म्युच्युअल फंडांपासूनचे उत्पन्न मोजणे
पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपन्यांच्या भागांमध्ये होणाऱ्या हालचालीवर इक्विटी म्युच्युअल फंडांतून मिळणारे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे या म्युच्युअल फंडांपासून मिळणारे उत्पन्न मोजताना त्याची तुलना हा फंड वापरत असलेल्या बेंचमार्कशी करावी लागते. उदाहरणार्थ, तुमची गुंतवणूक निफ्टी हा बेंचमार्क असलेल्या म्युच्युअल फंडात होत असेल आणि त्या फंडाने गेल्या वर्षभरात ३० टक्के उत्पन्न दिले असेल, त्याचवेळी निफ्टीने २५ टक्के उत्पन्न दिले असेल तर याचा अर्थ या म्युच्युअल फंडाची कामगिरी बेंचमार्कपेक्षा उत्तम झाली, असा होतो. समजा या म्युच्युअल फंडाने २२ टक्के उत्पन्न दिले तर त्याची कामगिरी बेंचमार्कपेक्षा कमी झाली. अशी तुलना अनेक वेबसाइट्सवर किंवा म्युच्युअल फंडांचे ऑनलाइन वितरण करणाऱ्यांकडून उपलब्ध करून दिली जाते. मात्र गुंतवणूकदारांनी इक्विटी…