सरकार जीएसटीचे दर वाढवण्याच्या विचारात

वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू होऊन तब्बल अडीच वर्ष झाली. यादरम्यान केंद्र सरकानं जीएसटीच्या स्लॅबमध्ये अनेक बदल केले. परंतु आता महसूल घटल्यानं पुन्हा एकदा जीएसटीचे स्लॅब बदलण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या ५ टक्क्यांचा जीएसटीचा स्लॅब वाढून ९ ते १० टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करामधून येणारा महसूल वाढवण्यासाठी जीएसटी काऊंन्सिल १२ टक्क्यांचा स्लॅब बंद करून यादरम्यान येणाऱ्या सर्व २४३ वस्तूंवर १८ टक्के करण्यावर विचार करू शकते. जर यावर शिक्कामोर्तब झालं आणि जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यात आले तर याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. GST स्लॅबमध्ये बदल झाल्यास सरकारी तिजोरीत १ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक वाढ होणार…

कार्वी व म्युच्युअल फंड

आपले बहुतांशी म्युच्युअल फंड हे karvy fintech मार्फत हाताळले जातात !! आत्ताच karvy stock broker वर सेबीकडून कार्यवाही झाल्याचे माहिती झाले असेलच ! karvy stock broker हि कंपनी karvy fintech पासून पूर्णतः स्वतंत्र असून तिचे नाव KFintech असे आहे !! त्यासंबंधात मला आलेले पत्र आपणा सर्वांसाठी सोबत प्रसिद्ध केले जात आहे !! Dear Investor Greetings from KFintech!!! We are pleased to inform you that we have recently unveiled our new identity KFintech with the name of the company being KFin Technologies Pvt. Ltd., which was earlier known as Karvy Fintech Pvt Ltd. We are also pleased to announce the appointment…

घरखरेदी— घ्यावयाची काळजी

घर खरेदी करताना, प्रथम घर ज्या व्यक्तीकडून खरेदी करणार आहात ती व्यक्ती निवासी भारतीय आहे की अनिवासी भारतीय आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवासी दर्जावर घराच्या खरेदीवर उद्गम कर (टीडीएस) किती कापावयाचा हे ठरते.  उद्गम कर, निवासी भारतीय ज्या व्यक्तीकडून घर खरेदी करणार आहात ती व्यक्ती जर निवासी भारतीय असेल आणि घराचे मूल्य ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर खरेदीदाराला संपूर्ण मूल्याच्या एक टक्का इतका उद्गम कर (‘कलम १९४ आयए’नुसार) कापून, ठरावीक वेळेत तो सरकारकडे जमा करावा लागतो. विक्रेत्या व्यक्तीकडे जर पॅन (पर्मनंट अकाऊंट नंबर) नसेल तर त्यावर २० टक्के इतका उद्गम कर कापावा लागतो. हा उद्गम…

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड

मागील ऑक्टोबर महिन्यात निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने २५व्या वर्षांत पदार्पण केले असून २२व्या वर्षांत या फंडाच्या ‘ग्रोथ’ पर्यायाच्या ‘एनएव्ही’ने चार आकडी संख्या गाठली आहे. फंडाच्या पहिल्या एनएव्हीप्रमाणे ८ ऑक्टोबर १९९५ रोजी गुंतविलेल्या एक लाखाचे शुक्रवार, २९ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.१२ कोटी रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर २१.६ टक्के आहे. मिडकॅप फंड प्रकारात निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड दीर्घ मुदतीत चांगली कामगिरी करणारा फंड आहे. मूळ मल्टिकॅप प्रकारच्या या फंडाचे सेबीच्या प्रमाणीकरणानंतर, फंड घराण्याने मिडकॅप प्रकारात वर्गीकरण केले.  मनीष गुनवाणी आणि धृमील शहा हे या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक आहेत. या फंडाची अस्थिरतादेखील त्या फंड गटातील सरासरीपेक्षा कमी आहे. तसेच…

युटीआय एएमसी आयपीओद्वारे विकणार 8.25 टक्के हिस्सा

देशातील सर्वात जुनी म्युच्युअल फंड कंपनी असलेली युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आपला 8.25 टक्के हिस्सा आयपीओद्वारे विकणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा युटीआय एएमसीमध्ये असलेला हिस्सा बाजारात विकण्याचा युटीआयचा प्लॅन आहे. सध्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा युटीआय एएमसीमध्ये 18.25 टक्के हिस्सा आहे. त्यातील 8.25 टक्के हिस्सा युटीआय ऑफर फॉर सेल (ओएफएस) च्या माध्यमातून आयपीओद्वारे बाजारात आणणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने युटीआय एएमसीमधील हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला मंजूली दिली आहे. आयपीओच्या माध्यमातून युटीआय एएमसी 1 कोटी 4 लाख 59 हजार 949 इक्विटी शेअर बाजारात आणणार आहे. सेबीच्या मंजूरीसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. युटीआय एएमसीमध्ये चार देशांतर्गत गुंतवणूकदार आहेत.…

मोतीलाल ओस्वाल म्युच्युअल फंडाने आणले दोन नवे लार्ज कॅप इंडेक्स फंड

मोतीलाल ओस्वाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने दोन लार्ज कॅप इंडेक्स फंड बाजारात आणले आहेत. 'मोतीलाल ओस्वाल निफ्टी 50 इंडेक्स फंड' आणि 'मोतीलाल ओस्वाल निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड' अशी या नव्या फंडांची नावे आहे. या दोन्ही फंडाचा एनएफओ 3 डिसेंबरला खुला झाला असून त्याची अंतिम मुदत 17 डिसेंबर 2019 ही आहे. निफ्टी 50 आणि निफ्टी नेक्स्ट 50 या भारतातील दोन लोकप्रिय निर्देशांकावर हे दोन्ही नवे इंडेक्स फंड आधारलेले आहेत. 'गुंतवणूकदारांच्या गरजा लक्षात घेऊन छोट्यात छोटी म्हणजे अगदी 500 रुपयांपासूनची गुंतवणूक करता यावी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन आम्ही हे दोन फंड बाजारात आणले आहेत. आमच्या इंडेक्स फंडांना गुंतवणूकदार आणि गुंतवणूक सल्लागार या…

मार्केट लिंक्ड उत्पादने विकण्यासाठी विमा एजेंट्सना प्रमाणपत्र आवश्यक

युलिप सारख्या बाजाराशी संबंधित विमा योजना विकताना विमा एजंटांकडे प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. भांडवली बाजारात अनेक घडामोडी होत असतात. अशावेळी विमा एजंटला  युलिपची संकल्पना, भांडवली बाजारासंबंधित मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. जेणेकरून विमा घेणाऱ्या ग्राहकांना ही माहिती देताना एजंट्सना अडचण येणार नाही. अनेक विमा एजंट या माहितीशिवाय या प्रकारच्या योजना विकत असतात. परिणामी ग्राहकांची फसवणूक होते. हे टाळण्यासाठी आयआरडीएने हे पाऊल उचलले आहे.  हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एजंट किंवा मध्यस्थ कंपन्यांना विशेष प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. त्यानंतरही संबंधित कंपनीचे अधिकृत प्रमाणपत्र नसल्यास विमा एजंटांना या योजना विकता येणार नाहीत. त्याचबरोबर युलिप किंवा भांडवली बाजारासंबंधित योजना विकताना ग्राहकांना म्युच्युअल फंड किंवा इतर पर्यायांची देखील माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.    

कार्व्ही फिनटेक आता ‘के फिनटेक’

म्युच्युअल फंडांसाठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) आणि नॅशनल पेन्शन योजनेसाठी (एनपीएस) सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (सीआरए) म्हणून कार्यरत असलेल्या कार्व्ही फिनटेकने कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग फर्मपासून स्वतःला दूर करत आपल्या कंपनीचे नाव 'के फिनटेक' असे केले आहे. कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगची मालकी असलेल्या 'कार्व्ही फिनटेक' कंपनीला प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अटलांटिक या अमेरिकास्थित कंपनीने मागील वर्षी विकत घेतले आहे. त्यामुळे  कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगवर झालेल्या कारवाईनंतर कार्व्ही फिनटेकने स्वतःला दूर ठेवण्यासाठी आणि ब्रँडवर परिणाम होऊ नये म्हणून आपल्या कंपनीचे नाव बदलले आहे. कार्व्ही फिनटेक सध्या बीएनपी परिबास म्युच्युअल फंड, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड आणि मिराएसेट म्युच्युअल फंडासह 23 वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांसाठी आरटीए…

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड

मागील दीड वर्ष मिडकॅप गुंतवणूकदारांसाठी वावटळीचे वर्ष ठरले. ५ जानेवारी २०१८ रोजी गाठलेल्या शिखरानंतर मिडकॅप निर्देशांकाचा माघारी प्रवास सुरू झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी हे लार्जकॅप निर्देशांक नवीन शिखरे पादाक्रांत करीत असताना एस अँड पी बीएसई मिडकॅप निर्देशांकांचा मागील २३ महिन्यांतील प्रवास नकारात्मक राहिल्याने गुंतवणूकदारांची मिडकॅपकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अजून सकारात्मकतेचा अभाव दिसून येत आहे. मिडकॅप समभागांच्या सध्याच्या किमतीचा विचार केला तर पाच पैकी तीन समभागांच्या किमती त्यांच्या ऐतिहासिक शिखरापासून अजून किमान १७ ते २० टक्के खाली आहेत. जोखीम घेण्याची मानसिकता आणि नकारात्मक परतावा दिसला तरी किमान पाच वर्षे गुंतवणुकीशी वचनबद्धता राखल्यास ही घसरण संपत्ती निर्मितीची एक संधी आहे. मिडकॅप समभागातील अस्थिरतेवर…

‘प्रेफरेंशियल अलॉटमेंट’– आरबीएल उभारणार 826 कोटी

खासगी क्षेत्रातील उदयोन्मुख आरबीएल बँक 'प्रेफरेंशियल अलॉटमेंट'च्या मदतीने 826 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. पाच गुंतवणूकदारांच्या मदतीने हे भांडवल उभे केले जाणार आहे. यासाठी 340.70 रुपये प्रतिशेअर यानुसार 2.42 कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. या गुंतवणूकदारांना सध्याच्या 374.15 रुपये शेअर किंमतीत 9.8 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. बजाज फायनान्स लिमिटेड, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार - ईस्ट ब्रिज कॅपिटल मास्टर फंड I आणि एफईजी मॉरिशस एफपीआय लिमिटेड, वॉर्ड फेरी मॅनेजमेंट लिमिटेड-मॅनेज्ड हेज फंड, डब्ल्यूएफ एशियन रीकॉनॉईसन्स फंड आणि आशिया-केंद्रित स्टॉक हेज फंड आणि इशाना कॅपिटल या पाच संस्था बँकेत गुंतवणूक करणार आहेत.  

End of content

No more pages to load