इंडसइंड बँकेचे ‘कोटक’कडून अधिग्रहण?

कोटक महिंद्रा बँकेचे प्रवर्तक आणि सर्वात मोठे भागधारक उदय कोटक हे इंडसइंड बँकेच्या प्रवर्तकांचा हिस्सा खरेदी करण्याच्या प्रयत्नांत असून, उभयतांमध्ये या संदर्भात वाटाघाटीही सुरू झाल्या असल्याचे वृत्त आहे. खासगी क्षेत्रातील नव्या पिढीच्या या बँकांचे एकत्रीकरण ही भारतीय बँकिंग क्षेत्रातील एक लक्षणीय घटना ठरेल, शिवाय कोटक महिंद्र बँकेच्या किरकोळ बँकिंगमध्ये स्थान वृद्धिंगत करण्यास ते उपकारक ठरेल. इंडसइंड बँकेचे प्रवर्तक हिंदुजा बंधू आणि उदय कोटक यांच्यात प्राथमिक बोलणी झाली असून दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या, असे वृत्तसंस्थेने या बैठकीला उपस्थित सूत्रांच्या हवाल्याने स्पष्ट केले आहे.

‘आयटी रिटर्न’बाबत सरकारने घेतला हा निर्णय

आर्थिक वर्ष २०१९-२० ची उत्पन्नविषयक कायदगपत्रांची जुळवाजुळव करणाऱ्या करदात्यांना आज सरकारने सुखद धक्का दिला. २०१९-२० या वर्षाचा आयटी रिटर्न सादर करण्यासाठी सरकारने आणखी एक महिन्याने मुदत वाढवली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत करदाते आपला रिटर्न फाईल करू शकतील, असे अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न सादर करणाची अंतिम मुदत दोन वेळा वाढवण्यात आली आहे. याआधी दरवर्षीप्रमाणे ३१ जुलै २०२० होती. मात्र करोना प्रकोप आणि टाळेबंदी यामुळे केंद्र सरकारने याला पहिल्यांदा मुदतवाढ दिली. ही मुदत ३१ जुलैवरून वाढवून ती ३० नोव्हेंबर २०२० करण्यात आली आहे. त्याला आज पुन्हा एकदा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत २०१९-२० या वर्षाचा आयटी…

शेअर बाजारात सहा महिन्यांत तब्बल ६३ लाख गुंतवणूकदार

करोनाकाळात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून कमाई करण्यावर आणि गुंतवणूक वाढवण्यावर भर दिल्याचे असून आले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक डीमॅट खाती उघडण्यात आली आहेत. भांडवल बाजार नियामक सेबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) ६३ लाख नवी डीमॅट खाती उघडण्यात आली आहेत. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत २७.४ लाख नवी डीमॅट खाती उघडण्यात आली. याचा अर्थ डीमॅट खाती उघडण्याच्या संख्येत यंदा १३० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२० या कालावधीत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजारांमध्ये ११ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. जगभरातील अन्य अर्थव्यवस्थांमध्ये याच कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी…

‘एसबीआय’ची गृहकर्जावर सवलत

सणांनिमित्त नुकत्याच जाहीर केलेल्या इतर ऑफर्सबरोबरच एसबीआयने देशभरात ३० लाख ते २ कोटीपर्यंतच्या गृह कजासाठी ग्राहकांना आधीच्या ०.१० टकक्यांऐवजी ०.२० टक्के सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरनुसार ही सवलत दिली जाणार आहे. आठ मेट्रो शहरांतील गृह कर्ज ग्राहकांना हीच सवलत तीन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज रकमेवर दिली जाणार आहे. योनोच्या माध्यमातून अर्ज केल्यास सर्व गृह कर्जांसाठी ०.५ टक्क्याची अतिरिक्त सवलत दिली जाईल.

‘एमसीएक्स’ने सुरु केली ही सुविधा

भारतातील कमॉडिटी डेरिव्हेटिव्हजमधील सर्वात मोठा बाजारमंच असलेल्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (एमसीएक्स) कडून आज देशातील पहिल्यावहिल्या व्यवहार करण्यायोग्य रिअल-टाइम बेस मेटल इंडेक्सवर म्हणजेच एमसीएक्स आयकॉमडेक्स बेस मेटलवर (मेटलडेक्स) वायदा व्यवहार खुले करण्यात आले. एक्सचेंजने मेटलडेक्सवर नोव्हेंबर २०२०, डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ या कालावधीत मुदतपूर्ती होणाऱ्या फ्युचर्स अर्थात वायदे सौद्यांना सुरुवात केली. कमीतकमी सलग तीन महिन्यांसाठी कॉन्टंसाठी कॉन्ट्रॅक्ट्स यात सर्व वेळी उपलब्ध असतील. या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टचे आकारमान हे एमसीएक्स आयकॉमडेक्स बेस मेटल्स इंडेक्सच्या ५० एककांची बरोबरी साधेल. तर कॉन्ट्रॅक्टसाठी टिक साइझ (किमानतम किंमत हालचाल) ही १ रुपया असेल. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टची मुदत संपल्यानंतर रोख रकमेवर त्यांचा निपटारा (सेटलमेंट) केला…

Equitas Small Finance Bank Ltd या कंपनीचा IPO

Equitas Small Finance Bank Ltd या कंपनीचा IPO येत्या २०/१०/२०२० रोजी येत असून दि २२/१०/२०२० पर्यंत हा खरेदीसाठी उपलब्ध आहे.याचा किमंत पट्टा रुपये ३३.०० प्रती समभाग असून ४५०.०० प्रती समभागाचा १ लॉट खरेदी करणे बंधनकारक आहे.या IPO द्वारे ही कंपनी ५१८ कोटीचे भाग भांडवल उभे करणार आहे. Equitas ही कंपनी बँकिग क्षेत्रातील सुक्ष्म आणि लघु कर्जदारांना पत पुरवठा करणारी बँक असून या बॅंकेतर्फे गृह कर्ज,वाहन कर्ज आणि MSE यांना मुख्यत्वे कर्ज पुरवठा करण्यात येतो.या बँकेच्या देशभरात ८५३ शाखा असून ३२२ outlets आहेत.तसेच देशभरात ३२२ ATM द्वारे या बँकेतर्फे व्यवहार करता येतो. हा IPO खरेदी करण्यासाठी Demate खाते असणे बंधनकारक असून…

विप्रोकडूनही ‘बायबॅक’

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी ‘टीसीएस’च्या पाठोपाठ विप्रोनेही मंगळवारी भागधारकांना खूश करणारी ९,५०० कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदीची (बायबॅक) योजना जाहीर केली. या योजनेतून भागधारकांच्या हाती असलेले २३.७५ कोटी समभागांची प्रत्येकी ४०० रुपये किमतीला पुनर्खरदी केली जाणार आहे. कंपनीच्या मिळकतीतून भागधारकांना निरंतर लाभ मिळवून देण्याच्या तत्त्वाला अनुसरून समभाग पुनर्खरेदीची ही घोषणा असल्याचे विप्रोचे मुख्य वित्तीय अधिकारी जतीन दलाल यांनी मंगळवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना सांगितले. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीच्या बिगर लेखापरीक्षित वित्तीय कामगिरीही संचालक मंडळाने विचारात घेतली. या सहामाहीत कंपनीचा नक्त रोकड प्रवाह हा निव्वळ उत्पन्नाच्या १६०.७ टक्के असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विप्रोकडून निर्धारित ४०० रुपये ही पुनर्खरेदी किंमत,…

मिरे एसेट अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड

गुंतवणूकदारांसाठी मिरे एसेट अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड हा नवीन मुदत मुक्त श्रेणीतील (ओपन एंडेड) फंड बाजारात आणला आहे. अवघ्या तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ( मॅकॉले ड्युरेशन) गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना डोळ्यासमोर ठेवत हा फंड आणण्यात आला आहे. नवीन फंड गुंतवणुकीसाठी खुला झाला असुन येत्या ६ ऑक्टोबरला बंद होणार आहे. प्रामुख्याने तीन ते सहा महिन्यांचा कालावधी असलेल्या रोखे आणि चलन बाजारातील साधनांमध्ये गुंतवणूक करत परतावा मिळविण्याचे मिरेच्या या नवीन फंडांचे उद्दीष्ट आहे. मुदतमुक्त श्रेणीतील ही डेट योजना आपला १०० टक्के निधी हा अल्प ते मध्यम जोखीम असलेल्या रोखे आणि चलन बाजारातील साधनांमध्ये गुंतविताना ट्रीपल अथवा ए प्लस श्रेणी लाभलेल्या उच्च…

प्रिन्सिपल म्युच्युअल फंडांचा ‘प्रिन्सिपल लार्जकॅप फंड’चा NFO घ्यावा

भारतीय गुंतवणूकदारांचा आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करण्याचा कल वाढत असल्याने अनेक फंड घराणी अशा प्रकारचे फंड भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देत आहेत. वार्षिक ६ ते ७ टक्के दराने वाढण्याची शक्यता असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेतील निवडक समभागांबरोबरीनेच, आकाराने जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठय़ा कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या फंडाची प्राथमिक विक्री २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. प्रिन्सिपल म्युच्युअल फंडांचा ‘प्रिन्सिपल लार्जकॅप फंडा’ची प्राथमिक विक्री त्यापैकीच एक. हा फंड एकूण मालमत्तेच्या कमाल ८५ टक्के मालमत्ता भारतात सूचिबद्ध असलेल्या लार्जकॅप कंपन्यांत, तर कमाल १५ टक्के गुंतवणूक अमेरिकेत सूचिबद्ध असलेल्या लार्जकॅप कंपन्यांत करणार असल्याचे ‘सेबी’कडे दाखल केलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले…

या बँका देत आहेत ७ टक्के व्याज

सध्या प्रमुख बँकांचा विचार केला तर भारतीय स्टेट बँकेचा ठेवीदर ५.४ टक्के आहे. तर एचडीएफसी बँकेचा ठेवीदर ५.५ टक्के आहे. याच बरोबरीने आयसीआयसीआय बँक ठेवीवर व्याज देत आहे. करोना संकटात देखील या दोन बँका मुदत ठेवींवर ७ टक्के व्याज देत आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना या बँकांमध्ये ठेवींवर ७.५ टक्के व्याज मिळत आहे. इंडसइंड बँकेकडून ठेवीवर ७ टक्के व्याज देण्यात येत आहे. १ ते ३ वर्ष मुदतीच्या ठेवींसाठी ७ टक्के व्याजदर आहे. तर ३ वर्षांहून अधिक आणि १० वर्ष मुदतीपर्यंत ठेवीदारांना ६.७५ टक्के व्याज मिळणार आहे. खासगी क्षेत्रातील आणखी एक बँक असलेल्या येस बँकेनं देखील ठेवींवर ७ टक्के व्याजदर ऑफर केला…

End of content

No more pages to load