एसडब्ल्यूपीची कार्यप्रणाली

एसडब्ल्यूपी कशी चालते ? एसडब्ल्यूपी या सुविधेद्वारे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनेतून ठराविक रक्कम काढता येते. ही रक्कम काढताना ती साधारणपणे दरमहिना किंवा तीन महिन्यांनी काढली जाते. अशी रक्कम काढून घेण्यासाठी पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य गुंतवणूकदाराला असते. लाभांशाच्या पर्यायापेक्षा एसडब्ल्यूपी हा पर्याय कसा चांगला ? नियमित उत्पन्न हवे असल्यास लाभांशाच्या पर्यायापेक्षा एसडब्ल्यूपी हा पर्याय अधिक भरवशाचा ठरतो. इक्विटी फंडाच्या लाभांश पर्यायात हा लाभांश नियमित मिळेल की नाही ते सांगता येत नाही. लाभांश हा भांडवल बाजाराच्या हालचालीवर अवलंबून असतो, तसेच तो संबंधित मत्ता व्यवस्थापन कंपनीने (एएमसी) कमावलेल्या नफ्यावर अवलंबून असतो. कर प्रणाली कशी आहे?इक्विटी व डेट फंडाच्या कररचनेप्रमाणेच एसडब्ल्यूपीसाठी रकरचना असते. त्यामुळे १२…

सुरवात तर करा !!

मुद्दल गमावण्याच्या भीतीपोटी अनेक वर्षे म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीकडे पाठ केलेल्या बचतदारांनी सुरुवात करताना, ‘डायनॅमिक’ धाटणीच्या रोखे योजनांचा पर्याय निवडणे श्रेयस्कर ठरते. म्युच्युअल फंडातील रोखे योजनांच्या अनेक प्रकारांतील हा नवगुंतवणूकदारांसाठी आदर्श पर्याय सांगितला जातो. विशेषत: काही वर्षांसाठी आपला बचतीचा पैसा सुरक्षितपणे गुंतवून ठेवण्याचा मानस असलेल्या गुंतवणूकदारांनी डायनॅमिक डेट फंडांची निवड करणे सुचविले जाते. या वर्गवारीतील योजनांचा गेल्या वर्षभरातील परतावा हा सरासरी ९.६ टक्क्य़ांच्या घरात जाणारा आहे, जो मुदत ठेव योजनांच्या तुलनेत खूपच सरस परतावा आहे. तर या वर्गवारीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाँग टर्म प्लानने गेल्या कैक तिमाहीत सातत्यपूर्ण चांगला परतावा देऊन कामगिरीत वरचा क्रमांक मिळविला आहे. गेल्या वर्षभरातील तिचा परतावा हा ११.२०…

mutual fund

नमस्कार Mutual Fund विषयी चांगली माहिती तरी पाहून घ्या. म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी आपल्या देशात प्रथमतः सरकारचे सहभागाने युनिट ट्रष्ट औफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली. आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातिल पहिली म्युच्युअल फंड कंपनी. १९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापण्याची परवानगी देण्या आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळालि. सद्या देशात 43 म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत…

म्युच्युअल फंडातून पैसे केव्हा काढावेत ?

ओपन फंड योजनेतील पैसे केव्हाही काढता येतात पण आपला अपेक्षित परतावा मिळाल्याशिवाय सहसा फंडातून विनाकारण बाहेर पडून दुसरा फंड स्वीकारू नये ! फंडाची खालावलेली कामगिरी म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेण्यास एक  कारण ठरू शकते. प्रत्येक फंडाला कधी ना कधी खराब कामगिरीचा सामना करावा लागतो. केवळ कामगिरी खालावली म्हणून पैसे काढून घेण्याऐवजी फंडाची खालावलेल्या कारणांचा अभ्यास करणे गरजेचे असते. फंडाच्या निधी व्यवस्थापन करण्याच्या धोरणांत बदल, गुंतवणुकीसाठी निश्चित केलेल्या उद्योग क्षेत्रांचा प्राधान्यकम बदलणे, निधी व्यवस्थापकांत बदल अशी एक ना अनेक कारणांनी फंडाची कामगिरी खालावण्याची शक्यता असते. दीर्घ काळ चांगली कामगिरी असलेला फंड तात्पुरता लहान कालावधीसाठी कमी परतावा देऊ शकतो. या कारणांचा शोध…

नवीन फंडांचा समावेश केव्हा करावा ??

नेमका केव्हा नवीन फंडांचा समावेश करावा? १. अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी नवीन आर्थिक ध्येयाची निर्मिती करण्याची गरज निर्माण होते. उदाहरणार्थ, कुटुंबात नवीन सदस्यांचे आगमन. नवीन बाळाच्या आगमनामुळे वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या कालावधीत या वित्तीय ध्येयाची पूर्तता करणे गरजेचे असते. या वित्तीय ध्येयासाठी नव्याने तरतूद करण्याची असल्याने सर्वार्थाने नवीन फंडांचा संच विचारात घेणे आवश्यक असते. २ .पगारवाढ , पदोन्नती , ह्यापायी सुद्धा उत्पन्न वाढ होते व त्यापायी सुद्धा आपण एखादे नवे आर्थिक ध्येय ठरवून नवी SIP सुरु करू शकतो !! ३. गुंतवणूक योग्य रक्कमेत वाढ झाल्यामुळे एखाद्या कुटुंबातील पती अथवा पत्नीच्या उत्पन्नात वाढ होते. परदेशी नोकरी मिळाल्याने अथवा गृहकर्ज फिटल्याने दरमहा गुंतवणूक…

मुलांच्या नावे म्युच्युअल फंडांत गुंतवणूक

    मुलांच्या नावे म्युच्युअल फंडांत गुंतवणूक शक्य आहे का? होय, कोणत्याही म्यच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेमध्ये मुलांच्या नावे पैसे गुंतवता येतात. अशा योजनांमध्ये मूल किंवा अज्ञान गुंतवणूकदार हाच पहिला किंवा एकमेव गुंतवणूकदार म्हणून ठेवता येतो. यामध्ये त्याच्या पालकांपैकी कोणीही एक किंवा न्यायालयाने मान्य केलेला पालक हा त्या योजनेचा संरक्षक (गार्डियन) म्हणून राहतो. यासाठी  कोणती कागदपत्रे लागतात? गुंतवणूकदार अज्ञान असेल तर त्यासाठी त्याची जन्मतारीख हा त्याच पुरावा ठरतो, त्यामुळे गुंतवणुकीच्या वेळी ही तारीख व वय द्यावे लागते. यासाठी वयाचा दाखला (जन्मनोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्टची कॉपी इ.) द्यावा लागतो. प्रथमतः गुंतवणूक करण्यात येत असेल तर हे करावे लागते. मुलांच्या नावे एसआयपी व एसटीपी…

ओटीएम (वन टाइम मॅन्डेट) म्हणजे काय?

म्युच्युअल फंडांमध्ये 'एनएसीएच' किंवा ओटीएम (वन टाइम मॅन्डेट) म्हणजे काय? म्युच्युअल फंडाच्या योजनेसाठी एकगठ्ठा रक्कम भरण्यासाठी किंवा 'एसआयपी'च्या साह्याने रक्कम भरण्यासाठी 'एनएसीएच' ही एकदाच नोंदणी करण्याचा गुंतवणूकदाराचा अधिकार (मॅन्डेट) आहे. 'एनएसीएच' अंतर्गत नोंदणी करून गुंतवणुकीसाठी तुम्ही कोणत्या बँकेतून पैसे योजनेमध्ये ठराविक काळानंतर परस्पर देणार हे तुम्हाला सांगायचे आहे. ही बँक तुम्ही आधी तुमच्या फोलिओमध्ये नोंदवलेलीच असणार आहे. या सुविधेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत रक्कम बँक खात्यातून योजनेकडे वळवण्याच्या सूचना तुम्ही देऊ शकता. हा अधिकार 'एनएसीएच' अंतर्गत तुम्ही ठराविक काळासाठी देऊ शकता किंवा तुम्ही रद्द करेपर्यंत देऊ शकता. एका म्युच्युअल फंडाच्या फोलिओसाठी एक अधिकार देणे अभिप्रेत आहे. वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांतून तुमच्या 'एसआयपी'…

महत्वाचा सल्ला

  “धनलाभ” हे संकेतस्थळ सरू झाल्यापासून संपादकीयमधून म्युच्युअल फंडासंदर्भात  खरेदी संदर्भातील अनेक पध्दतीची माहिती प्रसिद्ध केली आहे. वाचक या माहितीचा लाभ घेऊन स्वतःचा फायदा कोणत्या फंडामधून होऊ शकतो हेही अजमावताना दिसत आहे . आज कोणत्या फंडाद्वारे नव्याने गुंतवणूक सुरु करावी यासाठी काही चांगले फंड सुचविण्याचा मानस आहे. शेअरबाजारने आज सर्वोच्च पातळी गाठलेली असताना या सर्व फंडामध्ये SIP किंवा STP करणे हे सुज्ञपणाचे लक्षण होऊ शकेल हे मात्र नक्की !! फंडाचे नाव IDFC Sterling Equity Fund (Growth)  या फंडाची गुंतवणूक लीडर्स व चॅलेंजर्स समभागामध्ये आहे. LIC Mutual Fund Midcap Fund या फंडाची मालमत्ता सध्या २०० ते ३०० कोटी रुपयांची असली तरी…

‘रेग्युलर’ आणि ‘डायरेक्ट’

  म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे ‘रेग्युलर’ आणि ‘डायरेक्ट’ असे दोन पर्याय आहेत. या दोन पर्यायांमध्ये फरक काय आणि यापैकी कुठला पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य?   ‘सेबी’ने २०१० मध्ये फंड  मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना आपल्या योजना ‘डायरेक्ट’ आणि ‘रेग्युलर’ पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. ‘डायरेक्ट’ म्हणजे मध्यस्थांशिवाय खरेदी करता येऊ शकणाऱ्या योजना आणि रेग्युलर म्हणजे मध्यस्थांमार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या योजना आहेत. म्युच्युअल फंड योजनेच्या गुंतवणुकीचा हेतू, पोर्टफोलिओ वगैरे बाबी दोन्ही प्रकारात सारख्याच असतात. डायरेक्ट प्लानमध्ये वितरकाला दिले जाणारे कमिशन, ट्रेल फी, व्यवहाराचा खर्च आदींचा समावेश नसतो. गुंतवणूकदार मध्यस्थाशिवाय म्युच्युअल फंड घराण्याकडून थेट खरेदी करू शकतो. प्रत्येक योजनेचा मालमत्ता व्यवस्थापनाचा विशिष्ट खर्च असतो. हा…

फार्मा सेक्टर

जर का तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला दिसून येईल कि फार्मा सेक्टर मधील जवळपास सर्वच शेअर्सच्या किंमती या त्यांच्या उच्चतम पातळीच्या तुलतेन जवळपास ४०% झालेल्या आहेत.  हीच ती वेळ आहे या सेक्टरमधील शेअर्स असणाऱ्या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची. जर का तुमची ३ ते ४ वर्षे वाट पाहण्याची तयारी असेल तर तुम्ही SBI Pharma Fund, Reliance Pharma Fund or UTI Pharma & Healthcare Fund यापैकी कोणत्याही योजनेत किंवा तिन्ही योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकता. माझ्या मते पुढील ३ ते ४ वर्षात तुम्ही गुंतवलेल्या पैशाचे मूल्य दुप्पट किंवा अगदी तिप्पट सुद्धा होऊ शकेल. मात्र अल्प काळात गुंतवणुकीचे मूल्य कमी सुद्धा होऊ…

End of content

No more pages to load