म्यूच्युअल फंडावर कर्जही उपलब्ध !!
इक्विटी किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडांच्या युनिटवर कर्ज घेता येते. यासाठी ही युनिट्स बँकेत किंवा बिगरबँक वित्तसंस्थेत (एनबीएफसी) तारण म्हणून ठेवून हे कर्ज घेता येते. हे कर्ज परत करताना कर्ज देणाऱ्या वित्तसंस्थेने मंजूर केलेले व्याज द्यावे लागते. तुम्ही किती कर्ज घेता व किती काळासाठी घेता, त्यानुसार या म्युच्युअल फंडांवर १० ते ११ टक्के व्याजदर आकारला जातो. कर्ज घेतल्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स गहाण असतील, तर ते तुम्हाला विकता येत नाहीत, तसेच त्यांचे स्विचिंगही करता येत नाही. कर्ज काढताना ते इक्विटी म्युच्युअल फंडांवर घ्यावे. ते लिक्विड किंवा डेट फंडावर घेऊ नये. म्युच्युअल डिमॅट स्वरूपात असेल, तुमच्या कर्जाची मागणी स्वीकृत झाली असेल, तर…