एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड वितरणाला मुभा

खासगी क्षेत्रातील अग्रणी एचडीएफसी बँकेवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने मंगळवारी अंशत: शिथिल केले. त्यामुळे आठ महिने सुरू राहिलेल्या बंदीनंतर बँकेला पुन्हा नवीन क्रेडिट कार्ड वितरण शक्य होणार आहे. तथापि कोणतीही नवीन डिजिटल सुविधा सुरू करण्यावरील बँकेवरील निर्बंध मात्र तूर्त लागू राहणार आहेत. तांत्रिक बिघाडामुळे अनेकवार सेवा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचा दंड म्हणून रिझर्व्ह बँकेने बंदीचे हे अभूतपूर्व पाऊल डिसेंबर २०२० मध्ये टाकले होते. आता ही बंदी उठविण्याचा निर्णय घेताना, माहिती-तंत्रज्ञानविषयक परीक्षण पूर्ण केले गेले आहे, असे एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाचे लेखी पत्रही रिझर्व्ह बँकेने मागितले असल्याचे समजते.  

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २०२१-२२ मधील V मालिका आज सोमवार ९ ऑगस्ट २०२१ पासून खुली झाली आहे. यासाठी सरकारने प्रती ग्रॅम ४७९० रुपये भाव निश्चित केला आहे. याआधी जुलै महिन्यातील गोल्ड बॉण्डच्या तुलनेत १७ रुपयांनी कमी आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना ९ ते १३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत खुली राहणार आहे. 'आरबीआय'ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात रोखे खरेदी कालावधीत रोख्यांची इश्यू किंमत ४७९० रुपये प्रती ग्रॅम असेल. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकारने ऑनलाईन अर्ज आणि देय रक्कम डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसच्या प्रती ग्राम ५० रुपये सवलत जाहीर केली आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांचे मूल्य ४७४० रुपये प्रती ग्रॅम असेल,…

बुस्टर एसटीपी फंड

जर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एसटीपी म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्स्फर प्लानमध्ये गुंतवणूक करीत असाल तर तुम्ही याकरिता बुस्टर एसटीपीचा देखील विचार करायला हवा. परताव्याच्या आकडेवारीकडे पाहिल्यास असे दिसते की ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर परताव्यात वाढ करण्यास मदत करत असल्याचे दिसून आले आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने बुस्टर एसटीपी लॉन्च केला आहे. याची परताव्याची आकडेवारी पाहिल्यास आढळते की एखाद्याने जानेवारी २०१९ मध्ये बुस्टर एसटीपीमध्ये १२ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर २१ जुलै २०२१ रोजी ही रक्कम २१,४१,९९७ रुपये झाली असती. म्हणजेच वार्षिक परतावा सरासरी (सीएजीआर) दर २५.१% राहिला आहे. समान गुंतवणूक दीर्घ कालावधीकरिता सामान्य एसटीपीमध्ये केली असेल तर त्याचे मूल्य या कालावधीत…

१० टक्क्यांहून कमी दराने वैयक्तिक कर्ज

बँकांकडे रोकड तरलता वाढल्याने अनेक बँका आणि बिगर बँकिंग वित्त संस्था (एनबीएसीफसी) आकर्षक व्याजदरात कर्ज देत आहेत. यात ग्राहकाचा सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर त्याचा तुम्हाला कर्ज घेताना फायदा होतो. यात काही बँका आणि एनबीएफसी कंपन्या १० टक्क्याहून कमी व्याजदराने कर्ज देत आहेत. सध्या तीन बड्या बँका या personal loan १० टक्क्याहून कमी दराने देत आहेत. ज्यात भारतीय स्टेट बँक, सिटी बँक आणि एचएसबीसी बँक या तीन बँकांचा वैयक्तिक कर्ज दर १० टक्क्यांहून कमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचा पर्सनल लोनचा व्याजदर ९.६० टक्के ते १३.८५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. बँक ऑफ बडोदाचा व्याजदर १० टक्के ते १५.६०…

फ्लेक्झी कॅप’ सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय

भांडवली बाजार सध्या विक्रमी पातळीवर आहे. अर्थचक्र हळूहळू वेग घेत असले तरी सध्याचे भांडवली बाजाराचे मूल्यांकन हे मार्च २०२०च्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात गुंतवणुकीचा विचार करीत असलेल्या परंतु बाजाराच्या चढे मूल्यांकन पाहता साशंक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, फ्लेक्झी कॅप हा एक सर्वोत्तम पर्याय ठरेल. फ्लेक्झी कॅपमध्ये लार्ज कॅपपासून मिडकॅप आणि स्मॉल कॅप अशा तिन्ही प्रकारच्या समभागांचे मिश्रण असते. त्याचबरोबर ‘सेबी’च्या वर्गीकरणानुसार ही अधिक लवचीक समभागसंलग्न फंडांची श्रेणी आहे. या श्रेणीत नुकतीच आयसीआयसीआय प्रूडेन्शिअलने एका योजना सादर केली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या श्रेणीत फ्लेक्झी कॅप सर्वात आकर्षक योजना आहे. या…

पेटीएमच्या प्रारंभिक समभाग विक्री योजनेचा (आयपीओ)

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पेटीएमच्या प्रारंभिक समभाग विक्री योजनेचा (आयपीओ) मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीचे शेअर विक्री करुन भांडवल उभारणीच्या (आयपीओ) प्रस्तावाला समभागधारकांनी मंजुरी दिल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. १२००० कोटींचा 'आयपीओ'चा प्रस्ताव  मंजूर करण्यात आला आहे.

नॉन कनव्हरटेबल (NCD) डिबेंचर

आय.आय.एफ.एल. होम फायनान्स या कंपनीने नॉन कनव्हरटेबल (NCD) डिबेंचर विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. मंगळवार दिनांक ६ जुलै २०२१ पासून २८ जुलै २०२१ पर्यंत याची आपण खरेदी करू शकतो. या एका NCD ची किमंत रु. १००० असून किमान १० NCD आपणाला खरेदी करणे आवश्यक आहे. क्रिसिल या कंपनीने या बॉंडसाठी I I F L ला AA रेटिंग दिले आहे. आणि या बॉंडची मँनेजमेंट एडलवाइज तर्फे होणार आहेत. ज्यांचे demat अकाऊंट आहे अशा सर्व पात्र ग्राहकांना या N.C.D. ची खरेदी करता येऊ शकते. या गुंतवणूकीतून मासिक किवां वार्षिक १०% पेक्षा जास्त परतावा प्राप्त होऊ शकतो. ही कंपनी NCD द्वारे प्राप्त होणा-या निधीचा…

गुंतवणुकीचा नवीन पर्याय ईएसजी फंड

भारतात ‘ईएसजी’ हा फंड प्रकार नव्याने उदयाला येत आहे. ‘ईएसजी’ फंडांतील कंपन्यांचा सुदृढ ताळेबंद त्या कंपन्यांची व्यावसायिक नैतिकता लक्षात घेता, गुंतवणुकीसाठी अतिरिक्त विकल्प प्रस्तुत करतो. जागतिक पातळीवरील वाढ, स्वीकारार्हता आणि जागरूकता पाहता, भविष्यात आपल्याकडेही ईएसजी फंडांच्या जोमदार वाढीस नि:संशय चालना मिळेल. म्युच्युअल फंड उद्योगात अलीकडील काही वर्षांत फंडाचा एक नवीन प्रकार उदयाला आला आहे. जगभरातील गुंतवणूकदार एन्व्हायर्नमेंट, सोशल, गव्हर्नन्स (ईएसजी) या निकषांची पूर्तता करणाऱ्या कंपन्यांचा सक्रिय शोध घेत असतात.  भारतात या संकल्पनेवर संधी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे या संकल्पनेवर आधारित गुंतवणूक करणारे १० फंड असून यापैकी सात फंडांनी विद्यमान २०२१ सालातच सुरुवात झाली आहे. जागतिक आणि स्थानिक पातळीवर ईएसजी…

‘एलआयसी हाउसिंग फायनान्स’चा सर्वात कमी व्याजदर

गृहकर्ज क्षेत्रातील एलआयसी हाउसिंग फायनान्सने शुक्रवारी गृहकर्ज दरात कपात केली आहे. ५० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदर ६.६६ टक्के करण्यात आला आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा विशेष गृहकर्ज दर लागू राहील, असे कंपने म्हटलं आहे. गृहकर्जाचा हा सर्वात कमी व्याजदर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. गृह कर्जाचा हा विशेष व्याजदर प्राप्त करण्यासाठी ग्राहकाचे सिबिल रेकॉर्ड ग्राह्य धरले जाणार आहे. सिबिलच्या आधारे कर्जदाराची पत क्षमता किती आहे त्यावरून हा विशेष व्याजदर दिला जाईल.

आदित्य बिर्लाची बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड योजना

आदित्य बिर्ला सनलाईफ बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाने एक वर्षात ३४.५८ टक्के परतावा दिला आहे. ३ वर्षात या योजनेने गुंतवणूकदारांना १२.८८ टक्के रिटर्न दिला आहे. दरमहा १० हजारांची नियोजनबद्ध गुंतवणूक केल्यास या फंडाने २१ वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. या फंडाची कामगिरी पहिली तर एप्रिल २००० मध्ये या फंडात दरमहा १० हजारांची एसआयपी केली असल्यास आजच्या घडीला त्याचे मूल्य १.०३ कोटी इतके प्रचंड वाढलेले असेल. मागील काही सत्रात बाजारात अनेक चढ उतार दिसून आले आहेत. अशा अनिश्चित वातावरणात बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे . या फंडातील निधी योग्य प्रकारे विभागून गुंतवला जातो. आदित्य बिर्ला सनलाईफ बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाने बॅलन्स…

End of content

No more pages to load