जवळपास १५ आयपीओ बाजारात दाखल होणार!!!!!

करोना संकटअसताना देखील २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत जोखीम घेणाऱ्या कंपन्यांनी आयपीओतून हजारो कोटींचे भांडवल उभारून दाखवले. त्यातून धडा घेत जवळपास डझनभर कंपन्यांनी प्राथमिक बाजारात नशीब आजमावण्याची तयारी केली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १५ आयपीओ भांडवली बाजारात धडकण्याच्या तयारीत आहेत. यातील किमान सहा आयपीओ जानेवारी महिन्यात बाजारात दाखल होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची संधी चालून येणार आहे. या वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन , कल्याण ज्वेलर्स, SSFB, ESAF स्मॉल फायनान्स बँक, इंडिगो पेंट्स, ब्रुकफिल्ड RIET, Barbeque Nation आणि रेलटेल या कंपन्या आयपीओ आणणार आहेत. जानेवारीत इंडिगो पेंट्स, होम फर्स्ट फायनान्स कंपनी, आयआरएफसी, ब्रुकफिल्ड RIET तसेच रेलटेल या कंपन्यांचे आयपीओ…

‘पॉझिटिव्ह पे’ यंत्रणा स्टेट बँकेत कार्यान्वित

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने चेकच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी positive pay यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सर्व धनादेश ‘पॉझिटिव्ह पे’मार्फतच जारी होणार आहेत. याशिवाय ग्राहकांना धनादेश काढताना तो कुणाच्या नावे आहे, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. चेक देणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या व्यक्तीची माहिती पडताळून पाहिल्यानंतरच तो वटणार आहे. ‘पॉझिटिव्ह पे’च्या माध्यमातून चेक क्लिअरिंगला जाण्यापूर्वी त्याचा क्रमांक, चेक जारी करण्यात आल्याची तारीख, चेक देणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, रकमेसह अन्य तपशील बँकेतर्फे पुन्हा तपासण्यात येणार आहेत. चेक जारी करणाऱ्याला ज्याच्या नावे चेक देण्यात येणार आहे, त्याची सर्व माहिती द्यावी लागणार आहे. दोघांची…

अल्पबचत योजनांचे व्याजदर स्थिर

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) तसेच अन्य अल्पबचत व पोस्टाच्या योजनांचे व्याजदर जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत आहे त्याच पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी जाहीर केला. आगामी तिमाहीत पीपीएफ आणि एनएससीमधील गुंतवणूकदारांना अनुक्रमे ७.१ टक्के आणि ६.८ टक्के दसादशे या दराने व्याज मिळेल. त्याचप्रमाणे पाच वर्षे मुदतीच्या ज्येष्ठ नागरीक ठेव योजनेवर वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज दर दिला जाईल. या योजनेत ज्येष्ठ नागरीक ठेवीदारांना व्याज मात्र दर तिमाहीला दिला जातो. सुकन्या समृद्धी योजना (७.६ टक्के), किसान विकास पत्र (६.९ टक्के), तर पोस्टाच्या पाच वर्षे मुदतीच्या आवर्ती ठेवींवर ५.८ टक्के दराने व्याज लाभ मिळेल.

२०२१ साठी हे समभाग घ्या —

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मिडकॅप शेअर विभागाचे उपाध्यक्ष अमरजीत मौर्य यांनी खालील शेअरबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. १) हॉकिन्स कूकर्स सीएमपी : ५,८२० अपसाइड-१५ टक्के २) स्वराज इंजिन्स सीएमपी : १,४०८ अपसाइड- २५ टक्के ३) व्हर्लपूल ऑफ इंडिया सीएमपी : २,५५६ अपसाइड- २२ टक्के ४) रॅडिको खेतान सीएमपी : ४५० रुपये अपसाइड- २० टक्के ५) पेज इंडस्ट्रीज सीएमपी: २७,५२५ रुपये. अपसाइड- २० टक्के

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल—नवीन म्युच्यूअल फंड

आयसीआय़सीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त प्रकारातील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल हा नवीन म्युच्यूअल फंड गुंतवणुकीसाठी बाजारात आणला आहे. समभाग तसेच त्याच्याशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करत दीर्घ कालावधीसाठी संपत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आलेला आहे. व्यापार चक्राआधारे विविध क्षेत्रात तसेच समभागांमध्ये या फंडातील निधीची गुंतवणूक केली जाणार आहे. शेअरबाजारातून मिळणारा परतावा सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेतील विविध व्यापार चक्र प्रभावित करत असतात. पारंपारिक व्यापार चक्रात वाढ, मंदी, घसरण आणि फेरवाढ हे चार टप्पे आढळतात. प्रत्येक टप्पा हा इतरांपेक्षा वेगळा असतो. अर्थव्यवस्थेतील हे प्रमुख टप्पे ओळखुन तसेच त्याच्या विश्लेषणाआधारे स्वीकारलेला गुंतवणूकीचा पर्याय हा सकारात्मक गुंतवणूकीचा अनुभव देण्यास मदत करु शकतो. बाजारात प्रसंगानुरुप…

‘हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड’–निधी काढून घेण्याचा सल्ला

देशातील दुसरी मोठी म्युच्युअल फंड व्यवस्थापन करणारी कंपनी असलेल्या एचडीएफसी म्युच्युअल फंडाने 'हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड' या योजनेची श्रेणी बदलली आहे. 'हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड' सिरीज-१ची श्रेणी क्लोज एंडेड वरून ओपन एंडेडमध्ये बदलली आहे. या योजनेची महिनाभरात मुदतपूर्तता होणार आहे. त्यापूर्वीच असा बदल करण्यात आल्याने गुंतवणूकदारांना निधी काढून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 'हाऊसिंग अपॉर्च्युनिटीज फंड'ची कामगिरी सुमार ठरली आहे. या योजनेत ३०८८ कोटी रुपये आहेत. दरम्यान या योजनेला ओपन एंडेड योजनेच्या श्रेणीत बदल केल्याने ही योजना लॉक इन पिरियडशिवाय निरंतर सुरु राहील आणि त्यात गुंतवणूकदार पैसे गुंतवतील, असे कंपनीचे मत आहे. मात्र या योजनेची आतापर्यंतची कामगिरी बघितली तर ती सुमार ठरली…

नव्याने आलेले NFO

नव्याने आलेले NFO खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास SHAREKHAN सावंतवाडी शाखेमध्ये सम्पर्क करा. सम्पर्क नंबर 9422429103 UTI Small Cap Fund (D) Opening Date 02/12/2020 Closing Date 16/12/202 UTI Small Cap Fund (G) Opening Date 02/12/2020 Closing Date 16/12/202 Aditya Birla Sun Life ESG Fund (D) Openin Date 04/12/2020 Closing Date 18/12/2020 Aditya Birla Sun Life ESG Fund (G) Opening Date 04/12/2020 Closing date 18/12/2020 Axis Special Situations Fund (D) Opening date 04/12/2020 Closing date 18/12/2020 Axis Special Situations Fund (G) Opening date 04/12/2020 Closing date 18/12/2020 Invesco India-Invesco Global Consumer Trends FoF (D) Opening date 04/12/2020 Closing date 18/12/2020…

लाभांश वाटपास मनाई ; फेडरेशन करणार ‘आरबीआय’कडे विनंती

करोना संकट लक्षात घेता यंदा बँकांनी लाभांश वाटप न करत स्वनिधी आणि ताळेबंद सक्षम करावा, असे निर्देश रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरण जाहीर करताना दिले. या निर्देशांमुळे बँकांमधील कोट्यवधी सभासदांना यंदा लाभांश उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. याचा मोठा फटका सहकार बँकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्देशांमधून सहकारी बँकांना वगळण्याचा आग्रही विनंती सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर संघटनेनेकडून केली जाणार आहे.

पोस्टात किमान शिल्लक ठेवली नाही दंड

पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या ११ डिसेंबरपासून पोस्टाच्या बचत खात्यात किमान ५०० रुपयांची शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक होणार आहे. तसे न केल्यास त्यावर १०० रुपयांची अकाउंट मेंटेनन्स चार्ज (शुल्क) वसूल केले जाणार आहे.

इन्व्हेस्कोचा नवा फंड; ई-कॉमर्स आणि कन्झ्युमर ट्रेंड कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी —

ईकॉमर्स तसेच ग्लोबल कन्झ्युमर ट्रेंड कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणुकीकरिता इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाने ग्लोबल कन्झ्युमर ट्रेंड्स फंड ऑफ फंड लॉन्च केला आहे. हा फंड ४ डिसेंबर रोजी खुला होत असून १८ डिसेंबर रोजी बंद होईल. या योजनेत गुंतवणूकदारांना किमान १००० रुपयांची गुंतवणूक करता येईल. गेमिंग, ऑनलाइन, ई-कॉमर्स, करमणूक, इंटरनेट सेवा यासारख्या कंपन्या जगभरातील लोकांच्या दारात पोहोचल्या आहेत. यात अमेझॉन, नेटफ्लिक्स, उबर यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व तंत्रज्ञान कंपन्या असून ग्राहकांना अधिक डिजिटल बनवित आहेत.कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ही एक ओपन एंडेड फंड ऑफ फंड योजना आहे जी इन्व्हेस्को ग्लोबल कन्झ्युमर ट्रेंड्स फंडमध्ये गुंतवणूक करेल. हा फंड आपल्या…

End of content

No more pages to load