एजंट हे करू शकणार नाहीत!!

IRDAI has toughened the regulations for insurance intermediaries like agents and brokers to sell ULIPs. In fact, from December 1, 2019, insurance agents will have to become eligible to sell market-linked products like ULIPs. In its latest circular, IRDAI has clarified that insurance agents will have to attend an additional training session apart from mandatory hour trainings to become eligible to sell ULIPs. Such a training session has to be conducted on continuous basis. The market regulator has asked insurance companies to maintain a list of agents who have undergone this specific training. This training would cover topics like development…

आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत—-

आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पॅन कार्ड-आधार लिंक करता येणार आहे. याआधी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. याबाबत शनिवारी सीबीडीटीने एक परिपत्रक काढले आहे. पॅन कार्ड क्रमांक हा आधारसोबत लिंक करणे आवश्यक आहे. पॅन कार्ड आधार सोबत लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रीय होणार असल्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटवरून आधार-पॅन लिंक करता येईल. त्याशिवाय आधारसोबत लिंक करताना पॅन कार्ड आणि आधारमधील माहितीत कोणत्याही प्रकारची विसंगती नाही हे ही काळजीपूर्वक पाहावे लागणार आहे. दोन्ही कार्डमधील माहितीत तफावत असल्यास दुरूस्ती करता येणार आहे. आधारसोबत पॅन कार्ड लिंक न केल्यास आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड वापरता येणार…

स्पाईस जेट कार्गो आयपीओ आणण्याच्या तयारीत

ई कॉमर्स क्षेत्रात आलेल्या तेजीचा फायदा घेण्यासाठी स्पाईस जेटची लॉजिस्टीक विंग स्पाईस एक्सप्रेस (SpiceXpress) लवकरच आपला आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.   भारत 130 कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. देशात ई कॉमर्स क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत हवाई लॉजिस्टिक क्षेत्रात खूप कमी कंपन्या आहेत. त्यामुळे स्पाईस एक्सप्रेसला याचा निश्चित फायदा होईल.   सध्या हवाई लॉजिस्टिक क्षेत्रात स्पाईस एक्सप्रेस आणि ब्लु डार्ट या दोन कंपन्या आघाडीवर आहेत.  

एसआयपीच्या माध्यमातून 8,231 कोटी

ऑगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून 8,231 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एसआयपीमधील गुंतवणूकीत मागील वर्षाच्या याच कालावधीशी तुलना करता 7.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट 2018 मध्ये एसआयपीद्वारे 7,658 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.    एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात झालेली एकूण गुंतवणूक 41,098 कोटी रुपयांवर पोचली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2018 मध्ये हीच गुंतवणूक 36,760 कोटी रुपये इतकी होती. असोसिएन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाने (अॅम्फी) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्याने बाजारातील जोखीम कमी होत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे.  

आमची शिफारस

‘‘मागील वर्षभरातील गुंतवणुकीचे मुद्दल शाबूत ठेवणारे जे मोजके फंड आहेत त्यामध्ये यूटीआय इक्विटी फंडाचा समावेश होतो. एका वर्षांपूर्वी एकरकमी केलेल्या गुंतवणुकीवर ३.५६ टक्के तर एका वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘एसआयपी’चा वार्षिक परतावा ०.८७ टक्के आहे. फंडाचा अभ्यास करताना, ‘एस अँड पी बीएसई २०० टीआरआय’ हा एकच मानदंड असलेल्या अन्य फंडांच्या तुलनेत कामगिरी तपासली असता, यूटीआय इक्विटी फंडाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. ज्या काळात बहुसंख्य फंड आपल्या मानदंडापेक्षा खराब कामगिरी करत असताना भांडवल शाबूत ठेवणाऱ्या या फंडात मी तुम्हाला गुंतवणुकीची शिफारस करीत आहे,’’ यूटीआय इक्विटी फंड हा लार्जकॅप केंद्रित मल्टीकॅप फंड असून  विश्लेषणानुसार अन्य प्रमाणित विचलनाची तुलना केली असता, अन्य मल्टीकॅप फंडांपेक्षा…

तर दरदिवशी १०० रुपये मिळणार !!

ज्या ग्राहकांना फेल झालेल्या डिजीटल व्यवहाराचे पैसै एक दिवसाच्या आत मिळणार नाही त्यांना यापुढे बँक आणि डिजीटल वॉलेट्स दंडापोटी दररोज १०० रुपये देणार आहेत. UPI, IMPS, NACH द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू आहे. डिजीटल व्यवहारांव्यतिरिक्त RBI ने नॉन-डिजीटल ट्रान्झॅक्शन्ससाठीही वेळेची मर्यादा आखून दिली आहे. एटीएम आणि मायक्रो एटीएममध्ये अयशस्वी झालेल्या व्यवहारांसाठी खात्यात पैसै येण्यास पाच दिवसांपर्यंतची मर्यादा आखण्यात आली आहे. त्यानंतर दररोज १०० रुपये दंड बँकांना द्यावा लागेल. ही दंडाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात त्वरीत पोहोचायला हवी, ग्राहकांनी तक्रार करण्याची वाट बँकांना पाहू नये, असंही RBI ने परिपत्रकात नमूद केलं आहे.

मुंबई शेअर बाजारात “इंटरेस्ट रेट ऑप्शन्स कॉंट्रॅक्‍ट्‌स’ उपलब्ध !!

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आता "इंटरेस्ट रेट ऑप्शन्स कॉंट्रॅक्‍ट्‌स' उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशा प्रकारची कॉंट्रॅक्‍ट्‌स उपलब्ध करून देणारे "बीएसई' हे भारतातील पहिले व एकमेव एक्‍स्चेंज ठरले आहे. मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वांत जुना आणि सध्या जगातील सर्वांत वेगवान शेअर बाजार आहे. या बाजारात सहा मायक्रोसेकंद इतक्‍या वेगाने व्यवहार करण्यात येतात. या बाजारात समभाग व कर्जरोख्यांच्या खरेदी-विक्री व्यतिरिक्त चलन, सोने-चांदी यावर आधारित डेरिव्हेटीव्ह कॉंट्रॅक्‍ट्‌सचे व्यवहारही करण्यात येतात. जानेवारी 2014 पासून या बाजारात इंटरेस्ट रेट फ्युचर्स कॉंट्रॅक्‍ट्‌सही उपलब्ध करून देण्यात आली होती. मुंबई शेअर बाजाराचा अशा प्रकारच्या व्यवहारातील सरासरी बाजारहिस्सा सुमारे 40 टक्के आहे. अलीकडेच म्हणजे 26 ऑगस्ट…

म्युच्युअल फंड गुंतवणूक

देशातील कॉर्पोरेट संस्थां म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना बँकिंग आणि पीएसयू फंड त्याचबरोबर कॉर्पोरेट बॉण्ड फंडाला पसंती देत असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने डेट प्रकारातील ही गुंतवणूक असते. मागील काही महिन्यांमध्ये लिक्विडीटीचा मुद्दा समोर आल्यानंतर कमी जोखीम आणि उच्च प्रतीचे कर्जरोखे म्हणून या फंडांना वाढती मागणी आहे. म्युच्युअल फंडाची शिखर संस्था अँफीने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते ऑगस्ट या या महिन्यात बँकिंग आणि पीएसयू फंडात सर्वाधिक म्हणजे 15,656 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. तर, त्याखालोखाल कॉर्पोरेट बॉण्ड फंडात 11,324 कोटी गुंतविले गेले आहेत. बँकिंग आणि पीएसयू फंडातील तब्बल 80 टक्के गुंतवणूक बँक, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सार्वजनिक वित्तीय संस्थांमध्ये करण्यात येते.…

बॉंडमधील गुंतवणूक युपीआय द्वारे ?

सिक्युरिटिज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) बॉंड मार्केटमधील गुंतवणूक युपीआय अॅपद्वारे करण्याच्या प्रस्तावावर विचार करते आहे. याआधीच काही महिन्यांपूर्वी सेबीने गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये युपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) अॅपद्वारे गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. छोट्या किंवा सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी युपीआय अॅपचा विचार केला जात आहे!!   कॉर्पोरेट बॉंडची पारदर्शकता वाढवण्यासाठी सेबीने 1 टक्के सिक्युरिटी डिपॉझिटचा नियमसुद्धा काढून टाकला आहे. त्याचबरोबर बॉंडची नोंदणी होण्याचा कालावधी कमी करून 12 दिवसांवरून 6 दिवसांवर आणला आहे. या सर्व पावलांमुळे भारतातील कॉर्पोरेट बॉंड बाजारात आणण्याच्या खर्चात कपात होईल अशी आशाही त्यागी यांनी व्यक्त केली. सध्या किरकोळ गुंतवणूकदार कॉर्पोरेट बॉंड आणि सरकारी कर्जरोखे यामध्ये शेअर…

मार्केट घसरल्यानंतर SIP गुंतवणूकीत वाढ !

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा अचूक मंत्र सापडल्याचे मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शेअर बाजार घसरल्यानंतर प्रामुख्याने इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मूल्य देखील कमी होते परिणामी शेअर बाजार गुंतवणूकदारांबरोबरच म्युच्युअल फंड गुंतवणूकदार देखील चिंताग्रस्त असल्याचे सर्वसाधारण चित्र असते. मात्र, शेअर बाजारातील घसरण हीच गुंतवणुकीची योग्य संधी म्हणत गुंतवणूक करणारे सुजाण गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून आपली गुंतवणूक वाढवत असल्याचे अँफी-क्रिसिल ने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.   अहवालात एप्रिल 2016 ते जून 2019 च्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे. या दरम्यानच्या कालावधीत एसआयपीच्या माध्यमातून 2.30 लाख कोटींची गुंतवणूक झाल्याचे आढळून आले. त्यात 2017 साली 43900, 2018 साली 67200 आणि जून…

End of content

No more pages to load