PPF विषयी नवे नियम !

वर्षभरात कितीहीवेळा पैसे डिपॉझिट करता येणार 'पीपीएफ'विषयीच्या नव्या नियमानुसार पीपीएफ खातेधारकांना 'पीपीएफ' खात्यात एका वर्षात ५० रुपयांच्या पटीत कितीही वेळा पैसे भरता येणार आहेत. मात्र ही रक्कम दिड लाखांहून अधिक नसावी. यापूर्वी खातेधारकाला एका वर्षात केवळ १२ वेळा पैसे जमा करण्याची परवानगी होती. - मुदतपूर्ती पूर्वी खाते बंद करण्यासाठी आणखी एक अट 'पीपीएफ' खाते सुरु केल्यानंतर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर विशिष्ट परिस्थिती खाते बंद करण्याची परवानगी आहे. ज्यात खातेधारकाला तसेच त्यावर अवलंबून असलेल्या पत्नी किंवा मुलांना गंभीर आजार झाल्यास पीपीएफ खाते मुदतपूर्ती पूर्वी बंद करण्याची परवानगी आहे. त्याशिवाय खातेधारक किंवा त्याच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीपीएफ खाते मुदतपूर्ती पूर्वी बंद करता…

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हित संरक्षण करण्यासाठी समिती

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी तसेच म्युच्युअल फंडाविषयी गुंतवणूकदार जनजागृती करण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यासाठी सेबीने एक आठ सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती चर्चासत्रे, प्रशिक्षण, संशोधन कार्यक्रम आणि प्रकाशने यासारख्या उपक्रमांची शिफारस करेल. आयआयएम - अहमदाबादचे माजी प्राध्यापक अब्राहम कोशी हे या समितीचे अध्यक्ष असतील. आदित्य बिर्ला सन लाइफचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बालसुब्रमण्यन हे म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधी म्हणून या समितीचे सदस्य आहेत. त्याच बरोबर शेअर बाजार नियामक संस्था सेबीच्या वतीने तीन सदस्यांचा समावेश आहे: सेबीचे मुख्य महाव्यवस्थापक एन. हरिहरन आणि कार्यकारी संचालक नागेन्द्र पारख व व्ही. एस. सुंदरसन हे ते तीन सदस्य आहेत. या पाच…

युटीआय एएमसीचा 3,000 कोटींचा आयपीओ लवकरच…

युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लवकरच आयपीओ बाजारात आणणार आहे. युटीआय एएमसीने सेबीकडे यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 3,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. व्यवस्थापनाखालील गुंतवणूक लक्षात घेता युटीआय एएमसी ही देशातील सर्वात मोठ्या एएमसीपैकी एक आहे. युटीआय एएमसीच्या आयपीओद्वारे 3,89,87,081 शेअर बाजारात आणण्यात येणार आहेत.    यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया युटीआय एएमसीमधील आपल्या 1,04,59,949 शेअरची विक्री करणार असून लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1,04,59,949 शेअरची, बॅंक ऑफ बडोदा 1,04,59,949 शेअरची, पंजाब नॅशनल बॅंक 3,80,3,617 शेअरची आणि टी रोव प्राईस इंटरनॅशनल 3,80,3,617 शेअरची विक्री करणार आहे. या सर्व वित्तसंस्थांचा युटीआय एएमसीमध्ये हिस्सा आहे.    या आयपीओच्या माध्यमातून…

निप्पॉन इंडियाकडून नोकरदारांसाठी ‘सॅलरी अॅडव्हान्टेज’ योजना दाखल

निप्पॉन इंडिया (पूर्वीच्या रिलायन्स) म्युच्युअल फंडाने पुन्हा एकदा सॅलरी अॅडव्हान्टेज योजना आणली आहे. दर महिन्याला जमा होणाऱ्या पगारावर बँकेच्या तुलनेत जास्तीचे व्याज मिळवून फायदा घेण्याचा पर्याय नोकरदारांना या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.   साधारणतः बहुतेक नोकरदारांची दर महिन्याला खर्च होणारी रक्कम वगळता काही रक्कम बँकेच्या खात्यात शिल्लक राहते. या रकमेवर बँकेकडून वार्षिक 3.5 ते 4 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळते. मात्र लिक्विड फंडांच्या माध्यमातून वार्षिक 6 ते 7 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळविण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.   योजनेचा लाभ घेणाऱ्या नोकरदारांना दर महिन्याला बँक खात्यात जमा होणारी पगार निप्पॉन इंडियाच्या खात्यात जमा करता येणार आहे. ज्या खातेदाराला पूर्ण रक्कम म्युच्युअल फंड…

प्रिन्सिपल मिडकॅप फंड — सुविधा पहा !!

प्रीन्सिपल म्युच्युअल फंडने आज आपल्या प्रिन्सिपल मिडकॅप फंडाच्या न्यू फंड ऑफरची (एनएफओ) घोषणा केली. ही एक खुली इक्विटी योजना असून, प्रामुख्याने मिडकॅप समभागांमध्ये गुंतवणूक करते. मिडकॅप कंपन्यांच्या समभागांत तसेच समभागांशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन मुद्दल अधिमूल्यनाचे उद्दिष्ट या योजनेपुढे आहे. एनएफओ आज खुला झाला आणि २० डिसेंबर २०१९ रोजी तो बंद होईल. प्रिन्सिपल म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ललित विज यांनी या लाँचबद्दल त्यांचे विचार मांडले. ते म्हणाले, “मिडकॅप गुंतवणुकीचा विचार करण्याची ही अगदी योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते आणि प्रिन्सिपल असेट मॅनेजमेंट आपल्या सुयोग्य गुंतवणूक क्षमतांच्या जोरावर गुंतवणूकदारांना चांगला मोबदला मिळवून देणाऱ्या मिडकॅप गुंतवणुकीचा अनुभव देण्याच्या स्थितीत…

एचडीएफसी समूहाची नवी दमदार कंपनी, ‘एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस’…

एचडीएफसी समूहाच्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस या बिगर बॅंकिंग वित्तीय कंपनीचे बाजारमूल्य 90,000 कोटी रुपयांवर पोचले आहे. एचडीबीची अजून शेअर बाजारात नोंदणी झालेली नाही. मात्र बिगर नोंदणीकृत बाजारात गुंतवणूकदारांनी एचडीबीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. एचडीएफसी समूहाचे आदित्य पुरी हेच एचडीबीचे नेतृत्व करत आहेत. अनलिस्टेट सेंकडरी मार्केटमध्ये म्हणजेच बिगर नोंदणीकृत बाजारात एचडीबीच्या शेअरची किंमत 1,100 रुपये प्रति शेअरवर पोचली आहे. मागील वर्षी एचडीबीच्या शेअरची किंमत 600-700 रुपये प्रति शेअर या पातळीवर होती. त्यामुळे एचडीबी देशातील चौथ्या क्रमांकाची बाजारमूल्य असलेली बिगर बॅंकिंग वित्तीय कंपनी बनली आङे. देशातील एनबीएफसी क्षेत्र रोकडचा अभाव आणि इतर संकटांना तोंड देत असताना एचडीएफसी समूहाच्या एचडीबीची कामगिरी मात्र…

मुद्रांक शुल्क कर

येत्या 9 जानेवारीपासून शेअर बाजार, म्युच्युअल फंड, यूलिप्स आणि एनपीएस सारख्या योजनांतील गुंतवणूक महाग होणार आहे. शेअर्स, डेरिव्हेटीव्ह करंन्सी आणि कमॉडिटीज मध्ये होणाऱ्या व्यवहारांवर पुन्हा एकदा मुद्रांक शुल्क कर लागू होणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने बुधवारी एक परिपत्रक काढले आहे. मुद्रांक शुल्क राज्याच्या अखत्यारीत असल्याने राज्यांनुसार तो वेगवेगळा आकारला जायचा मात्र नवीन परिपत्रकानुसार सरकारने समान मुद्रांक शुल्क दर अधिसूचित केले आहेत. या अगोदर डिमॅट स्वरूपातील वित्तीय सिक्युरिटीजच्या व्यवहारावरील मुद्रांक कर रद्द करण्यात आला होता. मात्र 2019 च्या अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे तो पुन्हा एकदा समान (युनिफॉर्म) पद्धतीने लागू होणार आहे. म्युच्युअल फंड, यूलिप्स किंवा एनपीएस मध्ये होणारी गुंतवणूक शेअर्स, डेरिव्हेटीव्ह करंन्सी…

एल अँड टी फायनान्सचा “एनसीडी’ इश्‍यू 16 डिसेंबरपासून

एल अँड टी फायनान्स कंपनीने सिक्‍युअर्ड, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) बाजारात आणण्याचे ठरविले आहे. या "एनसीडीं'ची विक्री 16 डिसेंबर रोजी खुली होत असून, ती नियोजित वेळापत्रकानुसार 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या इश्‍यूद्वारे कमाल 8.65 टक्‍क्‍यांपर्यंत व्याज दिले जाणार आहे.   यात किमान गुंतवणूक दहा हजार रुपये असून, त्यानंतर एक हजाराच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. हे डिबेंचर 36, 60 आणि 84 महिन्यांच्या मुदतीचे असून, त्यात मासिक आणि वार्षिक व्याज; तसेच संचयी (क्‍युम्युलेटिव्ह) पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या डिबेंचरवर मुदतीनुसार आणि व्याजाच्या पर्यायानुसार वेगवेगळे व्याजदर असून, ते 8.25 टक्के ते 8.65 टक्के या पातळीदरम्यान आहेत, असे कंपनीने म्हटले…

म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 27 लाख कोटींवर

नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंड व्यवसायात मोठी अस्थिरता दिसून आली. एका बाजूला क्रेडिट रिक्स फंडामधून गुंतवणुकदारांनी पैसा काढून घेतला तर इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीत 85 टक्क्यांची घट झाली. नोव्हेंबरमध्ये इक्विटी प्रकारातील योजनांमध्ये 933 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात इक्विटी प्रकारातील गुंतवणूकीत मोठी घट झाली आहे. यात गुंतवणूकदारांनी नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक काढून घेणे हेसुद्धा एक कारण आहे. तरीसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातील एकूण गुंतवणूक आतापर्यतच्या सर्वाधिक पातळीवर म्हणजे 27 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे,

मोतीलाल ओसवाल इंडेक्स फंड — NFO

देशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी मोतीलाल ओसवालने दोन इंडेक्स फंड योजना बाजारात दाखल केल्या आहेत. मोतीलाल ओसवाल निफ्टी 50 इंडेक्स फंड आणि मोतीलाल ओसवाल निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड असे या दोन्ही योजनांची नावे आहेत. हे दोन्हीही फंड पॅसिव्ह प्रकारात मोडतात. यानिमित्ताने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी 50 या निर्देशांकात गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. ओपन एंडेड प्रकारातील या योजना आहेत. ज्या गुंतवणूकदारांना निफ्टी 50 या निर्देशांकात येणाऱ्या तेजीचा फायदा एसआयपीच्या माध्यमातून घ्यायचा आहे अशांसाठी ही योजना चांगला पर्याय ठरू शकते. 3 ते 17 डिसेंबर दरम्यान योजनांचा न्यू फंड ऑफर (एनएफओ) गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी 500 रुपयांपासून…

End of content

No more pages to load