एल अँड टी करणार शेअर्सचे बायबॅक
बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील देशातील मोठी कंपनी असलेल्या लार्सन अँड टुब्रोने (एल अँड टी) आपले शेअर बायबॅक करण्याचा आपला विचार व्यक्त केला आहे. यासंदर्भात कंपनीने सेबीला कळविले असून येत्या २३ ऑगस्टला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, २० ते २४ ऑगस्टपर्यंत संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी आणि विशिष्ट कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर्स घेण्याला अटकाव करण्यात आल्याचे देखील कळविले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायात केलेल्या दमदार कामगिरीने कंपनीला मागील तिमाही सत्रात ३६ टक्क्यांचे निव्वळ नफा झाला आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला निव्वळ १२१५ कोटींचा फायदा झाला आहे. जो मागील वर्षी याच सत्रात ८९३ कोटी होता. शेअर्सचे…