ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना

प्रामुख्याने मुदत ठेवीच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर अवलंबुन असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून देशातील आघाडीच्या बँका एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना आणल्या आहेत. या योजनांचा थोडक्यात घेतलेला आढावा:   एसबीआयची 'वी केअर' योजना एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार ही योजना सर्वसामान्यांना लागू असलेल्या व्याज दरापेक्षा 0.8 टक्क्यांनी अधिक व्याज देणार आहे. म्हणजेच सर्वसामान्यांना मिळणाऱ्या 5.7 टक्क्यांऐवजी ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर  6.5 टक्के व्याज मिळेल. तसेच जर पॉलिसी मॅच्युअर होण्याअगोदर एफडीतील गुंतवणूक काढून घ्यायची असेल तर 6.5 टक्क्यांऐवजी 6.2 टक्के इतकेच अधिकचे व्याज मिळणार आहे. वी केअर योजनेत कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम…

जुलैमध्ये येणार ‘भारत बाँड ईटीएफ’

भारत बाँड ईटीएफच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मालिका येत्या जुलै महिन्यात सादर करण्यात येणार असल्याचे एडलविस अॅसेट मॅनेजमेंटतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या माध्यमातून १४,००० कोटी रुपये खुल्या बाजारातून मिळविण्याची योजना आहे. या दोन मालिकांची मुदत एप्रिल २०२५ आणि एप्रिल २०३१मध्ये संपणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून बाजारातून येणाऱ्या मागणीच्या आधारावर ११,००० कोटी रुपये अतिरिक्त जमा करण्याचे उद्दिष्ट निर्धारित आहे. या माध्यमातून गोळा करण्यात येणारी रक्कम ३००० कोटी रुपये असणार आहे. मात्र, गुंतवणूकदारांकडून अधिक मागणी आल्यास एकूण रक्कम १४,००० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. फंड्स ऑफ फंडही येणार एडलविस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदारांना विविधा वेळी…

आयसीआयसीआय बँके—ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना

आयसीआयसीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) योजना सुरू केल्याचे आज जाहीर केले आहे. ‘आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स एफडी’ असे नाव असणारी ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या आणि पाच वर्षांहून अधिक ते 10 वर्षे या कालावधीच्या ठेवींवर दरवर्षी 6.55% व्याजदर देणार आहे. मे 20 ते सप्टेंबर 30, 2020 या कालावधीमध्ये उपलब्ध असणारी ‘आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स एफडी’ संबंधित कालावधीसाठी व संबंधित रकमेसाठी सर्वसाधारण लोकांना (ज्येष्ठ नागरिक नसणारे) लागू असणाऱ्या व्याजदरापेक्षा 80 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) अधिक देणार आहे. तसेच, बँकेने आधी जाहीर केलेल्या व्याजदरापेक्षा हा दर 30 बीपीएस अधिक आहे. निवासी ज्येष्ठ नागरिकांना नव्या एफडींसाठी व एफडींच्या नूतनाकरणासाठी या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. आयसीआयसीआय बँकेचे लाएबिलिटीज ग्रुपचे हेड प्रणव मिश्रा यांनी या उपक्रमाविषयी बोलताना सांगितले, “आयसीआयसीआय बँकेमध्ये…

प्रधानमंत्री वय वंदना योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ

ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन देणाऱ्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेला (पीएमव्हीव्हीवाय) केंद्र सरकारने तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा कालावधी आता 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याआधी ही योजना 31 मार्च 2020 पर्यंतच सुरु होती.   काय आहे योजना? ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 60 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी केंद्र सरकारची ही पेंशन योजना असून योजनेचा लाभ एकत्र रक्कम भरल्यानंतर घेतला जाऊ शकतो. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) माध्यमातून योजनेची अमलबजावणी केली जाते. शिवाय प्रमुख बँकांमध्ये ही योजना उपलब्ध आहे.   सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेवर निश्चित व्याजदराचा परतावा मिळत मात्र आता व्याजदर फ्लोटिंग स्वरूपाचे असेल. आर्थिक वर्ष 2020-21 साठी…

कर्जदारांना दिलासा ?

देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे. परिणामी अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात अडकली आहे. सर्व उद्योग व्यवसाय ठप्प असल्याने उत्पन्न घटले आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.   लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देण्याचे बँकांना निर्देश दिले होते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात बँकांनी कर्जाचा हप्ता स्थगित केला होता. मात्र अजूनही लॉकडाउनमध्ये वाढ होत असल्याने बँक ग्राहकांच्या कर्जाचे हप्ते स्थगितीचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. आणखी तीन महिने ईएमआय स्थगित होण्याची शक्यता 'एसबीआय'ने अहवालात व्यक्त केली आहे.

कॅनरा बँकेची सुवर्ण कर्ज योजना सुरू

कॅनरा बँकेने सध्याच्या आव्हानात्मक स्थिती आणि अनिश्चिततेवर मात करण्यासाठी व्यावसायिकांसाठी विशेष सुवर्णकर्ज योजना सुरू केली आहे. ग्राहकांना कमी व्याजदरात जलदरीत्या आणि सोप्या पध्दतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा बँकेने सुरू केली आहे. या कर्जामुळे ग्राहकांची खेळत्या भांडवलाची गरज भागवली जाऊन त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता आवश्यक रक्कम मिळणार आहे. बँकेने ३० जूनपर्यंत विशेष सुवर्णकर्ज मोहीम सुरू केली असून याकरता ७.८५ टक्के वार्षिक व्याजदर आकारण्यात येणार आहे.

टीडीएसआणि टीसीएसमध्ये कपात

उगम करात (टीडीएस) आणि टीसीएसमध्ये कपात करण्यात आली असून ही कपात गुरुवारपासून लागू करण्यात आली आहे. ही करकपात ३१ मार्च २०२१पर्यंत लागू असणार आहे. एकूण २३ करपात्र गोष्टींवरील टीडीएस कमी करण्यात आला आहे. टीडीएस व टीसीएसमध्ये कपात केल्यामुळे करदात्यांच्या हातात सुमारे ५० हजार कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. तेंदूच्या पानांची विक्री, भंगाराची विक्री, लाकूडविक्री, जंगलातील उत्पादनांची विक्री तसेच दगडी कोळसा, लिग्नाइट किंला लोह यांची विक्री यांवर लागू होण्याऱ्या टीसीएसमध्येही कपात करण्यात आली आहे. मात्र पॅन व आधार क्रमांक सादर करू न शकलेल्या करदात्यांसाठी टीडीएस व टीसीएसमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. टीडीएस व टीसीएल कमी करण्यामागे केंद्र सरकरचा उद्देश करदात्यांच्या…

फ्रँकलिन टेम्पल्टन करणार निधी परत

फ्रँकलिन टेम्पल्टन इंडियाने आपल्या तीन लाख गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत देण्यासाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. या गुंतवणूकदारांची रक्कम बंद झालेल्या सहा डेट फंडांमध्ये अडकली होती. गेल्या आठवड्यात सेबीने कंपनीला दिलेल्या इशाऱ्यानंतर ही पावले उचलण्यात आली आहेत.

आर्थिक पॅकेजमधील प्रमुख घोषणा 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील प्रमुख घोषणा     प्राप्तिकर   - प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ   - टॅक्स ऑडिट करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविली भविष्य निर्वाह निधी   - प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे 12 टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे 12 टक्क्याचा भार सरकार उचलणार   -मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरकार पीएफ भरणार आहे. त्यात आणखी तीन महिन्यांनी वाढ. आता  जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पीएफचा भार सरकार उचलणार   -उद्योगांना 2500 कोटी रुपयांचा फायदा होणार   - 3.67 लाख कंपन्यांना थेट फायदा मिळणार   - कंपन्यांमधील 72.22…

आयसीआयसीआय लोम्बार्ड

सर्वसाधारण विमा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात थेट प्रिमीयमचे ढोबळ उत्पन्न 133 अब्ज 13 कोटी रुपये एवढे नोंदविले आहे. तर करोत्तर नफा 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 13.8 टक्क्यांनी वाढून 10 अब्ज 49 कोटींवरुन 11 अब्ज 94 कोटी रुपयांवर झेपावला आहे.   करोनाचे संकट तसेच अर्थव्यवस्थेपुढे असलेल्या अनेक आव्हानांमुळे  थेट प्रिमीयमच्या ढोबळ उत्पन्नात गेल्या वर्षाच्या तुलनेत 8.1 टक्के घट झाली आहे. 2019 मध्ये हेच उत्पन्न 144 अब्ज 88 कोटी रुपये एवढे होते. परंतु पीकविमा क्षेत्र वगळल्यास याच उत्पन्नात 2019 च्या तुलनेत तब्बल 10.5 टक्के वाढ झाली आहे. हे उत्पन्न 120 अब्ज…

End of content

No more pages to load