‘टाटा क्वांट फंड’ घ्यावाच !!
टाटा म्युच्युअल फंडाने ‘टाटा क्वांट फंड’ हा आर्टिफिशिअल इंटलिजन्स (एआय) व मशीन लर्निंग (एमएल) यांचे पाठबळ असणारा फंड दाखल केला आहे. हा प्रोप्रायटरी क्वांट पद्धतीचा वापर करणारा फंड बाजारातील तेजीच्या वेळी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे आणि बाजारातील मंदीच्या वेळी कमीत कमी नुकसान करून घेणे, हे उद्दिष्ट असणाऱ्या गुंतवणूक पोर्टफोलिओची निर्मिती करण्यासाठी असून त्यामध्ये विवध रुल इंजिन व प्रेडिक्टिव्ह मॉडेल यांची सांगड घातली आहे. पोर्टफोलिओ निर्माण करण्यासाठी रुल इंजिन बनवण्यासाठी स्टॉक परताव्याचे विस्तृत व सातत्यपूर्ण घटक विचारात घेतले जातात. ‘मूल्य’, ‘गुणवत्ता’, ‘गती’, ‘आकार’ अशी वैशिष्ट्ये आणि अन्य काही वैशिष्ट्यांची सांगड घालून पोर्टफोलिओ निर्माण करण्यासाठी प्रत्येक रुल इंजिन स्कोअरिंगचा वापर करते.…