कट-ऑफ टाइम ??

कट-ऑफ टाइम म्हणजे काय? म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार युनिट खरेदी करतात, युनिट विकून त्यांचे पैसे घेतात किंवा एका योजनेकडून दुसऱ्या योजनेकडे युनिट फिरवतात (स्विच करतात) त्यावेळी या प्रत्येक युनिटची किंमत म्हणजेच निव्वळ मत्ता मूल्य (एनएव्ही) होय. एखादा व्यवहार करण्यासाठी कोणत्या वेळी विनंती करण्यात येते त्यावर त्या युनिटची एनएव्ही अवलंबून असते. एनएव्ही मिळण्याची वेळ म्हणजेच कट-ऑफ टाइम होय. लिक्विड फंड, डेट फंड व इक्विटी फंड यांच्यासाठी कट-ऑफ टाइम वेगवेगळा असतो. लिक्विड फंडांसाठी अन्य फंडांपेक्षा वेगळा कट-ऑफ टाइम असतो. दुपारी दोन वाजेपर्यंत होणाऱ्या गुंतवणुकांसाठी युनिट्सचे वाटप आधीच्या दिवसाच्या एनएव्हीनुसार केले जाते. यामुळे आधीच्या दिवसाची एनएव्ही मिळणारे केवळ लिक्विड फंडच असतात. दुपारी तीन वाजेपर्यंत…

म्युच्युअल फंडाचे बचत खाते !!

लिक्विड फंड आधुनिक  बचत खाते लिक्विड फंडातील खाते हे म्युच्युअल फंडाचे बचत खातेच आहे . आपल्याकडील अतिरिक्त रक्कम नेहमीच लिक्विड फंडात गुंतवायला हवी. चांगल्या सवयी अंगी बाळगायच्या तर आपल्या सवयीत बदल करायला हवेत. जास्तीचे पैसे आपल्याला बँकेत ठेवण्याची सवय असते हेच पैसे लिक्विड फंडात ठेवले तर बचत खात्यापेक्षा अधिक नफा होऊ शकतो. लिक्विड फंड आपली गुंतवणूक ही अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये (सीडी सीपी), थोडी रक्कम ही अल्प मुदतीच्या सरकारी कर्जरोख्यात (टी बिल्स) केली जाते. या योजनेत मुद्दल कमी होण्याची शक्यता कमीच असते. लिक्विड फंडात अगदी आपल्याकडील दोन-तीन दिवस ते सहा महिने कालावधीसाठी उपलब्ध असलेली रक्कम गुंतविणे योग्य असते. ज्या…

हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी

  हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी हे ग्राहकांना मिळालेले मोठे वरदान आहे, परंतु त्यासाठी आवश्यक  व योग्य तो विचार करणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी, चुकीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर ती कायम ठेवण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी 'इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी'ने हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्टेबिलिटी राबवण्याची सूचना जारी केली. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या पोर्टेबिलिटीमुळे ग्राहकांना संचित लाभ न गमावता त्यांना योग्य वाटणाऱ्या कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडे आपली योजना वळवण्याचे स्वातंत्र्य मिळते. हा नियम केवळ एका इन्शुरन्स कंपनीकडून अन्य इन्शुरन्स कंपनीकडे जाण्यापुरताच नाही, तर एका योजनेकडून अन्य योजनेकडे जाण्यासाठीही लागू आहे. हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलीटीने ग्राहकांना दिलेल्या अधिकारानुसार…

संजय खंडेलवाल म्हणतात —

TCS stock has gained nearly ten-fold since its IPO in 2004 but lost +10% in just 3 days on 26 occasions since listing. Bharti Airtel has gained 15 times since it was listed in 2002 but has lost +10% in just 3 days 28 times.Similarly, HDFC has risen 18 times in the past 15 years. But there are 42 instances when it has dropped +10%. ICICI Bank shares generated an absolute return of 755% in 15 years, yet there have been 72 instances when it has lost +10% over three days. Not only large cap stocks, similar patterns are visible…

महिलांसाठी !!

आरोग्यविमा घेणे हे सर्व कुटुंबियासाठी अत्यावश्यक आहे पण महिलांसाठी सुद्धा स्वंतंत्र आरोग्यकवच  का हवे ते पहा !! महिलांसाठी आरोग्य विम्याचे हप्ते पुरुषांपेक्षा स्वस्त आहेत. किमान १००० ते २५०० रुपये वार्षिक फरक स्त्री-पुरुष हप्त्यांच्या दरात असतो. समूह आरोग्य विम्यातील अटी व शक्यतांनुसार आरोग्य विमा ठरावीक खर्चाचा विचार करतो. त्यामुळे ‘सर्वसमावेशक’ (Comprehensive) आरोग्य विमा घेणे गरजेचे आहे. तरुण वयात आरोग्य विमा घेतल्याने मोठय़ा विमा राशीचे संरक्षण संग्रहित करणे सहजसाध्य होते. स्त्रीविषयक आजारांना विशेष योजनांद्वारे सुरक्षा कवच घेणे. आजारपणातील खर्च स्त्री-पुरुषांनुसार कमी किंवा जास्त नसतो. त्यामुळे स्त्रियांनी चलनवाढ, स्वतचे वय, आईवडिलांची आजारविषयक पाश्र्वभूमी लक्षात घेऊन विमा राशी ठरवावी. ‘अर्थ’साक्षरता ही शिक्षणाइतकीच महत्त्वाची आहे,…

फंडांचा मागोवा

म्युच्युअल फंडाकडून प्रत्येक योजनेची फॅक्टशीट दर महिन्याला प्रसिद्ध केली जाते. त्यावरून तुम्ही तुमच्या योजनेचा तपशील पाहू शकता. ही फॅक्टशीट म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर सहजगत्या उपलब्ध असते. यामध्ये प्रत्येक योजनेचा तपशील, योजनेतील पैसा गुंतवला जात असलेला पोर्टफोलिओ, समभाग यांची माहिती दिलेली असते. यामुळे बेंचमार्कच्या तुलनेत या योजनेची वाटचाल कशी होते आहे, वार्षिक परतावा किती मिळतो आहे आणि स्टँडर्ड डिव्हिएशन, शार्प रेशो यांच्याही माहिती मिळते. अन्य योजनांशी तुलना कशी करावी? कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेची वाटचाल ही केवळ त्याच योजनेचा इतिहास पाहून ठरवता येत नाही. ही वाटचाल मोजताना तिची तुलना अन्य म्युच्युअल फंडांमध्ये असलेल्या तशाच प्रकारच्या अन्य योजनांबरोबर करणे गरजेचे आहे. प्रत्येक फंडाच्या फॅर्टशीटशिवाय…

लाभांश पर्याय कुणी घ्यावा?

माझ्यकडे एक गुंतवणूकदार अत्यंत कमी रक्कम dividend pay out हवा हे सांगून आपली गुंतवणूक करून गेला ! पण अत्यंत कमी लाभांश स्वीकारून ह्या माणसाला काय फायदा ? ह्याचा मी विचार करून हा पर्याय कोणी घ्यावा हे लिहिण्याचे ठरविले !! लाभांश करपात्र असतात का? गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअ फंडांकडून मिळणारा लाभांश करमुक्त असतो. मात्र डेट फंडाच्या बाबतीत फंडांला उपकर आणि अधिभार मिळून २८.८४ टक्के लाभांश वितरण कर भरावा लागतो. इक्विटी म्युच्युअल फडासाठी मात्र लाभांश वितरण कर नसतो. लाभांश पर्याय कुणी घ्यावा? केलेल्या गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळावे अशी इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांनी लाभांश पर्याय निवडावा, असा सल्ला वित्त नियोजक देतात. इक्विटी फंडातून एसआयपीच्या माध्यमातून दीर्घकालीन…

स्मार्ट करबचत

करबचत करताना उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साधनांचा हा  आढावा पहा व स्वतः कुठे गुंतवणूक करण्यास प्राधन्य द्यायचे ते  ठरवा . ईएलएसएस फंड (गेल्या तीन वर्षांत १३.६२ टक्के परतावा) ईएलएसएस फंडांनी २०१७ हे वर्ष गाजवले. यावर्षीही हे फंड चांगला परताना देतील. गेल्या पाच वर्षांत या फंडांनी १८ टक्के चक्रवाढ परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांनी त्यांनी गुंतवलेली रक्कम चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट झालेलीही पाहिली आहे. या फंडांतून मिळणारा परतावा करमुक्त आहे. ईएलएसएसमधून मिळणारे दीर्घकालीन भांडवली लाभ करमुक्त आहेत. असे तज्ज्ञ सांगतात.या फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करणार असाल तर लाभांशाचा पर्याय निवडू नये. पीपीएफ (जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ या काळात ७.६ टक्के व्याज मिळेल)…

इन्स्टा एमएफ-पहाच !!

  शेअरखान तर्फे इन्स्टा एमएफ हा म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याची काही वैशिष्ट्ये पहा !! म्युच्युअल फंड वितरण हा असा व्यवहार आहे की ज्यामध्ये गुंतवणूकदाराला पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या फंडाच्या कामगिरीची तुलना होणे अनिवार्य असते. तरुण पिढी technosavy असल्याने हे सर्व यावर  उपलब्ध आहे .   या सुविधेची वैशिष्टय़े नेमकी काय आहेत? या सुविधेकरिता वापरकर्त्यांने ‘केवायसी’ची पूर्तता करणे आवश्यक आहे. ‘केवायसी’ असलेला गुंतवणूकदार आमच्या मंचावर जाऊन  त्याच्या वैयक्तिक तपशिलाच्या आधारे लगेचच आपली गुंतवणूक सुरू करू शकतो. या सुविधेसाठी डीमॅट खाते असणे आवश्यक नाही. डीमॅट नसलेल्या गुंतवणूकदारांनाही  उपलब्ध असणारा हा मंच आहे. हल्लीची…

निवड कशी कराल ?

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे लक्षात आल्यामुळे मोठ्या शहरांबरोबरच छोटी शहरे आणि गावांमधील सर्वसामान्य गुंतवणूकदारदेखील हळूहळू या प्रवाहात सामील होताना दिसत आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे. पण  गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक गुंतवणूकदाराने पुढे दिलेल्या मुद्‌द्‌यांचा विचार केला पाहिजे. आपल्या एकूण गुंतवणुकीतील काही हिस्सा म्युच्युअल फंडात गुंतवा आणि वेगवेगळ्या पर्यायातील (ॲसेट क्‍लास) गुंतवणुकीचा आपला समतोल कायम सांभाळा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही कमी-अधिक प्रमाणात जोखीमयुक्त असते. त्यामुळे जी रक्कम आपण किमान तीन ते पाच वर्षे किंवा आणखी अधिक कालावधीसाठी गुंतवू शकतो, अशीच रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा.  अधिक फंड (संख्या) म्हणजे अधिक परतावा नव्हे, हे लक्षात असुद्या . एकसारख्या अनेक फंडात गुंतवणूक केल्याने फायद्याची शक्‍यता…

End of content

No more pages to load