टिप्स वजा भूलथापांना बळी पडून खरेदी केली गेली, तर ????

मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या दोन्ही आघाडीच्या भांडवली बाजारांनी गुंतवणूकदारांना, तरल आणि रोकडसुलभ नसलेल्या सुमारे ३०० समभागांबाबत विशेष खबरदारीचा इशारा दिला आहे. अशा समभांगांमध्ये व्यवहार करण्यापासून गुंतवणूकदारांना परावृत्त करणारे परिपत्रक या भांडवली बाजारांनी काढले आहे. बीएसई २९९, तर एनएसई १३ समभागांची सूचीही दिली असून, ती दोन्ही बाजारांच्या संकेतस्थळांवर पाहता येईल. अत्यंत तुरळक व्यवहार होणाऱ्या समभागांची टिप्स वजा भूलथापांना बळी पडून खरेदी केली गेली, तरी ते विकते वेळी कोणी खरेदीदार पुढे येणार नसल्याने गुंतवणूकदारांना नुकसान सोसावे लागेल, असा या इशाऱ्याचा अर्थ आहे.

परकीय चलन परिवर्तनीय रोखे–पराग मिल्क

लिमिटेड या भारताच्या दुग्धउत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या एफएमसीजी कंपनीने इक्विटी शेयर्स, फॉरिन करन्सी कन्व्हर्टिबल बाँड्सचे (एफसीसीबी) (परकीय चलन परिवर्तनीय रोखे) प्राधान्य वाटप आणि परिवर्तनयी समभागांच्या वाटपातून १३६ कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास २६ एप्रिल २०२१ रोजी होणार असलेल्या आगामी विशेष सर्वसाधारण सभेत (ईजीएम) समधारकांची तसेच नियामक मंजुरी मिळणे प्रस्तावित आहे. प्रस्तावित गुंतवणुकीमधे १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ६७,५६,७५७ इक्विटी शेयर्सचे १११ रुपये (प्रती शेयर १०१ रुपये प्रीमियमसह) दर्शनी मूल्यासह प्राधान्य वाटप केले जाणार असून त्याद्वारे एकूण ७५ कोटी रुपये उभारले जातील. त्याशिवाय या प्रस्तावित गुंतवणुकीचा एक भाग म्हणून आयएफसीला लागू कायद्यानुसार, खासगी प्लेसमेंटद्वारे प्रती शेयर १४५ रुपये आणि…

मायक्रोटेक डेव्हलपर्सचा आयपीओ बुधवारपासून खुला होणार

macrotek developers लिमिटेड या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीने भांडवली बाजारातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची समभाग विक्री योजना बुधवार ७ एप्रिल २०२१ रोजी खुली होणार असून ९ एप्रिल २०२१ रोजी बंद होईल. आयपीओतून २५०० कोटींचा निधी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. या ऑफरसाठीचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ४८३-४८६ रुपये निश्चित केला आहे. कंपनी ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्स आणि बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या (“मॅनेजर्स”) सल्ल्याने अँकर इन्व्हेस्टर्सच्या सहभागाविषयी विचार करू शकतात. फ्रेश इश्युमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी (कर्मचारी आरक्षण पोर्शन) ३० कोटीपर्यंतच्या शेअर्सचे आरक्षण आहे आणि निव्वळ इश्यू (म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेला इश्यु वजा करून) खालीलप्रमाणे असेल. क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्स…

नव्याने येणारे IPO पहा !!!

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात किमान सहा कंपन्या प्राथमिक बाजारात आपले नशीब आजमावणार आहेत. सरत्या आर्थिक वर्षात भांडवली बाजारात तब्बल ११ IPO आले होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मायक्रोटेक डेव्हलपर्स ही कंपनी आयपीओ घेऊन येणार आहे. ७ एप्रिल रोजी कंपनीची समभाग विक्री खुली होणार असून ९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल. किमान २५०० कोटी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यानंतर आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणारी तेलंगणामधील केआयएमएस या कंपनीकडून ७०० कोटीच्या आयपीओसाठी सेबीकडे प्रस्ताव पाठवला आहे. यात किमान २०० कोटींचे ताजे शेअर इश्यू केले जाणार आहेत. याच महिन्यात कंपनीकडून आयपीओ जाहीर होणार आहे. वाहनांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती करणारी सोना काॅमस्टार ही कंपनीदेखील…

‘ऑटो डेबिट’संबंधी नवीन निर्देशांना सहा महिने मुदतवाढ

ग्राहकोपयोगी सेवांची देयके, फोनचे रिचार्ज, डीटीएच आणि ओटीटी व्यासपीठांची वर्गणी यांसारख्या नियतकालिक आणि आवर्ती देयक व्यवहारांची स्वयंचलित तत्त्वावर नूतनीकरण करण्याची रुळलेली प्रथा बंद करण्याच्या निर्देशांना रिझर्व्ह बँकेने आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देत असल्याचे बुधवारी जाहीर केले. अर्थात ‘ऑटो डेबिट’ नावाने ओळखली जाणारी प्रथा गुरुवार, १ एप्रिलपासून बंद होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. ग्राहकांकडून देय असलेल्या वारंवार अथवा आवर्ती धाटणीच्या व्यवहारांची पूर्तता करताना, रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांसाठी अतिरिक्त प्रमाणीकरण अर्थात प्रत्येक नूतनीकरणाच्या प्रसंगी प्रत्यक्ष ग्राहकांची संमती अनिवार्य करणारा नियम लागू करणारे निर्देश सर्व वाणिज्य बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, बँकेतर वित्तीय कंपन्या आणि आवर्ती देयक व्यवहारांची कार्ड, प्रीपेड पेमेंट साधने आणि…

‘एसआयपी’ मालमत्तेने प्रथमच ४ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना ‘एसआयपी’ ही गुंतवणुकीची पद्धतशीर योजना चांगलीच अंगवळणी पडली असल्याचे, यातील गुंतवणुकीचा वाढता ओघ दाखवून देतो. उपलब्ध माहितीनुसार, देशातील सर्व फंड घराण्यांकडील एकूण ‘एसआयपी’ मालमत्तेने प्रथमच ४ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’च्या फेब्रुवारीमधील आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांची पद्धतशीर व शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या ‘एसआयपी’ योजनांना पसंती राहिल्याचे स्पष्ट होते. जानेवारीतील एसआयपी खात्यांची संख्या ३.५५ कोटींवरून फेब्रुवारीमध्ये ३.६२ कोटींवर पोहोचली आहे. लिक्विड आणि ओव्हर नाइट फंड प्रकार वगळता अन्य सर्वच फंड वर्गवारींमध्ये एसआयपीचा ओघ वाढल्याचे दिसून आले आहे. जानेवारी २०२१ मधील ३.९० लाख कोटींवरून फेब्रुवारी २०२१ अखेरीस एसआयपी मालमत्ता ४.१० लाख कोटी रुपयांवर…

महिंद्रा मनुलाईफ म्युच्युअल फंडाने दिला एक वर्षात ७९ टक्के रिटर्न

मागील वर्षभरात करोनाचा प्रभाव असल्याने म्युच्युअल फंड योजनांच्या कामगिरीवर देखील परिणाम झाला. मात्र या प्रतिकुल परिस्थितीत देखील महिंद्रा मनुलाईफ मल्टी कॅप फंडाने जबरदस्त कामगिरी केली आहे. महिंद्रा मनुलाईफ मल्टी कॅप ग्रोथ फंडाने एक वर्षात गुंतवणूकदारांना ७९ टक्के परतावा दिला आहे. मल्टी कॅप फंडांच्या श्रेणीत सर्वाधिक परतावा देण्यामध्ये महिंद्रा मनुलाईफ मल्टीकप ग्रोथ फंड अव्वल स्थानी आहे. एक वर मुदतीत या योजनेने गुंतवणूकदारांना ७९ टक्के परतावा दिला. तर दोन वर्षांच्या कालावधीत या योजनेतून २०.९ टक्के परतावा मिळालं आहे. तर तीन वर्षाचा विचार करता या योजनेतून गुंतवणूकदारांना मुदत ठेवीपेक्षाही चांगला परतावा मिळाला आहे. महिंद्रा म्युच्युअल फंडाकडून मिडकॅप शेअर्सवर आधारित हि योजना ११ मे…

अनुपम रसायन इंडिया लिमिटेडच्या शेअरने केला भ्रमनिरास

समभाग विक्रीला तुफान प्रतिसाद मिळून देखील आज अनुपम रसायनच्या शेअरने गुंतवणूकदारांना निराश केले. आज भांडवली बाजारात अनुपम रसायनच्या शेअरची भांडवली बाजारात नोंदणी झाली. मात्र प्रत्यक्षात इश्यू प्राइसच्या तुलनेत ३ ते ६ टक्के कमी दराने शेअर सूचीबद्ध झाला. सुरत येथील कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत असलेली अनुपम रसायन इंडिया लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री करुन ७६० कोटींचा निधी उभारला. आयपीओत शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांच्या पदरी आज निराशा पडली.

आयटीआय मिडकॅप फंड योजना पुन्हा सुरु

आयटीआय म्युच्यूअल फंडाने एप्रिल २०१९ मध्ये आपले कामकाज सुरु केले असुन गुंतवणूकदारांना उपयुक्त ठरणाऱ्या दहा मुख्य गुंतवणूक योजना आत्तापर्यंत बाजारात आणल्या आहेत. आयटीआय मिडकॅप हा नवीन फंड गुंतवणुकीसाठी १५ फेब्रुवारी २०२१ ला खुला झाला आणि कंपनीचे वितरक आणि गुंतवणूकदारांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या फंडात तब्बल २२८ कोटी रुपयांचा निधी संकलित झाला आहे. या नवीन फंडाची ऑफर १ मार्च २०२१ ला बंद झाली असून देशातील १३६३ ठिकाणांहून २२६५ वितरक या फंडाच्या वितरणात सहभागी झाले आणि त्यांनी १५ हजार ५०० अर्ज संकलित केले. ही योजना फेरगुंतवणुकीसाठी १० मार्चपासून पुन्हा खुली झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा कर्जदारांना दिलासा

कर्जवसुली स्थागितीच्या प्रकरणी आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर केला. न्यायालयाने थकीत कर्ज हप्त्यांवर व्याजावर व्याज आकारू नये, असे आदेश दिले आहे. तसेच ज्या बँकांनी व्याजावर व्याज वसुल केले आहे त्यांनी पुढील मासिक हप्त्यामध्ये ते समाोजित करावे (Adjusted in Next EMI) असे सांगून न्यायालयाने आज कर्जदारांना मोठा दिलासा दिला. गेल्या वर्षी करोना संकटात लोन मोरॅटोरिम सुविधेने कर्जदारांना तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र या सुविधा आणखी काही काळ सुरु रहावी म्हणून काही व्यापारी संघटनांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज मंगळवारी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निर्णय जाहीर केला. ज्यात न्यायालयाने लोन मोरॅटोरिमला मुदतवाढ देण्यास नकार दिला.

End of content

No more pages to load