साइड पॉकेटिंग म्हणजे काय?

डेट फंड योजनांच्या परताव्यातील जोखमीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सेबीने 'साइड पॉकेटिंग'च्या पर्यायास मान्यता दिली आहे. काही फंड हाऊसनी आपल्या योजनांमध्येच या वैशिष्ट्याचा समावेश केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या वित्तीय संस्थांमध्ये फंड कंपन्यांनी गुंतवणूक केली असल्याने रोख्यांच्या परताव्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. अशावेळी फंड कंपन्यांपुढे साइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय उपलब्ध असतो... .. साइड पॉकेटिंग म्हणजे काय? डेट पोर्टफोलिओमधील एखादा गुंतवणूक घटक धोकादायक किंवा खराब स्थितीत पोहोचल्यास ती गुंतवणूक अन्य लिक्विड गुंतवणुकीपासून वेगळी करण्याचा मार्ग म्हणजे साइड पॉकेटिंग. या धोकादायक गुंतवणूक घटकामुळे पूर्ण पोर्टपोलिओच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्यास साइड पॉकेटचा पर्याय वापरला जातो. बाजारातील चढउतारांमुळे एखाद्या फंडात मोठा हिस्सा बाळगणारे…

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा ‘एमएनसी फंड’

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवा 'एमएनसी फंड' बाजारात आणला आहे. ही एक ओपन एंडेड योजना असून या फंडाद्वारे मुख्यत्वे: एमएनसी कंपन्यांच्या शेअरमध्ये केली जाणार आहे. नव्या फंडाची ऑफर (एनएफओ) 28 मे ला गुंतवणूकीसाठी खुली झाली आहे. एनएफओची अंतिम मुदत 11 जून आहे. 'एमएनसी कंपन्या चांगले व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय ब्रॅंड, भक्कम बॅलन्स शीट यासारख्या वैशिष्ट्यांनी युक्त असतात. याआधीच्या अनुभवानुसारही एमएनसी कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे', असे मत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा यांनी व्यक्त केले आहे. आयसीआयसीआय एमएनसी फंडाद्वारे भारतीय मल्टी नॅशनल कंपन्या, भारतात नोंदणी झालेल्या मल्टी नॅशनल कंपन्या त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मल्टी नॅशनल…

आरटीजीएसबद्दल मोठा निर्णय

रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देत रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएसच्या वेळेत वाढ केली आहे. आता आरटीजीएसच्या माध्यमातून संध्याकाळी उशिरापर्यंत पैसे पाठविता येणार आहे. आरटीजीएसच्या वेळेत दिड तासांची वाढ करण्यात येणार आहे. येत्या 1 जूनपासून वेळ वाढविण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.   सध्या आरटीजीएसमार्फत दुपारी साडेचारपर्यंत पैसे पाठविता येतात.  ‘आरटीजीएस’ या प्रणालीच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतर करता येते. आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) पद्धत सर्वसाधारणपणे देशातील केंद्रीय बँकांकडून वापरली जाते. मोठे व्यवहार आरटीजीएसमार्फत सुरक्षितरीत्या केले जातात. आरटीजीएस ही एक आर्थिक व्यवहाराची अशी पद्धत आहे की त्यात एका बँकेतून दुसर्‍या बँकेत आर्थिक हस्तांतरण होता वास्तविक वेळेत…

‘एनएफओ’ची लोकप्रियता वाढीस

शेअर बाजारात इक्विटी / कॅपिटल मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ज्याप्रमाणे 'आयपीओ'ला मागणी असते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत 'एनएफओ'ची (न्यू फंड ऑफर) मागणी वाढत आहे. म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या अँफीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये  झालेल्या एकूण गुंतवणुकीत एनएफओ मार्फत झालेल्या गुंतवणुकीचा वाटा तब्बल 20 टक्के इतका राहिला आहे. मागील वर्षी इक्विटी म्युच्युअल फंडात एकूण  1.18 लाख कोटींची गुंतवणूक झाली. यापैकी इक्विटी योजनेच्या प्रारंभी म्हणजे 'एनएफओ' द्वारे तब्बल 25 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.   मागील वर्षी एकूण 77 इक्विटी प्रकारातील योजना म्युच्युअल फंड कंपन्यांकडून सादर केल्या गेल्या आहेत. यामध्ये 70 पूर्णपणे इक्विटी, 3…

इक्रा ऑनलाईनचा नवा क्लाऊड बेस्ड ‘म्युच्युअल फंड ट्रॅकर’

इक्रा (आयसीआरए) ऑनलाईनने नवा क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित पोर्टफोलिओ ट्रॅकिंग आणि रिपोर्टिंग करणारा म्युच्युअल फंड ट्रॅकर बाजारात आणला आहे. इक्रा ही एक आघाडीची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. या म्युच्युअल फंड ट्रॅकरमुळे आर्थिक सल्लागार, वितरक आणि वेल्थ मॅनेजरना मोठाच फायदा होणार आहे. या ट्रॅकरमुळे फंड सल्लागारांना महत्त्वाच्या माहितीचे विश्लेषण तसेच फंडाची हाताळणी करताना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहे.   नवा म्युच्युअल फंड ट्रॅकर संगणक, टॅबलेट्स आणि स्मार्टफोनवर वापरता येणार आहे. देशातील म्युच्युअल फंडात होत असलेली मोठी गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यात दुवा साधण्याचे काम म्युच्युअल फंड ट्रॅकर करणार आहे. इक्रा ही एक आघाडीची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. या ट्रॅकरची रचना सल्लागारांना सोप्या पद्धतीने हाताळता येईल अशी…

विद्यार्थ्यांना ‘पॉकेट्मनी’साठी मिळतेय कर्ज

शैक्षणिक कर्जाबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती असते. शक्यतो पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँका, एनबीएफसीज, यांबरोबरच अनेक स्टार्टअप कंपन्या विद्यार्थ्यांना कर्जे देत असतात. यामध्ये विद्यार्थ्याने निवडलेल्या कोर्सचे शुल्क आणि होस्टेल किंवा पुस्तके यांसारख्या घटकांचा विचार करून कर्जे दिली जातात. मात्र विद्यार्थ्यांना दैनंदिन पातळीवर आवश्यक असणाऱ्या खर्चाचा 'पॉकेटमनी'चा विचार होत नाही. नेमकी हीच बाब ओळखून मोठ्या प्रमाणात असलेल्या विद्यार्थी वर्गावर लक्ष केंद्रित करून अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात कार्यरत झाली आहेत.   तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांची खर्च करण्याची पद्धत यांसारख्या विविध बाबींचा विचार करून नवनवीन सर्जनशील स्टार्टअप कंपन्या या व्यवसायातील जोखीम आणि कमी नफ्यावर आधारित व्यवसायाचे मॉडेल घेऊन आल्या आहेत. विद्यार्थी आणि नुकत्याच पदवीधर…

बँकिंग फंडातील गुंतवणूक ठरेल नफाक्षम

‘आयएल अँड एफएस’च्या पतनानंतर गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांची रोकड सुलभता आटली असून, परिणामी त्यांचे कर्ज वितरणही कमी झाले आहे. कर्ज वितरणातील ही पोकळी स्टेट बँकेसारख्या मोठय़ा बँका भरून काढत असल्याने नजीकच्या काळात बँकांच्या नफा क्षमतेत मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे बँकिंग समभागांवर केंद्रित म्युच्युअल फंडांची कामगिरीही चांगली राहण्याची शक्यता आहे. कर्ज वितरणाचा मोठा हिस्सा दोन-तीन वर्षांपूर्वी बँकांकडून गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांनी आक्रमकरीत्या काबीज केला होता. त्याउलट काही अपवाद वगळता बहुतांश गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वितरणात मगील सहा महिन्यांत घट झाली आहे. तर वाणिज्य बँकांचे सुधारत असलेले कर्ज वितरण पाहता, बँकांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर फंडांतील गुंतवणूक नजीकच्या काळाला नफा…

अस्पायर होम फायनान्स आता मोतीलाल ओसवाल होम फायनान्स

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची उपकंपनी असलेली अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे नाव आता “मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड” किंवा मोतीलाल ओसवाल हे दोन शब्द असलेले कोणतेही नाव स्वीकारण्याचा प्रस्ताव अस्पायर होम फायनान्सच्या संचालक मंडळाने नुकताच सादर केला.   अस्पायर होम फायनान्सच्या सर्वसाधारण सभेत तसेच नियामक मंडळाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर कंपनीचे नाव बदलले जाणार आहे. अस्पायर होम फायनान्सला नॅशनल हाऊसिंग बँकेकडून एक मे 2019 रोजी नाव बदलण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे. प्रस्तावित नावासाठी आता केंद्र सरकारच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनी विभागाकडे अर्ज दाखल केला जाणार आहे. सर्व प्रकारच्या मान्यता मिळताच कंपनीचे नाव बदलले जाणार आहे. त्यानंतर ‘मोतीलाल ओसवाल होम…

‘एनबीएफसीं’पुढचे संकट टळले–आदित्य पुरी

पैशांच्या तरलतेच्या मुद्द्यावरून संकटात सापडलेल्या एनबीएफसींपुढचे (बिगर बँकिंग वित्त संस्था) मोठे संकट टळले आहे. मात्र परिस्थिती पूर्व पदावर यायला 12 ते 18 महिने लागतील असा आशावाद एचडीएफसी बँकेच्या आदित्य पुरी यांनी व्यक्त केला आहे. ब्लूमबर्ग या इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. नियामक संस्था आरबीआय आणि सरकार यांच्या प्रयत्नामुळे भारतात लेहमन ब्रदर्स सारखी परिस्थिती उदभवली नाही. वेळीच नियामक संस्थांनी केलेला हस्तक्षेप आणि मालमत्ता विक्रीच्या माध्यमातून पैशांची तरतूद करणे सोपे झाले. त्यामुळे आयएल अँड एफएस सारखी देशातील मोठ्या एनबीएफसीला सावरणे सोपे झाले.  पैशाच्या तरलतेच्या मुद्द्यामुळे आयएल अँड एफएस संकटात आल्यानंतर भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता. सेन्सेक्स तब्बल 3000 अंशांनी…

कोटक महिंद्रा बॅंकेला नफा 25 टक्के वाढीसह 1,408 कोटींवर

कोटक महिंद्रा बॅंक या खासगी क्षेत्रातील बॅंकेने मार्चअखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. कोटक महिंद्रा बॅंकेला चौथ्या तिमाहीत 1,407.8 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीशी तुलना करता बॅंकेच्या नफ्यात 25 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी चौथ्या तिमाहीत कोटक महिंद्रा बॅंकेने 1,124 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. 

End of content

No more pages to load