SBI चा निवृत्ती नियोजनासाठीचा Mutual Fund पहा.
आपल्या मराठी भाषिकांमध्ये व्यावसायिक असो किंवा नोकरदार असो बचत करण्याची सवय ही अंगी बाणलेली असते.पण बचतीचे रुपांतर *गुंतणूकीत करून त्याद्वारे आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा कल * अनेकाकडे नसतो. वयाच्या ६० ते ६५ नंतर आपली निवृत्ती आणि ४५ ते ५० आसपास आपल्या मुलांचे उच्चशिक्षण व विवाह या जबाबदा-या कोणालाच टाळता येणा-या नसतात. त्यादृष्टीने Mutual फंडामधील दीर्घकालीन SIP ही आपली उद्दीष्टे गाठण्यास अत्यंत महत्वाचे साधन असू शकते.SBI Mutual Fund तर्फे निवृत्ती नियोजन संदर्भात एक चांगला Mutual Fund सुरू करण्यात आला असून त्याचा NFO ३ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद होणार आहे.त्यानंतर आठवड्याभरात त्यामध्ये आपण केव्हाही SIP द्वारे गुंतवणूक करून आपले निवृत्ती नियोजन…