सर्व कंपन्या वेळोवेळी त्यांचे IPO लाँच करतात. त्यामुळे जर तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल, तर लवकरच एक नवीन आयपीओ मार्केटमध्ये उतरणार आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी ओला इलेक्ट्रिक, जी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरने बाजारात खूप लोकप्रिय झाली आहे, आता लवकरच तुम्हाला पैसे कमवण्याची संधी देणार आहे.

ओला इलेक्ट्रिक पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ च्या सुरुवातीस आपला आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कोटक महिंद्रा कॅपिटल आणि गोल्डमन सॅक्स यांना गुंतवणूक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यासाठी चर्चा सुरू आहे. इलेक्ट्रिक वाहनांवरील सरकारी सबसिडी पुढील वर्षी संपणार आहे आणि त्यापूर्वी शेअर बाजारावर सूचीबद्ध करण्याची कंपनीची योजना आहे.

कंपनी आयपीओच्या अगोदर काही मोटारसायकली लाँच करणार आहे. कंपनी तिच्या बॅटरी युनिटवरही लक्ष केंद्रित करणार आहे. ओला बेंगळुरूमध्ये बॅटरी इनोव्हेशन सेंटर नावाची एक नवीन संशोधन आणि विकास (R&D) सुविधा स्थापन करणार आहे. हे सेंटर ५ लाख चौरस फूट पसरलेले आहे. याशिवाय कंपनीची नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर करण्याची योजना आहे. आतापर्यंत ओला इलेक्ट्रिक केवळ इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये कार्यरत असून सरकार पुढील वर्षी इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी संपवणार आहे.

अभिप्राय द्या!