आयआयएफएलकडून परवडणाऱ्या घरांसाठी ‘स्वराज’ योजना

सुतार, वाहन चालक, नळ कारागीर, इलेक्ट्रिशिअन, मेकॅनिक, तंत्रज्ञ, फेरीवाले विक्रेते, शिपाई ते सुरक्षारक्षक अशा अल्पवेतनी तसेच नियमित उत्पन्न नसलेले छोटे कारगीर अथवा स्वयंरोजगार करणाऱ्यांना स्वमालकीच्या घर आता घेता येईल. ‘अनौपचारिक उत्पन्न श्रेणीत’ मोडणाऱ्या या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘स्वराज’ अंतर्गत विशेष गृह कर्ज योजना आयआयएफएल होम फायनान्स या कंपनीने सादर केली आहे. स्वराज अंतर्गत २ लाख रुपये ते २० लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज दिले जाईल आणि परवडणाऱ्या घरांसाठी ही गृहवित्त योजना आहे. उत्पन्न दर्शविणारी औपचारिक कागदपत्रे (वेतन पत्रक) उपलब्ध नसलेल्या आणि पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवीत असणाऱ्या घर खरेदीस इच्छुक ग्राहकांच्या गरजा ध्यानात घेऊन ‘स्वराज’ची रचना करण्यात आली आहे,. कार्यक्षम…

1 लाखाचे 10 वर्षात झाले तब्बल 13 कोटी…

मल्टीबॅगर शेअरच्या शोधात गुंतवणूकदार नेहमीच असतात. असाच एक शेअर आहे ज्याने 10 वर्षात तब्बल 1,32,627 टक्के परतावा दिला आहे. पाईपच्या क्षेत्रातील अॅस्ट्रल पॉली टेक्निक (Astral poly technik) या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना छप्पर फाडके परतावा मिळवून दिला आहे.    दहा वर्षांपूर्वी 01 जुलै 2009ला ज्यांनी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते त्यांच्या शेअरचे बाजारमूल्य आज 13.27 कोटी रुपयांवर पोचले आहे. या शेअरची किंमत 0.99 रुपये प्रति शेअरवरून 1279.90 रुपये प्रति शेअरवर पोचला आहे. मागील एका वर्षात अॅस्ट्रल पॉली टेक्निकच्या शेअरने 21.93 टक्के परतावा दिला आहे. तर हे वर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यत या शेअरने 15.03 टक्के परतावा दिला आहे.    अॅस्ट्रल…

करचोरी रोखण्यासाठी नियम

करपात्र उत्पन्न नसल्याचे सांगत विवरणपत्र न भरणाऱ्या मात्र भरमसाट खर्च करणाऱ्या नागरिकांना चालू वर्षापासून विवरणपत्र भरावे लागणार आहे. विदेशातील पर्यटनावर दोन लाख रुपये खर्च करणारे, बँक खात्यात वर्षभरात एक कोटी रुपयांची रक्कम जमा करणारे व ज्यांच्या वार्षिक वीजदेयकाचा एकूण खर्च एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना प्राप्तिकर विवरणपत्र सादर करणे अनिवार्य ठरणार आहे. या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न करकक्षेत मोडत नसले तरीही त्यांना विवरणपत्र भरावे लागेल, असे अर्थसंकल्पासंबंधी कागदपत्रांत स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९मध्ये बदल करण्यात येणार आहे.

टाटा मोटर्सची पहिली इलेक्ट्रिक कार बघितली का?

टाटा मोटर्सने नुकतीच पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. टाटाने टिगोर या गाडीचे Tigor EV नावाने आता इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले आहे.  एकदा गाडी पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ती 142 कि.मी. अंतर धावणार आहे. शिवाय कंपनीकडून तीन वर्षाची आणि 1 लाख 25 हजार किमीची वॉरंटी देण्यात आली आहे. टाटाने टिगोर EV ची 9.99 लाख रुपये एक्स शोरुम किंमत निश्चित केली आहे. यामध्ये सबसिडीचा देखील समावेश करण्यात आला आहे. टाटा टिगोर EV व्हर्जन: टाटा टिगोर EV XM आणि : टाटा टिगोर EV XT व्हर्जन असे दोन व्हर्जन सादर करण्यात आले आहे. टाटा टिगोर EV XM : 9.99 लाख रुपये टाटा टिगोर EV…

फंड आणि रोख्यांमधील गुंतवणुकीबाबत सेबीची कठोर पाऊले

म्युच्युअल फंड क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी सेबीने आता पाऊले उचलली आहेत. आर्थिक क्षेत्रातील आयएल अँड एफएस, एस्सेल, डीएचएफएलसारख्या  प्रकरणांमुळे म्युच्युअल फंड क्षेत्रात अस्वस्थतता पसरली आहे. यामुळेच म्युच्युअल फंड, रोख्यांमधील गुंतवणुकीबाबत भांडवली बाजार नियामक सेबीने  कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.   सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सेबीने कठोर पावले असून मोठ्या कंपन्यांचे मोठे गुंतवणूकदार तसेच प्रवर्तक यांना वेळोवेळी माहिती जाहीर करण्यास बंधनकारक केले आहे. पतमानांकन संस्था, प्रवर्तकांचे समभाग, लिक्विड फंड आणि स्वामित्त्व मूल्य याबाबतच्या सुधारणांचे संकेतही देण्यात आले आहे. शिवाय शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांचे शेअर तारण ठेवून कर्ज उचलण्याबाबत कंपन्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. कारण एस्सेल…

आता E-KYC सावंतवाडी शक्य —

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी KYC असणे अनिवार्य आहे !! कोणत्याही एका AMC कडे आपली KYC असली तरी आपण इतर कोणत्याही AMC कडे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो !! पण प्रथमच नव्याने गुंतवणूक करण्यासाठी KYC संबंधीचे कागद  प्रत्यक्ष post करणे आवश्यक असते !! पण या नव्या तंत्रज्ञान युगात हिअडचण सुद्धा CAMS ने दूर केली असून सिंधूदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे E-KYC सुविधा शेअरखान सावंतवाडी या कार्यालयात नव्याने कार्यान्वित झाली आहे !तरी गुंतवणुकदारानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदीप जोशी यांनी केलेआहे.

‘कोटक फोकस्ड इक्विटी फंड’ बाजारात…

कोटक अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने (एएमसी) आपला नवा फंड, कोटक फोकस्ड इक्विटी फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड आहे. या फंडाद्वारे लार्ज-कॅप, स्मॉल-कॅप, मिड-कॅप श्रेणीतील एकत्रितरित्या 30 शेअरमध्ये (कमाल) गुंतवणूक करण्यात येणार आहे. नव्या फंडाची ऑफर (एनएफओ) 25 जूनला गुंतवणूकीसाठी खुली होत असून 9 जुलै ही त्याची अंतिम तारीख आहे. या फंडाचा बेंचमार्क निफ्टी 200 टीआरआय असणार आहे. नव्या 'कोटक फोकस्ड इक्विटी फंड'चे व्यवस्थापन शिबानी कुरियन आणि हरीश कृष्णन करणार आहेत. 'कोटक फोकस्ड इक्विटी फंडद्वारे जोखीम आणि परतावा तत्वावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. या फंडासाठी शेअर निवडताना बॉटम अप पद्धती अवलंबण्यात येणार आहे. कंपनीचा व्यवसाय, व्यवस्थापन…

गुंतवणुकीची माहिती एॅपवर

गुंतवणुकीची माहिती सुरक्षित राहावी, तसेच गुंतवणूकदाराच्या कुटुंबीयांना त्याबाबत माहिती मिळावी म्हणून इन्व्हेस्टमेंट सेफगार्ड नावाचे ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. व्हर्च्युअल तिजोरीवर आधारित असलेले अशाप्रकारचे देशातील हे पहिलेच अॅप आहे.   भारतात सुमारे ६४ बँकांमध्ये ११ हजार ४०० कोटी रुपये दाव्यांशिवाय पडून आहे. बऱ्याचदा कुटुंबीयांना घरातील कर्त्या व्यक्तींने कुठे गुंतवणूक केली आहे याची माहिती नसते. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत माहिती सुरक्षित ठेवली जाईल शिवाय गरजेच्यावेळी गुंतवणुकीचा तपशील कुटुंबीयांना उपलब्ध करून दिला जाईल, अशा संकल्पनेतून अॅपची  निर्मिती केल्याचे संदीप सानप यांनी सांगितले.    ऍपमध्ये प्रोफाइल तयार केल्यानंतर त्यात वित्तीय तपशील सेव्ह करता येतो. गुंतवणुकीचा तपशील एन्क्रिप्ट केल्यानंतर सर्व्हरवरवर पाठविला जातो. त्यामुळे…

मोदी सरकारचा 2019-20 साठीचा अर्थसंकल्प 5 जुलैला…

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला सादर होणार आहे. नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 5 जुलैला लोकसभेमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार या अर्थसंकल्पात आपल्या पोतडीतून काय काढते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

End of content

No more pages to load