इन्फोसिसची आॅफर — 1750 किमतीला कंपनी करणार शेअरची पुनर्खरेदी

इन्फोसिसकडून ९२०० कोटींच्या शेअर पुनर्खरेदीला २५ जूनपासून सुरुवात होणार आहे. कंपनीकडून प्रती शेअर कमाल १७५० रुपयांचा भाव दिला जाणार आहे. १९ जून रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात सभासदांनी ९२०० कोटींच्या शेअर पुनर्खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर कंपनीने २५ जूनपासून ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. खुल्या बाजारातून शेअरची पुनर्खरेदी करेल, असे कंपनीनं म्हटलं आहे. आज बीएसईवर इन्फोसिसचा शेअर ०.५९ टक्क्यांच्या घसरणीसह १५०२.८५ रुपयांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर १५०३. १५ रुपयांवर स्थिरावला. त्यात ०.५८ टक्के किंचित घसरण झाली. निर्धारित उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत किंवा २४ डिसेंबर २०२१ या अंतिम तारखेपर्यंत हा कार्यक्रम सुरु राहील, असे कंपनीने म्हटलं…

अ‍ॅक्सिस क्वांटम फंड गुंतवणुकीस खुला

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने आधार बिंदूंचे विश्लेषण करून जोखीम परताव्याच्या उद्देशांनुसार गुंतवणूक संतुलित करणाऱ्या एका प्रारुपावर आधारित पोर्टफोलिओ तयार करण्यारा अ‍ॅक्सिस क्वांटम फंड गुंतवणुकीस खुला केला आहे. मालमत्ता व्यवस्थापकांना उपलब्ध संधीचा अधिक लाभ घेता यावा या साठी निधी व्यवस्थापन प्रक्रियेचे रूपांतर सांख्यिकी पद्धतीने हा फंड गुंतवणुकीसाठी समभागांची निवड करेल, असे स्पष्ट करण्यात आले. या प्रारूपाचे उद्दीष्ट अधिक वाढीसह गुणवत्तापूर्ण समभागांची पोर्टफोलिओत निवड करण्याचा शिस्तबद्ध जोखीम व्यवस्थापित फंड आहे.

अदानींच्या शेअर्समध्ये पडझड

भांडवली बाजारात आज नफेखोरीने सेन्सेक्स आणि niftyत घसरण झाली आहे. आज बुधवारी सेन्सेक्स 271 अंकांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये 101अंकांची घसरण झाली आहे. आजच्या सत्रात अदानी समूहाच्या शेअरमधील पडझड कायम आहे. आज बाजारात अदानी ग्रीन २ टक्के, अदानी एन्टरप्राईज १.२ टक्के, अदानी टोटल गॅस ५ टक्के, अदानी ट्रान्समिशन ५ टक्के, अदानी पोर्ट ४ टक्के आणि अदानी पॉवर ५ टक्क्यांनी घसरले आहेत. सोमवारी या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. आज देखील बहुतांश शेअरला लोअर सर्किट लागले आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. आजच्या सत्रात धातू क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली आहे. यामुळे मागील काही महिने तेजीत असलेल्या धातू क्षेत्रातील…

फोलो-ऑन पब्लिक ऑफर – एफपीओ

पतंजली आयुर्वेदकडून झालेल्या संपादनातून खाद्य तेल क्षेत्रातील अग्रणी कंपनी रुची सोयाने बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे समभागांच्या खुल्या विक्रीमार्फत (फोलो-ऑन पब्लिक ऑफर – एफपीओ) ४,३०० कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कोणत्याही सूचिबद्ध कंपनीत सार्वजनिक समभाग मालकी ही किमान २५ टक्के असणे आवश्यक असल्याच्या ‘सेबी’च्या नियमाचे पालन करण्यासाठी कंपनीला ही समभाग विक्री आवश्यक ठरली आहे. सध्याच्या घडीला प्रवर्तक गटाची कंपनीतील भांडवली हिस्सेदारी ९८.९० टक्के इतकी आहे. पुढील महिन्यात भांडवली बाजाराला धडक देणे अपेक्षित असलेल्या या भागविक्रीतून प्रवर्तकांचा कंपनीतील ९ टक्के भांडवली हिस्सा सौम्य होईल. रुची सोयाकडे प्रवर्तकांचा हिस्सा आणखी कमी करून नियमानुसार ७५ टक्के अथवा त्याखाली आणण्यासाठी आणखी तीन वर्षांचा कालावधी…

अदानी समूहाने शेअर बाजाराला दिली महत्वाची माहिती

अदानी समूहातील विविध कंपन्यांमध्ये एकूण ४३५०० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भांडवली बाजारात आज सोमवारी अदानी समूहातील शेअरमध्ये मोठी पडझड झाली. यात गुंतवणूकदारांना नुकसान सोसावं लागले. याबाबत अदानी समूहाने बीएसईला महत्वाची माहिती सादर केली आहे. हे वृत्त खोडसाळ असून गुंतवणूकदारांचे दिशाभूल करणारे आहे, असा दावा अदानी समूहाने केला आहे.

‘एसआयपी’ गुंतवणूक आता जलद !!

नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची सध्या वेळखाऊ असलेल्या नोंदणी प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत ‘नॅश’ सेवा आठवडय़ाचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एसआयपीसाठी ‘नॅश’ (एनएसीएच) ची नोंदणी करण्यास किमान १४ दिवसांचा अवधी लागतो. ‘नॅश’चे व्यवस्थापन ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून केले जाते. सध्या हे काम बँक कामकाजाच्या दिवशी केले जाते. आठवडय़ाचे सातही दिवस आणि २४ तास ‘नॅश’ नोंदणी सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे नवीन ‘नॅश’ नोंदणीची प्रक्रिया २१ दिवसांऐवजी चार ते पाच दिवसांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ‘एसआयपी नोंदणीच्या टप्प्यांपैकी ‘नॅश’ नोंदणी हा सगळ्यात वेळखाऊ टप्पा आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासाठी व्यक्तिगत करदात्यांना दोन महिन्यांचा वाढीव कालावधी यंदाही मिळणार आहे. गुरुवारी सरकारने ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कंपन्यांना विवरण पत्र भरण्याची मुदतही ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एका महिन्याने वाढविली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा दाहक परिणाम पाहता, करदात्यांना दिलासा म्हणून हे मुदतवाढीचे पाऊल टाकले असल्याचे कर मंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पगारदार करदात्यांना विवरण पत्र भरण्यासाठी आवश्यक आणि नियोक्त्यांकडून दिले जाणाऱ्या ‘फॉर्म १६’ वितरित करण्याची अंतिम मुदतही आता १५ जुलै २०२१ अशी करण्यात आली आहे. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे, ज्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण (ऑडिट) करणे आवश्यक नसते आणि जे ‘आयटीआर-१’ किंवा ‘आयटीआर-४’…

पेन्ना सिमेंटची १५५० कोटींची समभाग विक्री योजना

दक्षिण भारतातील आघाडीची सिमेंट उत्पादक कंपनी असलेल्या penna cement या कंपनीने इक्विटी शेअरच्या विक्रीतून १३०० कोटींचा निधी उभारण्याचे निश्चित केले आहे. त्याशिवाय प्रवर्तक विक्रेते समभागधारकांकडून २५० कोटींचे समभाग विक्री असा एकूण १५५० कोटींचा प्रारंभिक समभाग विक्री योजनेची ( IPO) घोषणा केली आहे. या निधीतून उभ्या राहणाऱ्या रकमेचा विनियोग ५५० कोटींची कंपनीची काही देणी चुकती करण्याकरिता, त्याशिवाय त्यांच्या केपी लाईन II प्रोजेक्टकरिता भांडवली खर्च आवश्यकतेकरिता १०५ कोटी, तलारीचेरूवू येथे कच्चे ग्राइंडिंग आणि सिमेंट मिल अद्ययावत करण्याकरिता ८० कोटी तसेच ११० कोटी आणि १३० कोटी तलारीचेरुवू आणि तंदूर येथे वेस्ट हिट रिकव्हरी प्लांटकरिता व सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणासाठी वापरण्यात येईल, असे कंपनीने माहितीपुस्तकात…

एसबीआय म्युच्युअल फंड अव्वल स्थानी

म्युच्युअल फंड उद्योगात आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने एचडीएफसी म्युच्युअल फंडाला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर ५.०४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकयोग्य गंगाजळीसह एसबीआय म्युच्युअल फंड अव्वलस्थानी कायम आहे. एकूणच देशाच्या म्युच्युअल फंड उद्योगाने, व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता मार्च २०२० मधील ३१.४२ लाख कोटींवरून, एप्रिल २०२० अखेर ३२.३८ लाख कोटी रुपये अशा अभूतपूर्व स्तरावर गेली आहे. एप्रिलअखेर उपलब्ध तपशिलानुसार, एचडीएफसी म्युच्युअल फंडाची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (एयूएम) ४.०७ लाख कोटी रुपये होते, तर आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता ४.१३ लाख कोटी रुपये होती. या आकडेवारीनुसार एचडीएफसी म्युच्युअल फंड आता तिसऱ्या स्थानी ढकलले गेले आहे. मार्च महिन्यात एचडीएफसी आणि आयसीआयसीआय प्रु. या फंड घराण्यांच्या मालमत्तांमध्ये…

‘पीपीएफएएस’ म्युच्युअल फंडाची नवीन योजना

'पीपीएफएएस' म्युच्युअल फंडाने पराग पारीख कंझर्वेटिव हायब्रिड फंड योजनेची घोषणा केली. या योजनेचे उद्दिष्ट प्रामुख्याने डेट व मनी मार्केट उत्पादनांमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून नियमित उत्पन्न निर्माण करणे हे आहे. एकूण गुंतवणूकीचा एक भाग इक्विटी व इक्विटीशी संबंधित उत्पादने तसेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स/इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्समध्ये (आरईआयटीज/इनव्हीटीज) गुंतवून उत्पन्न निर्माण करणे व भांडवल अधिमूल्यनाचाही प्रयत्न ही योजना करणार आहे. ही गुंतवणूक योजना ७ मे २०२१ रोजी खुली होणार असून २१ मे २०२१ रोजी बंद होईल. या योजनेत किमान ५००० रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. त्यापुढे १ रुपयांच्या पटीत कितीही गुंतवणूक करता येईल. युनिट्स उपलब्ध झाल्याच्या तारखेपासून १० टक्के युनिट्सवर कोणत्याही प्रकारचा एग्झिट…

End of content

No more pages to load