पायाभूत प्रकल्पासाठी लवकरच ‘विकास वित्तसंस्था’– infra bank !!

देशातील मोठ्या गुंतवणुकीच्या दीर्घकालीन पायाभूत प्रकल्पांना अर्थसाहाय्य करण्यासाठी नवीन वित्तसंस्था स्थापण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला. यंदाच्या अर्थसंकल्पातून प्रस्तावित करण्यात आलेल्या आणि भागभांडवल म्हणून २०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली ‘विकास वित्तसंस्था’ स्थापित करण्याच्या विधेयकालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सलग काही वर्षे निधीचा पुरवठा करावा लागतो, त्यासाठी दीर्घ मुदतीची कर्जेही उपलब्ध करून द्यावी लागतात. ही जोखीम उचलण्याची आर्थिक ताकद असलेल्या वित्तीय संस्थेची गरज यंदाच्या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली होती. मोठी वित्तीय जोखीम घेऊ शकेल अशी वित्तीय संस्था सध्या देशात अस्तित्वात नसल्याने नवीन ‘विकास वित्तसंस्था’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची घोषणा अर्थसंकल्पातून केली गेली. त्यासाठी विधेयक हे…

मॅक्स लाइफची सहजसोपी टर्म इन्शुरन्स योजना

मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीने आज 'मॅक्स लाइफ सरल जीवन बिमा' सादर करत असल्याची घोषणा केली. समजण्यास अतिशय सोप्या आणि साध्या अशा वैशिष्ट्यांसह ग्राहकांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक प्युअर-रिस्क प्रीमिअम जीवन विमा योजना आहे. मॅक्स लाइफच्या सरल जीवन बिमा योजनेत १८ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींसाठी किमान पाच लाखांचा आणि कमाल २५ लाखांचा विमा ५ ते ४० वर्षांच्या कालावधीसाठी काढता येतो. 'मॅक्स लाइफ सरल जीवन बिमा'मध्ये ग्राहकांना रेग्युलर पे, सिंगल पे आणि लिमिटेड पे (५ आणि १० वर्षांचा पर्याय) अशा प्रीमिअमच्या कालावधीचे पर्याय आहेत. तसेच, वार्षिक, सहामाही किंवा मासिक असे प्रीमिअम…

क्राफ्ट्समन ऑटोमेशनची समभाग विक्री योजना

क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेडने IPO योजना जाहीर केली आहे. हा इश्यू १५ मार्च रोजी खुला होणार असून १७ मार्च २०२१ रोजी बंद होईल. यासाठी प्रती शेअर १४८८ ते १४९० रुपये इतका किंमत पट्टा निर्धारित करण्यात आला आहे. या योजनेत किमान १० शेअरसाठी गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये कंपनीच्या एकूण १५० कोटींचा फ्रेश इश्यू असून एकूण ४५२१४५० पर्यंतच्या इक्विटी शेअरच्या विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश आहे. या ऑफरमध्ये किमान १० इक्विटी शेअर्सच्या एकगठ्ठा खरेदीसाठी व त्यानंतर १० च्या पटीत इक्विटी शेअर्स विकत घेण्यासाठी बोली लावता येईल.

अनुपम रसायन इंडियाची समभाग विक्री योजना

सुरत येथील कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत असलेली अनुपम रसायन इंडिया लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री करुन निधी उभारणीचा निर्णय घेतला आहे. ही योजना १२ मार्च २०२१ पासून खुली होणार असून १६ मार्च २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. या योजनेत प्रती शेअर ५५३ रुपये ते ५५५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. आयपीओतून ७६० कोटी उभारले जाणार आहेत. कंपनीचा शेअर बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”)वर सूचीबद्ध होणार आहे. अनुपम रसायन ही एक अग्रगण्य कंपनी असून ती भारतात कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत आहे. फ्रॉस्ट अँड सुल्लीवन निर्मित आणि…

पीएसयू बॉण्ड्समध्ये गुंतवणुकीची संधी– एडेलवाईस असेट मॅनेजमेंटची नवी गुंतवणूक योजना

भारतातील वेगाने वाढणाऱ्या एएमसीपैकी एक असलेल्या एडेलवाईस असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आज एडेलवाईस nifty psu bond-२०२६ ची घोषणा केली. अशा प्रकारचा हा पहिला निर्देशांक फंड आहे जो निष्क्रीयपणे व्यवस्थापित असेल आणि एएए मुल्यांकित (AAA Rated) पीएसयू बॉण्ड्स आणि स्टेट डेव्हलोपमेंट लोन्स (एसडीएल) मध्ये गुंतवणूक करेल. या योजनेत ५००० रुपयांपासून गुंतवणूक करता येईल. या फंडची मुदतपूर्तता ३० एप्रिल २०२६ असेल. परिपक्वतेनंतर गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे उत्पन्न परत मिळेल. गुंतवणूकदारांना परताव्याची स्थिरता आणि दृश्यता मिळावी यासाठी फंड परिपक्वतेपर्यंत बॉण्ड्स मध्ये निवेशीत राहण्याचे लक्ष्य ठेवेल. इंडेक्सएशन नंतर २० टक्के दराने कर आकारला जात असल्याने, हा निधी पारंपारिक निवेशाच्या मार्गांच्या तुलनेत अधिक कर-कार्यक्षम असेल,

her circle

To mark International Women’s Day 2021, Reliance Foundation Chairperson Nita Mukesh Ambani has launched ‘Her Circle’, a dedicated content, social media, and digital platform for women. The digital networking platform aims at empowering women and strengthen the bonds of sisterhood globally by providing them a safe space to interact, engage, collaborate, and build each other. Her Circle is envisioned to be a worldwide digital collective of women. While it will begin with Indian women, it will be open to participation of women from across the globe.

योनो–सुपर सेव्हिंग डेज

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या कर्जपुरवठादार बँकेने ‘योनो सुपर सेव्हिंग डेज’ या खरेदी महोत्सवाचे दुसरे पर्व जाहीर केले आहे. हा चार दिवसीय महोत्सव ४ मार्च रोजी सुरू होत असून ७ मार्च रोजी त्याची सांगता होणार आहे. या खरेदी महोत्सवामधे एसबीआयचा बँकिंग आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म योनोच्या युजर्सना आकर्षक सवलती आणि कॅशबॅक मिळणार आहे.

सर्वात कमी कर्जदर

अनलॉकनंतर अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असून सर्वच क्षेत्रात सध्या तेजी दिसून आली आहे. त्यामुळे बँकांनी ही संधी साधून जास्तीत जास्त कर्ज वितरणाचे नियोजन केले आहे. 'एसबीआय'नंतर आता खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने कर्जाचा दर कमी करून तो ६.६५ टक्के केला आहे. हा विशेष कर्जदर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू असेल, असे बँकेने म्हटलं आहे. विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रातील हा सर्वात कमी कर्जदर आहे.

‘एमटीएआर टेक्नोलॉजिज’चा आयपीओ

MTAR Techonologies या हैदराबाद येथील प्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीने भांडवली बाजारातून निधी उभारणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीची समभाग विक्री योजना बुधवार ३ मार्च रोजी खुली होणार असून ५ मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी अर्ज करता येईल. आयपीओसाठी कंपनीने प्रति इक्विटी शेअरसाठी ५७४ रुपये ते ५७५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदाराला किमान २६ शेअरसाठी बोली लावता येईल. तसेच १३ लॉटसाठी अर्ज करता येऊ शकतो, असे माहिती पत्रकात म्हटलं आहे. आयपीओत १२४ कोटीपर्यंत फ्रेश इश्यू आणि ४७३ कोटींचे ८,२२,२७० इक्विटी शेअर्सपर्यंत विक्री (ऑफर ऑन सेल) करण्याची योजना आहे. १० मार्च रोजी शेअर वाटप होण्याची शक्यता आहे. तर १५ मार्चपासून…

सोन्यामध्ये गुंतवणूक संधी — सोमवारपासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजना खुली होणार

सार्वभौम सोने खरेदी योजनेअंतर्गत २०२०-२१ (मालिका XII) १ ते ५ मार्च २०२१ या कालावधीत खुली होणार आहे. यासाठी प्रती ग्रॅम ४६६२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. जे गुंतवणूकदार या रोख्यांसाठी ऑनलाईन अर्ज करतील आणि डिजिटल माध्यमातून खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रती ग्राम ५० रुपये सवलत देण्यात येणार आहे. या गुंतवणुकदारांसाठी या सुवर्ण रोख्यांची किंमत ४६१२ रुपये प्रति ग्राम सोने अशी असेल. या योजनेसाठी प्रती ग्रॅमसाठी ४६६२ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षातील ही बारावी मालिका आहे. या योजनेसाठी जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजिटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.

End of content

No more pages to load