रक्शन अॅंड डेव्हलपमेंट (आयबीआरडी) आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन (आयडीए) यांच्या संचालक मंडळाच्याही प्रमुखपदी असते.

सर्वाधिक परकी गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारात मार्च महिन्यात सर्वाधिक परकी गुंतवणूक झाली आहे. मागील सात वर्षातील ही सर्वात मोठी परकी गुंतवणूक आहे. परकी गुंतवणूकदारांकडून आशियाई शेअर बाजारात करण्यात आलेल्या गुंतवणूकीतील सर्वात मोठा हिस्सा भारतीय शेअर बाजाराकडे आकर्षित झाला आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांचा कल भारतीय शेअर बाजाराकडे आहे. त्यातच जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावल्या परिणामही इतर आशियाई बाजारांवर झाला आहे, त्याचाही फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला आहे. मार्च महिन्यात आशियातील दक्षिण कोरिया, तैवान, भारत, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांच्या एकत्रित शेअर बाजारात 4.96 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक झाली आहे. तर एकट्या भारतीय शेअर बाजारात मार्च महिन्यात…

End of content

No more pages to load