आयडीएफसी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची संधी

आयडीएफसी म्युच्युअल फंडाने ‘आयडीएफसी एमर्जिंग बिझनेस फंडा'ची घोषणा केली आहे. इक्विटी प्रकारातील ही स्मॉल कॅप योजना आहे. 3 ते 17 फेब्रुवारी दरम्यान योजनेचा एनएफओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 5 हजार रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. ही योजना स्मॉलकॅप संबंधित योजनांमध्ये किमान 65 टक्के व कमाल 100 टक्के तर इतर इक्विटी प्रकारात शून्य टक्के ते 35 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करेल.   सर्वात महत्वाचे म्हणजे किमान 100 रुपये प्रतिमहिना स्वरूपात देखील या योजनेत एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करता येणार आहे.    ‘आयडीएफसी एमर्जिंग बिझनेस फंडासाठी S&P BSE 250 Small Cap TRI बेंचमार्क इंडेक्स आहे. आयडीएफसी एएमसीच्या इक्विटीचे प्रमुख…

पोस्टात बचत खाते आहे?; मग ‘हे’ वाचा!

पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे बचत खाते असेल आणि तुमच्याकडे अजूनही 'मॅग्नेटिक स्ट्रीप'वाले एटीएम कार्ड असेल तर, १ फेब्रुवारीपूर्वी 'ईएमव्ही चिप' असणारे एटीएम कार्ड घेणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. पोस्ट खात्याने ग्राहकांना जानेवारी महिना संपण्यापूर्वी मोबाइल क्रमांकही अपडेट करण्याची सूचना केली आहे. पोस्ट खात्याने जारी केलेल्या निवेदनानुसार जे ग्राहक ३१ जानेवारीपर्यंत आपले जुने एटीएम कार्ड बदलणार नाहीत, त्यांचे कार्ड फेब्रुवारीपासून ब्लॉक करण्यात येणार आहे. मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी किंवा सध्याचे एटीएम कार्ड बदलण्यासाठी पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खातेधारकांना आपापल्या शाखेत जाणे आवश्यक आहे

बर्गर किंग इंडियाच्या आयपीओला सेबीची मंजूरी

बर्गर किंग इंडिया या रेस्टॉरंट साखळीला बाजारात आयपीओ आणण्यासाठी सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची (सेबी) परवानगी मिळाली आहे. बर्गर किंग इंडियाने आयपीओसाठीच्या मसुद्याचे कागदपत्रे नोव्हेंबर महिन्यात सेबीकडे सादर केले होते. 24 जानेवारीला सेबीने काही अंतिम दुरुस्त्या, निरिक्षणे कंपनीकडे पाठवल्या होत्या. सेबीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोणत्याही कंपनीला आयपीओ बाजारात आणण्याआधी सेबीकडून देण्यात येणारी निरिक्षणे महत्त्वाची असतात. त्यात आयपीओबद्दलची माहिती, पब्लिक ऑफरवरील फॉलोअप आणि राईट्स इश्यू इत्यादींचा समावेश असतो. आयपीओच्या मसुद्यानुसार बर्गर किंग 400 कोटी रुपयांचा इक्विटी शेअरचा आयपीओ आणणार आहे. त्याद्वारे कंपनीचे प्रवर्तक 6 कोटी इक्विटी शेअर बाजारात आणणार आहेत. कंपनीच्या विस्तारासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांसाठी कंपनी या भांडवलाचा…

‘आयटीआय स्मॉल कॅप फंड’

आयटीआय म्युच्युअल फंडाने नवा स्मॉल कॅप फंड बाजारात आणला आहे. 'आयटीआय स्मॉल कॅप फंड' असे या नव्या फंडाचे नाव आहे. या फंडाचा एनएफओ आज खुला होत असून 10 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत आहे. नवा फंडाचा बेंचमार्क निफ्टी स्मॉल कॅप 100 टीआरआय हा असणार आहे. या फंडात गुंतवणूक करण्याची किमान रक्कम 5,000 रुपये इतकी आहे. त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत पुढील गुंतवणूक करता येणार आहे.    या फंडाद्वारे 65 टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित गुंतवणूक प्रकारात आणि स्मॉल कॅप प्रकारातील कंपन्यांमध्ये केली जाणार आहे. तर उर्वरितत 35 टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप व्यतिरिक्त कंपन्यांमध्ये, डेट प्रकारात आणि मनी मार्केट प्रकारात केली…

एलआयसीच्या विमा योजनांच्या प्रिमियममध्ये वाढ होण्याची शक्यता

ग्राहकांना अधिक अनुकूल ठरणाऱ्या आणि त्यांच्या गरजांनुरुप विमा योजना बाजारात याव्यात यासाठी आयआरडीएआय प्रयत्नशील आहे. शिवाय ग्राहकांना आमिष दाखवून चुकीच्या पद्धतीने विमा योजना विकल्या जाण्याच्या पद्धतीलाही आयआरडीएआय आळा घालू इच्छिते. त्यामुळे आयआरडीएआयने विमा कंपन्यांना काही नवीन निकष लागू केले आहेत.    त्यामुळेच काही नॉन लिंक्ड विमा योजना, युलिप योजना, तीन नॉन लिंक्ड ग्रुप विमा योजना इत्यादी योजना एलआयसी बंद करते आहे. यामध्ये सिंगल प्रिमियम एन्डोव्हमेंट प्लॅन, न्यू मनी बॅंक-20 वर्षे, न्यू जीवन आनंद, अनमोल जीवन 2, लिमिटेड प्रिमियम एन्डोव्हमेंट प्लॅन, न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन, जीवन लक्ष्य, जीवन तरुण, जीवन लाभ, न्यू जीवन मंगल, भाग्य लक्ष्मी प्लॅन, आधार पिलर, आधार…

नवा ‘अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड’

अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आपला नवा 'अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड' बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड इक्विटी प्रकारातील फंड आहे. ईएसजी प्रकारातील दीर्घकालीन  चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये या फंडाद्वारे गुंतवणूक करण्यात येणार आहे. ईएसजी प्रकारातील कंपन्या म्हणजे एनव्हायर्नमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स घटकांशी संबंधित कंपन्या.    चांगल्या कामगिरीसंदर्भातील इक्विटीतील नेहमीचे निकष आणि उत्तम ईएसजी घटक याआधारे या कंपन्यांची निवड केली जाणार आहे. 'अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंडाचा एनएफओ 22 जानेवारीपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तर 5 फेब्रुवारी ही त्याची अंतिम मुदत असणार आहे. या नव्या फंडाचे व्यवस्थापन अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे इक्विटीचे प्रमुख जिनेश गोपानी आणि फॉरेन सिक्युरिटीजचे फंड व्यवस्थापक हितेश दास करणार…

मिराई अॅसेटचा ‘निफ्टी नेक्स्ट फिफ्टी ईटीएफ

मिराई अॅसेट म्युच्यूअल फंडाने मिराई अॅसेट निफ्टी नेक्स्ट फिफ्टी ईटीएफ हा  नवीन म्युच्यूअल फंड बाजारात आणला आहे. हा मुदतमुक्त फंड असून तो निफ्टी नेक्स्ट फिप्टी टोटल रिटर्न्स इंडेक्स निर्देशांकानुसार गुंतवणूक करणार आहे. हा ईटीएफ प्रकारातील फंड असुन मिराईतर्फे आणलेला दुसरा ईटीएफ फंड आहे. ही योजना येत्या तेरा जानेवारीला गुंतवणूकीसाठी खुली होणार असून 21 जानेवारीला बंद होणार आहे. त्यानंतर 27 जानेवारीपासून नियमित खरेदी-विक्रीसाठी ही योजना गुंतवणूकदारांना पुन्हा खुली होणार आहे. मिराई अॅसेट म्युच्यूअल फंडाने गेल्या दहा वर्षात भारतीय म्युच्यूअल फंड उद्योगात आपला दबदबा निर्माण केला असून 31 डिसेंबर 2019 अखेर फंड तब्बल 41 हजार 887 कोटी रुपयांच्या निधीचे यशस्वीरित्या व्यवस्थापन सांभाळत आहे. फंडाच्या निधीत यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निधी व्यवस्थापनच्या…

बजाज फायनान्सकडून नियोजनबद्ध ठेव योजना

बजाज फिनसव्‍‌र्हची उपकंपनी असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने नियोजनबद्ध बचतीचा पर्याय असलेल्या सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅन अर्थात ‘एसडीपी’ पर्यायाचा परिचय ठेवीदारांना करून दिला आहे. छोटय़ा मासिक बचतींमधून मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांसाठी हा आदर्श पर्याय ठरेल. दरमहा ५,००० रुपये रकमेपासून सुरुवात करत, गुंतवणूकदार प्रत्येक मासिक ठेवीच्या तारखेला त्या ठेवीसाठी लागू असलेल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकतील. आवर्ती ठेव योजनेच्या तुलनेत एसडीपीचे वेगळेपण हेच की, यात ठेवीदारांना बदलत्या व्याजदराचा फायदा मिळेल. शिवाय, ठेव योजनेत जमा रकमेबाबत पुरेशी तरलता, प्रसंगी कर्ज उचलही करता येईल. योजनेसाठी गुंतवणूकदार १२ ते ६० महिन्यांच्या कालावधीची निवड करू शकतील. मासिक ठेवीच्या कालावधीच्या अखेरीस गुंतवणूक रक्कम आणि त्यावरील व्याजाचा समावेश असलेली…

एसबीआयची नवी कर्ज योजना

ठरलेल्या मुदतीत बांधकाम व्यावसायिकाकडून प्रकल्प पूर्ण न झाल्यास ग्राहकाला मुद्दल (प्रिन्सिपल) परत मिळणारी योजना स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सादर केली आहे. जे ग्राहक एसबीआयकडून गृहकर्ज घेतील त्यांना ही योजना लागू असेल. ज्या अपार्टमेंट प्रकल्पात एसबीआय एकमेव कर्जदार बँक असेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मरगळलेल्या बांधकाम क्षेत्राला उत्साहित करण्यासाठी तसेच ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ही योजना आणली असल्याचे एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला कुठलेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. कर्ज घेताना सर्वसामान्य ग्राहकाला जो व्याजदर लागू असेल त्याच व्याजदरात ही योजना देखील असणार आहे. मात्र यासाठी विकासकाला आपला…

‘SIP’ तून रेकाॅर्डब्रेक

डिसेंबरमध्ये नियोजनबद्ध गुंतवणूक योजनांमधून (SIP) तब्बल ८५१८ कोटींची गुंतवणूक झाली आहे. 'SIP'मधून एका महिन्यातील आजवरची सर्वाधिक गुंतवणूक आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना असलेल्या असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये 'SIP'मधून ८५१८.४७ कोटींची गुंतवणूक झाली. यात नोव्हेंबरच्या तुलनेत २४५ कोटींची वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये 'SIP'मधून ८२७२ कोटींची गुंतवणूक झाली होती. हा ओघ वाढल्याने 'SIP'मधील एकूण मालमत्ता ३.७१ लाख कोटींवर गेली आहे. २ कोटी ९७ लाख 'SIP' गुंतवणूकदार आहेत. 'SIP'मधील गुंतवणूक वाढत असली तरी इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक डिसेंबरमध्ये ७८ टक्क्यांनी कमी झाली. गुंतवणूकदारांनी १३११ कोटी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवले.

End of content

No more pages to load